सर्वसाधारण भारतीयांच्या अमेरिकेबद्दलच्या अतिप्रगत, अत्याधुनिक, चंगळवादी कल्पनाचित्राला छेद देणारे, अमेरिकेच्या ग्रामीण भागात गेली १२ वर्षे वास्तव्याला असलेल्या डॉ. संजीव चौबळ यांनी केलेले अमेरिकेच्या ग्रामीण अंतरंगाचे हे चित्रण. अमेरिकेतील मोठमोठ्या शहरांमध्ये रहाणार्या बहुतांश मराठी लोकांनीही ग्रामीण अमेरिकेचा हा पैलू अनुभवलेला नाही. भारतात राहून अमेरिकेची झगझगीत आणि भव्यदिव्य कल्पनाचित्रे रेखाटणार्या मंडळींना हे पुस्तक वाचून वास्तवाचे नक्कीच भान येईल.
July 16, 2011
मानवी जीवन ज्यावर अवलंबून आहे अशा निसर्गचक्रात कीटकांच्या दुनियेची ही महत्वाची भूमिका आहे. या कीटकांच्या दुनियेतील कोळी,पतंग, काजवा, झुरळ, माशी, उधई, आदी विविध कीटकांचा माहितीपूर्ण मनोरंजक पण सोप्या भाषेत परिचय करून दिला आहे.
June 17, 2014
सहकार खात्याच्या 1981 ते 2007 या 27 वर्षांतील नागरी व कर्मचारी पतसंस्थांना लागू असणार्या सर्व परिपत्रकांचे प्रथम व एकमेव संकलन. वापरण्यास अत्यंत सुलभ. प्रत्येक पतसंस्थेच्या प्रत्येक शाखेत असावेच, असे हे संकलन आहे. संपादक – नचिकेत प्रकाशन, 24-योगक्षेम लेआऊट, स्नेहनगर, वर्धा रोड, नागपूर-440015 ( : 0712-2285473, भ्र. 9225210130) पाने : ११० किंमत : 350 रु.
September 29, 2012
श्री. पाळंदे तीस वर्षे गिरिभ्रमण करताहेत. उदंड अनुभवाचा इतरेजनांना फायदा व्हावा, या सद्हेतूने त्यांनी `डोंगरमत्री’चं लेखन केलं. यातील तीसही लेख अभ्यासपूर्ण आणि मार्गदर्शक आहेत. गिरिकंदरामध्ये भटकण्याचा अनुभव घरबसल्या रसिकाला घेता येईल, या दृष्टीने पुस्तकाची जडणघडण डोळ्यात भरते.
January 25, 2010
Copyright © 2025 | Marathisrushti