(User Level: User is not logged in.)

परिचय – परिक्षण

Sort By:

This articles are displayed in the order of publishing date
This articles are displayed in the order of modification date
The Articles are displayed in the order of publishing date. Oldest first.
The Articles are displayed in ascending order of title
The Articles are displayed in descending order of title
पोर्टलवरील नव्यांसोबत जुने लेखही वाचकांना दिसावेत यासाठी खालील यादी Random पद्धतीने आहे. विशिष्ट क्रमामध्ये यादी हवी असल्यास वरीलपैकी Radio Button क्लिक करा.
  • शरसंधान – एक वाचनिय पुस्तक

    कोणतेही पुस्तक मी सह्सा संपूर्ण वाचून झाल्याखेरीज हाता वेगळे करत नाही आणि एकदा वाचलेले पुस्तक पुन्हा वाचायला शक्यतो घेत ही नाही. पण ‘शरसंधान’ हे नुकतेच प्रकाशित झालेले पुस्तक मी तीन वेळा वाचले. ‘

    शरसंधान’ हे ह्लके-फुलके पुस्तक असले तरी समजायला जड आणि पचायला अवघड आहे. हे पुस्तक आपल्या बुध्दीचा किस काढण्याबरोबर बुध्दीचा कस लावण्यास प्रवृत्त करते. कोणत्याही पुस्तकाबद्दलची मी माझी प्रतिक्रिया कधीच कोठे दिली नाही की कोठे लिह्ली ही नाही कारण लेखक कोणी का असेना त्याने निर्माण केलेलं साहित्य माझ्या दृष्टीने बहूमोलच असतं.

    ‘शरसंधान’ पुस्तकाच्या निर्मितीत माझा खारीचा वाटा आहे अस या पुस्तकाचे लेखक जयेश मेस्त्री मानतात. पण खरं सांगायच तर मला ते माझ्या लहान भावासारखे आहेत. सावरकरांच्या बाबतच्या त्यांच्या ज्ञानाचा मी प्रचंड आदर करतो. त्यांचे लेखन मी सातत्याने वाचत आलेलो आहे राजकारणा सोबत ते इतर विषय अगदी विनोद ही उत्तम हाताळतात. हे पुस्तक प्रकाशित होण्यापुर्वी ही माझ्या हातात आले होते पण ते वाचण्याचा मोह मी त्यावेळी टाळला. पण पुस्तक प्रकाशित झाल्यानंतर जेंव्हा जयेशने त्या पुस्तकाची प्रत मला भेट दिली तेंव्हा मी ते पुस्तक पचेपर्यंत वाचले.

    जयेश जरी नवोदित लेखक असला तरी तो नवखा नाही त्याने यापुर्वी बरेच लिखाण केलेले आहे. प्रचंड अभ्यास आणि निरीक्षणातून त्याचे हे ‘शरसंधान’ पुस्तक जन्माला आलेले आहे. हे पुस्तक म्ह्णजे एक उत्तम लेखक म्ह्णून नावारूपाला येण्याच्या दृष्टीने त्याचे पहिले पाऊलच म्ह्णावे लागेल. जयेशच्या पहिल्याच पुस्तकाला लाभलेली ज्येष्ठ पत्रकार, लेखक, वक्ते आणि समिक्षक श्री.अरविंद कुलकर्णी यांची प्रस्तावना बरेच काही सांगून जाते. त्याच सोबत जयेश मेस्त्री यांच्या लिखाणाचा दर्जाही अधोरेखीत करते. त्यांनी आपल्या प्रस्तावनेत जयेश मेस्त्री यांची पाठ थोपटण्याबरोबरच त्यांच्या हिंदूतत्वनिष्ठतेचे कौतुक करत जयेश मेस्त्री सावरकरांच्या विचारांनी प्रभावित आहे हे सांगायला विसरलेले नाहीत. या पुस्तकाला लाभलेली प्रस्तावनाच एक वाचनिय लेख आहे असे म्हटले तर ते ही वावगे ठरणार नाही.

