आजवर कुणी या विषयावर कधी पुस्तक लिहिण्याचा विचारच केला नसेल असा हा विषय म्हणजे ( पंढरपूरपासून ) उलट परतीची वारी ! आषाढी एकादशीला महाराष्ट्रमाऊली विठाईच्या दर्शनाला लाखो भाविक पिढ्यानपिढ्या करीत असलेली वारी, हा एक जागतिक कुतूहलाचा विषय झाला आहे. त्यामुळे यावर आजपर्यंत आणि दरवर्षी विविध लेख, विशेषांक , चित्र सफरीच्या शॉर्टफिल्म्स, कथा, पुस्तके , वृत्तवाहिन्यांचे दैनंदिन वृत्तांत आपण पाहतोच.
पण .. एकादशीनंतर ज्ञानेश्वर माउलींच्या पादुका पुन्हा आळंदीला घेऊन जाणाऱ्या वारकऱ्यांची " परतवारी ", म्हणजे काय प्रकार असेल ? याची कुणीही फारशी दखलच घेतलेली नाही. सुधीर महाबळ नामक एका इंजिनियर तरुणाने अनेकवर्षे नित्यनेमाने वारी केल्यानंतर त्याला नेमकी याचीच उत्सुकता होती. गेली काही वर्षे ही अतिशय खडतर परतवारी करून त्याने लिहिलेल्या " परतवारी" या अत्यंत वेगळ्या आणि अस्पर्श विषयावरील मराठीतील एकमेव पुस्तकाचे प्रकाशन नुकतेच झाले. मनोविकास प्रकाशनाने प्रसिद्ध केलेल्या या पुस्तकाचे प्रकाशन, अरण्यऋषी श्री. मारुती चितमपल्ली यांच्या हस्ते झाले. यावेळी केलेल्या भाषणांतून डॉ. रवीन थत्ते, शरद काळे, अच्युत गोडबोले, अरुण साधू, दीपा देशमुख, अशा सर्व नामवंत लेखकांनी या पुस्तकाचे खूप कौतुक केले.
महत्वाचे म्हणजे सुधीर महाबळ याच्या पायाला गंभीर अपघात होऊन २ मोठ्या शास्त्रक्रियांनंतर तो सुमारे १ वर्ष अंथरुणावर पडून होता. त्यानंतर पुन्हा नव्या उमेदीने उभा राहून तो इतकी कठीण आणि शारीरिक क्षमतेची कसोटी पाहणारी परतवारी करतो आहे. नोकरीनिमित्त विदेशात असताना केवळ या परतवारीसाठी तो भारतात येत होता.
हे संपूर्ण पुस्तक म्हणजे एका वेगळ्याच विषयाची , वेगळ्याच वाटेने, वारी आणि परतवारी घडविणारे सुंदर पुस्तक आहे. प्रवास जरी पंढरपूर ते आळंदी असला तरी तो वाचकांना अनेक पातळीवर घडतो. या परतवारीत चालायला लागल्यावर कधी माणसे दिसतात तर कधी व्यक्तिचित्रे दिसतात. माणसांच्या मनोव्यापारांबरोबरच अनेकदा या परतवारीत सुंदर निसर्गचित्रे दिसतात. समोरच्या घटनेचे जे कारण दिसते ते आपले बुद्धिवादी मन थेट स्वीकारत नाही आणि केवळ आपल्याला कारण कळत नाही म्हणून त्या घटना घडणे थांबत नाही. त्याचमुळे आपण ज्यांना अद्न्य समजतो ती माणसे एखाद्या गोष्टीचा निखळ आनंद घेत असतांना, आपला बुद्धिवादाचा, आपणच घातलेला अडसर, या आनंदात आपल्याला पूर्ण भिजू देत नाही. त्यांच्या मळक्या कपड्यापासून आणि बाचक्या - गबाळ्यापासून आम्हा वाचकांचे जीन्स-टीशर्ट- सॅक वेगळेच राहतात. पुस्तक वाचतांना सतत येणारा हा अनुभव विलक्षण आहे. चमत्कार घडला तरी आम्ही तो मान्य करीत नाही, योगायोग समजतो. वारकऱ्यांच्या ऐहिक दारिद्र्य आणि अध्यात्मिक श्रीमंतीचा अदृश्य गोफ सतत गुंफताना जाणवतो.
