(User Level: User is not logged in.)

परिचय – परिक्षण

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • आठवणीतलं पुस्तक – मुंबई दिनांक

    लहानपणापासून सारं आयुष्य ग्रंथाच्या सहवासातच गेलं, तरी एखाद्याला वाचनाचा नाद लागेलच, असं सांगता येणं कठीण आहे. तसं असतं तर प्रत्येक ग्रंथविक्रेता हा चांगला वाचक झाला असता. पण तस होतं नाही. मात्र याचा मात्र नेहमीचं खरा ठरतो. आणि वाचनाचा नाद असलेला ग्रंथविक्रेता हा उत्तम पुस्तकविक्रेता होतो! मला स्वत:ला वाचनाचा नाद नव्हे वेड आहे, अगदी लहानपणीच लागलं. त्याचं कारण ग्रंथांच्या सहवासात गेलेलं बालपण हेच होय.

  • रेषालेखकाचे `सहप्रवासी’

    `प्रतिभावान रेषालेखक’ असे ज्यांना विजय तेंडुलकरांनी म्हटले ते ज्येष्ठ चित्रकार वसंत सरवटे यांचे `सहप्रवासी’ हे नवे चौरसाकृती पुस्तक. मुखपृष्ठ आणि आतील एक-दोन चित्रे वगळता या पुस्तकात रेषा आहेत, त्या इतर व्यंगचित्रकारांच्या. सरवटे इथे `लेखक’ म्हणून येतात. साठ-एक वर्षांच्या त्यांच्या दीर्घ चित्रप्रवासातील सुहृदांविषयी सरवटे यांनी वेळोवेळी लिहिलेले हे लेख आहेत.

  • डार्क हॉर्स

    मूल जन्माला आलं की हल्लीचे पालक त्याचं पुढिल भविष्य  ठरवायला जणू काही तयारच असतात. ही विचारसरणी  सध्या सुशिक्षित पालकांमध्ये जास्त प्रमाणात पाहायला मिळते. माझा मुलगा मोठा झाला की तो एखादा डॉक्टर किंवा इंजिनिअर व्हावा. नाही तर मग एखादी UPSC किंवा MPSC ची परीक्षा पास होऊन  ऑफिसर बनून कमिशनर किंवा कलेक्टर तरी व्हावा अशी बऱ्याच पालकांची मनोमन इच्छा असते . त्यासाठी ते मुलांना तशा प्रकारचे वातावरण  सुद्धा बहाल करत असतात. लेखक हे स्वतः त्या परिस्थितीतून गेलेले असल्यामुळे त्यातील वर्णन अधिकच जिवंत आणि वास्तववादी वाटतात.  लेखकाचं हे पहिलंच पुस्तक असलं तरी ही कादंबरी वाचताना खिळवून ठेवते. प्रत्येक स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्याला वाटेल की हे सर्व माझ्याशी निगडित असंच लिखाण आहे.

  • कीटकांची नवलाई

    मानवी जीवन ज्यावर अवलंबून आहे अशा निसर्गचक्रात कीटकांच्या दुनियेची ही महत्वाची भूमिका आहे. या कीटकांच्या दुनियेतील कोळी,पतंग, काजवा, झुरळ, माशी, उधई, आदी विविध कीटकांचा माहितीपूर्ण मनोरंजक पण सोप्या भाषेत परिचय करून दिला आहे.

  • फिल्मी चक्कर – सिनेसृष्टीत मारलेला फेरफटका

    Filmy-Chakkar-Front-300मराठी व हिंदी फिल्मजगतातील ज्येष्ठ व श्रेष्ठ पुरुष/स्त्री कलाकारंच्या परिचयातून त्यांच्या स्वभाव वैशिष्ट्य दाखविण्याचा लेखकाचा प्रयत्न सफल झाला आहे. मोठे आर्टिस्ट असले तरी ते त्यांच्या सहवासातील छोट्या लोकांशी कसे मोठेपणा झुगारुन वागत याची खूप उदाहरणे पुस्तकात मिळतील.

    फिल्मी चक्कर
    लेखक : रमेश उदारे
    प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
    मूल्य : १३०/- रुपये
    पाने : ११२

  • हजार तोंडांचा रावण

    विश्वनाथ शिरढोणकर हे मध्यप्रदेशात स्थायिक असलेले ज्येष्ठ मराठी साहित्यिक आणि कवी आहेत. हिंदी भाषेतदेखील त्यांच्या अनेक साहित्यकृती प्रसिद्ध आहेत. त्यांच्या हजार तोंडांचा रावण या लघुकथासंग्रहाची ज्येष्ठ साहित्यिक संजय सोनवणी यांनी लिहिलेली प्रस्तावना.

  • घ्या हातात सुया आणि लागा विणकामाला, सोप्पय !

    ghya-haatat-suya-Front-300स्त्रीयांना विणकाम, भरतकामाची जन्मत:च आवड असते. हे जाणून विणकामातील विविध प्रकार, डिझाईन्स भरतकामाचे सचित्र नमुने व त्याची रीत सामान्य स्त्रियांना समजेल अशा पध्दतीने केलेली मांडणीच या पुस्तकाच्या दोन आवृत्त्या संपायला कारणीभूत ठरल्यात.

    घ्या हातात सुया आणि लागा विणकामाला, सोप्पय !
    लेखिका : सौ. विजया किशोर भुलेस्कर
    प्रकाशक : मोनिका प्रकाशन, नाशिक
    मूल्य : १८०/- रुपये
    पाने : १४८

  • चाकोरीबाहेरच्या स्त्रीकथा

    डॉ. अलका कुलकर्णी या मुंबईसारख्या शहरातून डॉक्टर झालेल्या आणि शहाद्यासारखे दूरचे गाव त्यांनी कार्यक्षेत्र म्हणून निवडले. या गोष्टीबरोबरच वैद्यकीय व्यवसाय करीत असतानाही त्या दमदार लेखन करतात, याचे कौतुक वाटते. `ओळख’ हा डॉ. अलका कुलकर्णी यांचा कथासंग्रह वाचला. त्यांचा काहीसा आगळावेगळा विषय अर्थवाही होऊन मनात खोलवर रुतू लागला. त्यातील बहुतेक सर्व कथा आधुनिक जगातल्या स्त्रियांच्या समस्येवर आधारित आहेत, तरीही काहीशा चाकोरीबाहेरच्या आहेत.

  • आणि त्या दिवशी माझा मृत्यू झाला

    हॉंगकॉंगमध्ये राहणाऱ्या अनिता या सिंधी सुखवस्तू कुटुंबातील. कॉर्पोरेट जगतात त्या काम करीत असताना डॅनी मुरजानी यांच्याशी त्या विवाहबद्ध झाल्या.

  • रामजन्मभूमी मुक्ती : एक अभूतपूर्व आंदोलन

    भारतीय जनमानसाचे आराध्य असणाऱ्या प्रभु श्री रामचंद्राच्या रामजन्मभूमी मुक्तीचे आंदोलन भारतीय स्वातंत्र्योत्तर काळातील एक अभूतपूर्व आंदोलन आहे. स्वातंत्र्य आंदोलनापेक्षा अधिक व्यापक तीव्र असे हे आंदोलन या जन चळवळीचा साक्षेपी सखोल व साधारण मागोवा घेतला आहे प्रसिद्ध पत्रकार विचारवंत रामजन्मभूमी मुक्तीचे अभूतपूर्व आंदोलन लेखक : दि. भा. घुमरे पाने : १६०, किंमत : १५० रू. नचिकेत प्रकाशन : 24 योगक्षेम ले-आऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-15, भ्र. 9225210130