    जयेश मेस्त्री यांनी आपले हे पुस्तक स्वा.सावरकर आणि बाबा आमटे आणि परिवाराला समर्पित केलेले आहे यावरून त्यांना समाजसेवेचाही वारसा लाभलेला आहे हे स्पष्ट होते. या पुस्तकात जयेश मेस्त्री यांच्या आवघ्या सहा लेखांचा समावेश केलेला आहे. या पुस्तकाच्या सुरूवातीलाच त्यांच्या या पुस्तकाला किशोर नार्वेकर आणि डॉ.शांताराम कारंडे यांनी काव्यात्मक शुभेच्छा दिलेल्या आहेत. डॉ. शाताराम कारंडे यांनी या पुस्तकाला अर्थसहाय्य करून त्याच्या निर्मितीत मोलाची भुमिका बजावलेली आहे.

    या पुस्तकातील पहिला लेख ‘आशीर्वाद देऊ की घेऊ ?’ हया लेखात लेखकाने एक प्रगत राष्ट्र घडविण्यासाठी छत्रपती शिवाजी महाराज आणि स्वामी विवेकानंदाचे चरित्र आजच्या पिढीने स्विकारण्याची गरज का आहे या बद्दल आपले परखड विचार मांडलेले आहेत. ‘कृष्णा तुला शोधू कोठे’ हा लेख भगवान श्रीकृष्णांच्या चरित्राकडे वर्तमान पिढीने कसं डोळ्सपणे पाहायला हवे या बद्दल मार्गदर्शन करताना दिसतो. त्यापुढील पत्रकारीताः लोकहित की व्यवसाय या लेखात ते पत्रकारीता हा फक्त एक व्यवसाय बनून न राहता पुर्वीसारखीच त्याला राष्ट्रभक्तीची आणि राष्ट्रप्रेमाची जोड असावी असा आशावाद लेखकाने व्यक्त करताना बर्या च दुर्लक्षीत गोष्टी प्रकाशात आणण्याचा प्रयत्न या लेखाच्या माध्यमातून केलेला आहे. ‘तहानलेला सावरकर’ हा या पुस्तकातील चवथा लेख सावरकरांवर प्रेम करणार्यां ना नव्याने त्यांच्या प्रेमात पडायला प्रवृत्त करेल अशी खात्री वाटते. या पुढील लेख ‘अखंड भारत का आवश्यक आहे?’ या प्रश्नाच उत्तर जाणण्यास सारेच उत्सुक असतात. वाचकांची ही उत्सुक्ता दूर करण्याचा प्रयत्न लेखकाने या लेखाच्या माध्यमातून केला आहे. अखंड भारत ही संकल्पना प्रत्यक्षात आणण हे स्वप्नवत असतानाही तसा आशावाद दाखविण्याचा लेखकाचा प्रयत्न नक्कीच स्तुती करण्यासारखा आहे. या पुस्तकातील शेवटचा लेख ‘तुंम्हाला गांधी हवेत की सावरकर?’ या प्रश्नाचे उत्तर देणे तसे अवघडच पण जयेश मेस्त्री यांनी ठामपणे सावरकरांची बाजू उचलून धरल्याचे या लेखात स्पष्ट दिसते. त्यांचे सावरकर प्रेम हे वरवरचे नाही तर त्यांनी सावरकरांचा अभ्यास मनापासून केलेला आहे आणि त्या अभ्यासातूनच या लेखाचा जन्म झालेला आहे.

    जयेश मेस्त्री यांचे हे अठ्ठेचाळीस पानाचे छोटेसे पुस्तक वाचकांनी वाचण्यासाठी हाती घेतल्यावर ते संपूर्ण वाचल्याखेरीज ते ते हातावेगळे करणार नाहीत याची मला खात्री वाटते. त्यातील काही वाचक हे पुस्तक आपल्या हृदयालाही कवटाळतील का ते? हे पस्तक वाचल्यावरच वाचकांच्या लक्षात येईल त्यामुळे प्रत्येक मराठी वाचकाने हे पस्तक नक्कीच वाचायला हवे...