या वारीत रोजच्या ऐहिक गोष्टी करता करता ती अध्यात्मिक पातळीवर कधी पोचते हेच कळत नाही. माउली, रथ, पादुका, वाजंत्री, माणसे, वाहने, भक्तिभाव, प्राणी, औदार्य, माणसांच्या स्वभावांचे विविध रंग , गरजा अशा अनेक गोष्टींची ही परतवारी पावसाच्या विविध छटांतून , चंद्र - सूर्यप्रकाशातून अनेक गावांमधून टप्पे घेत - पडाव टाकत - वळणे घेत मुक्कामाला पोचते तेव्हा .... ! त्या वेळेपुरती पूर्ण झालेली परतवारी ही पूर्णत्वाच्या आनंदाबरोबरच " पुन्हा पुढच्या वर्षी करायलाच हवी " अशी अपूर्णतेचे बीजही पेरते.
एक विलक्षण अनुभव सर्वांनी जरूर वाचावा असा आहे.
संपर्क - श्री. सुधीर महाबळ ... मोबाईल क्र. ९१६७७२०४१३
मकरंद करंदीकर
April 1, 2017
जागतिक खगोलशास्त्राच्या विकासात प्राचीन काळापासून ज्यांनी मोलाची भर टाकली अशा 49 महत्त्वपूर्ण जागतिक कीर्तीच्या खगोलशास्त्रांचे जीवन आणि त्यांचे कार्य यांचा परिचय या पुस्तकांत साधार करून दिला आहे. यात 13 भारतीय खगोलशास्त्रज्ञही आहे. प्रा. प्रकाश माणिकपुरे यांनी हे मराठीतील अशा प्रकारचे एकमेव पुस्तक लिहिले आहे. विलास कुळकर्णी जागतिक खगोलशास्त्रज्ञ लेखक : प्रा. प्रकाश माणिकपुरे पाने : 125 किंमत : 125 रू. नचिकेत प्रकाशन 9225210130
September 29, 2012
हिंदी चित्रपटसृष्टीत नायिका म्हणजे चित्रपटांचा आत्मा असतो. अनेक नायिकांनी आपल्या अभिनयाने आणि सौंदर्याने चित्रपटांवर अधिराज्य गाजवले. अशाच काही तारकांची ओळख सदानंद गोखले यांनी या पुस्तकातून करून दिली आहे.
March 1, 2024
एक उत्साही, विद्यार्थीप्रिय, प्रयोगशील शिक्षक म्हणून जिल्हास्तरीय ‘आदर्श शिक्षक’ पुरस्कार प्राप्त शिक्षक श्री. हरिश्चंद्र कोळी, एक कवी म्हणूनही ज्ञात आहेत. अध्यापनाच्या कार्यात कवितांना चाली लावून शिकविणे, विद्यार्थ्यांमध्ये साहित्याची आवड निर्माण करून त्यांना कविता लिहिण्यास प्रवृत्त करणे, शाळेची उत्कृष्ट हस्तलिखिते तयार करणे, अनेक नाटिका बसवून त्या मुलींकडून करवून घेणे वेगैरे कार्यामधून त्यांनी आपल्या प्रतिभा शक्तीचा अवकाश वाढवला आहे. ‘काव्यसुमनांजली’ या कवितासंग्रहाच्या माध्यमातून ते आता सर्व वाचकांपर्यंत पोहचत आहेत. त्यांच्या या सेवेला मन:पूर्वक धन्यवाद!
हरिश्चंद्र कोळी हे मुळात शिक्षक असल्यामुळे शिक्षण, शिक्षक, विद्यार्थी, शाळा, सुट्टी, बालमन, सर्वधर्म समभाव, स्वच्छ भारत, साक्षरता, शिक्षकदिनासह, निरोपसमारंभ गीता पर्यंतचे सर्व विषय त्यांच्या कवितांमधून आलेले आहेत. सावित्रीबाई फुले यांनी रुजवलेले शिक्षण प्रमाणभूत मानल्यामुळे सामाजिक मूल्ये त्यांच्या कवितांमधून आलेली दिसतात. म्हणूनच, ‘शाळा माझी माऊली’ या कवितेत ते म्हणतात -
‘शाळा आपुली माय माऊली
तिच देते तुम्हां साऊली
हसा, खेळा, पडा, धडपडा
राखा देशाचा मान
वेचा कण-कण ज्ञान’
हसत खेळत शिक्षण घेण्याचे मूल्य रुजतांनाच देशाचा मान राखण्याचा संस्कार ही ते मुलांवर करतात. साने गुरुजींचा आदर्श जपण्याचा ते प्रयत्न करतांना दिसतात.
स्वतंत्र भारतात आपण स्वतंत्र आहोत का? ‘स्वातंत्र्या नंतरही’ या कवितेमध्ये आजच्या भ्रष्ट समाजाचा आरसा तर ते दाखवतातच पण आपण या स्वतंत्र राष्ट्रात सुरक्षित आहोत का? असा प्रश्नही विचारतात. आणि मुलांना सांगतात -
‘एक दिलाने गाऊ आपण
देशाचे गुणगाण रे
श्रमातुनी आणि त्यागातुनी
घडवू भारत छान रे
घडवू भारत छान’
श्रम आणि त्यागाचे मूल्य सांगतानाच ‘कुठलंही व्यसन न करण्याचा’ आदर्श व्यक्त करतात. जीवन म्हणजे काय? जगणं म्हणजे काय? सुख - दु:ख म्हणजे काय? याची सुंदर व्याख्या ‘जीवन’ या कवितेमध्ये त्यांनी केलेली आहे. ते म्हणतात -
‘जीवन म्हणजे केवळ जगणं नसतं तर
सुख - दुःखाच्या दरम्यान
श्वास आणि उच्छवास
यातील अंतर
म्हणजे खरं जीवन’
जीवनाची अशी व्याख्या त्यांच्या विचारांचा पोत ठरवते. ‘महिला दिन’ या कवितेमध्ये इतिहासातील अनेक क्रांतिकारी स्त्रियांचे दाखले देत असतांनाच... आजच्या स्त्रीला प्रेरणा देण्यासंबंधी भाष्य करून तिचा पाय मागे न ओढण्याची विनंती करतात.
‘शाळेतील मुलांना मला शिकवायचे आहे
समाजात जगण्यालायक बनवायचे आहे’
(आदर्श शाळा)
त्यासाठी श्रमप्रतिष्ठा, नैतिकमूल्य, अंधश्रद्धेचे उच्चाटन, साक्षरतेचा प्रसार करण्याचा मार्ग ते सुचवतांना दिसतात -
‘एका जागी राहून उभा
आला असेल वीट
विठ्ठला s s s सोड तुझी वीट’ (वारकरी)
असे विठ्ठलाला अगदी सहजपणे सांगतात. ‘उन्हं पाहून पाठ फिरवणारी माणसं’ त्यांना नको आहेत. ‘भाकरीचा चंद्र शोधणारी माणसं हवी आहेत.’ ‘मी अडाणी कसा’ या कवितेमध्ये नैतिकता ही शिक्षणावर अवलंबून नसते तर ती नैतिक वागण्यावर अवलंबून असते. हे सांगताना कवी म्हणतात, ‘निरक्षर माणसाला लिहिता वाचता येत नाही पण बाकी सगळा व्यवहार समजतो. मान - अपमान समजतो. भ्रष्ट्राचार लक्षात येतो. पाहुणचार करता येतो’ मग असा माणूस अडाणी कसा? भ्रष्ट वागणारे साक्षर शहाणे कसे?... विचार करायला लावणारा प्रश्न कवीने उपस्थित केला आहे.
‘आम्ही सालस प्रेमळ
निर्व्यसनी माणसं पेरली
पण निरक्षर, लाचार
पण हावरट माणसंच जन्मली’ (निर्दयी माणसे)
या काव्यसंग्रहातील ‘भारती’ ही भारत मातेची आजची अनावस्था दाखविणारी कविता मुळातूनच वाचायला हवी. शिवाय ‘गर्दी’, ‘जगणं’, ‘कलियुग’, ‘बाप’, ‘चेंडू’, ‘पोर वयात आली’, ‘विटंबना’, ‘वादळ’ सारख्या कवितांनी कवी बद्दलच्या अपेक्षा वाढवल्या आहेत. साध्या - सोप्या सरळ भाषे मधील कविता गेय, गझल, मुक्तछंद, चारोळ्या, लावणी वगैरे प्रकारातील असून काही कविता गीतांच्या चालीवर लिहिलेल्या आहेत.
हरिश्चंद्र कोळी यांचा लिहिता हात आहे. विचारांची झेप आहे. ती अधिक खोल व व्यापक व्हावी. त्यांना त्यांची लय सापडावी. भविष्यातील अधिकाधिक कसदार लेखनासाठी त्यांना अनेकानेक हार्दिक शुभेच्छा! आणि ‘काव्यसुमनांजली’ या पहिल्या कविता संग्रहाचे मन:पूर्वक स्वागत!
- नीलम माणगावे,
कवयित्री व लेखिका, जयसिंगपूर
Title - Kavyasumananjali (काव्यसुमनांजली)
Poet - Harishchandra Mahadev Koli (हरिश्चंद्र महादेव कोळी)
Edition - First Edition
Price - Rs. 100/- (मूल्य 100/- रुपये)
Publisher - Dr. Sunil Patil (डॉ. सुनील पाटील)
Publication - KavitaSagar Publication (कवितासागर प्रकाशन)
Contact - 02322 - 225500, 09975873569
Email - kavitasagarpublication@gmail.com
March 7, 2016
अमृता खंडेराव यांचं हे कथासंग्रह म्हणजे विदर्भाच्या मातीतून उगम पावलेलं, चुलीवर शिजवलेलं आणि बोलीभाषेच्या फोडणीने झणझणीत झालेलं साहित्यिक जेवण आहे. हे पुस्तक वाचताना वाटतं, आपण एखाद्या खेड्यातल्या अंगणात बसलो आहोत, समोर चुलीवर भाकरी भाजतेय, आणि आजूबाजूच्या बायका आपापल्या कहाण्या सांगतायत—कधी हसवणाऱ्या, कधी डोळ्यांत पाणी आणणाऱ्या, पण नेहमीच मनात घर करणाऱ्या.
July 16, 2026
स्वप्नांचे पंख लेऊन, सूर्यमंडळाला भेदू इच्छिणारी त्यांची गरुड झेप, आपल्या सर्वांना नक्कीच प्रेरणादायी ठरेल. मराठी शब्दांशी होणारी झटापट सुलभ करणाऱ्या मिलिंद सरवटे या माझ्या मित्रास आणि माझ्या कोणत्याही लेखनाला पॉलिश करण्याचं काम तत्परतेने आणि आवडीने करणारे डिमेलोसर यांच्या मी ऋणातच राहू इच्छिते.
July 26, 2022
`प्रतिभावान रेषालेखक’ असे ज्यांना विजय तेंडुलकरांनी म्हटले ते ज्येष्ठ चित्रकार वसंत सरवटे यांचे `सहप्रवासी’ हे नवे चौरसाकृती पुस्तक. मुखपृष्ठ आणि आतील एक-दोन चित्रे वगळता या पुस्तकात रेषा आहेत, त्या इतर व्यंगचित्रकारांच्या. सरवटे इथे `लेखक’ म्हणून येतात. साठ-एक वर्षांच्या त्यांच्या दीर्घ चित्रप्रवासातील सुहृदांविषयी सरवटे यांनी वेळोवेळी लिहिलेले हे लेख आहेत.
January 25, 2010
भाऊ आणि बहिणीच्या कवितांचा एकत्रित कवितासंग्रह प्रसिद्ध होण्याचा हा प्रयोग विरळाच या कविता मराठी हिंदी आणि इंग्रजी अशा तीनही भाषांतून लिहिले आहेत
February 29, 2024
पुण्याच्या कोंढवा भागात एक लष्करी अधिकाऱ्यांची वसाहत आहे ज्याचे नाव ‘साळुंखे विहार’ आहे. आता हे साळुंखे कोण हे पुण्यातल्या तरी किती जणांना माहीत असेल याबाबत शंकाच आहे. महाराष्ट्रातल्या जनतेला आवर्जून सांगायला हवे की भारतीय सैन्यातील शूर हुतात्मा जवान ‘पांडुरंग साळुंखे’ यांच्या नावाने ही वसाहत उभी आहे.
October 7, 2026
एखाद्या बिल्डर कडे पाहण्याचा आपला दृष्टिकोन कसा असतो? बिल्डर म्हणजे जमीन आणि पैशाच्या राशी असे आपले समीकरण असते. मात्र, या व्यवसायामागे किती मेहनत असते, किती परिश्रम आणि चिकाटी असते याची प्रचीती या पुस्तकातून येते.
October 30, 2023
Copyright © 2025 | Marathisrushti