    – निलेश बामणे

      June 10, 2015


  • देवस्वरूपा कामधेनु: वैज्ञानिक महत्त्व

    आजच्या नवीन पिढीत गायीचे हे वैज्ञानिक महत्व पुन्हा सांगण्याची निकड निर्माण झाली आहे. देवस्वरूपा कामधेनु : वैज्ञानिक महत्त्व हे अत्यंत अभ्यासपूर्ण, संदर्भपरिपूर्ण संग्राह्य पुस्तक प्रकाशित केले आहे प्रा. विजय यंगलवार यांनी त्यांचे संकलन संपादन केले आहे. या पुस्तकाची प्रस्तावना ज्येष्ठ विद्‌वान श्री रामभाऊ पुजारी यांनी लिहिली आहे. देवस्वरूपा कामधेनू : वैज्ञानिक महत्त्व नचिकेत प्रकाशन : प्रा. विजय यंगलवार पाने : १४०, किंमत : १२५ रू.

      September 29, 2012


  • भारतीय संतांचे योगदान

    भारत भूमी ही संतांची भूमी म्हणून ओळखली जाते डॉक्टर स्नेहल तावरे यांनी संपादित केलेल्या या पुस्तकात संतांच्या कार्याचा विस्तृत आढावा घेण्यात आला आहे संतांचे योगदान आणि संत साहित्याची समीक्षा या डॉक्टर नीला पांढरे यांच्या लेखाने या पुस्तकाचा प्रारंभ होतो

      October 29, 2023


  • एका असामान्य जिद्दीची कहाणी

    मार्ग जितका काटेरी, यश तेवढेच उत्तुंग’ असा यशाचा मूलमंत्र सांगणार्‍या धीरुभाई अंबानी यांच्या वाटचालीत अनेक अडथळे आले. पण, या प्रतिकूलतेवर त्यांनी कशी मात केली, हे सांगणारं ‘प्रतिकूलतेवर मात’ हे पुस्तक मेहता पब्लिशिग हाऊसने प्रकाशित केलं आहे.

      August 8, 2009


  • काव्यमय व्यक्तिचित्रण

    `घरीदारी' या इंद्रजित भालेरावांच्या व्यक्तिचित्रांच्या संग्रहाचे नुकतेच प्रकाशन झाले आहे. ही व्यक्तिचित्रे म्हणजे साहित्य क्षेत्रातल्या व्यक्तींचा वेगळा परिचय देणारी आहेत. त्यांच्या गुणांनी व स्वभाववैशिष्ट्यांनी नटलेली ही माणसे जात्याच प्रसिद्ध आहेत.

    `घरीदारी' :

    लेखक : इंद्रजित भालेराव

      January 25, 2010


  • सजीवांचे जीवनकलह

    पृथ्वीच्या पाठीवर प्रारंभापासूनच विविध प्रकारच्या प्राण्यांचा सजीवांचा जीवनकलह सुरू आहे. त्यातून जे वाचले ती आपली सृष्टी. या जीवनकलहाचा प्रवास आणि त्यामागील कारणे सांगणारे उत्तम पुस्तक. प्रा. विजय घुगे सजीवांचे जीवनकलह लेखक : गो. बा. सरदेसाई पाने : ९६, किंमत : १०० रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130

      September 29, 2012


  • भारतीय गणिती दुसरी आवृत्ती

    भारतीयांची प्रज्ञा आता जगात पुन्हा नव्याने गाजत आहे. भारतीय आणि गणित यांचा अतूट संबंध तर जगात सर्वांच्याच मनात ठसलेला आहे. गणिताच्या विकासात अनेक भारतीय गणितींनी/गणितज्ञांनी वेळोवेळी मोलाची भर टाकली. भारतीय गणिती दुसरी आवृत्ती पाने : १८०, किंमत : १८० रू. 24, योगक्षेम ले आऊट, स्नेहनगर, वर्धारोड, नागपूर-400015, (:0712-2285473, 9225210130

      September 29, 2012


  • विनाशाच्या वाटेवरील प्राणी

    मानवाच्या शक्तीचा, बुद्धी चा आणि लालसेचा परिणाम म्हणून या पृथ्वीतलावर अनेक प्राणी नामशेष होण्याच्या मार्गावर आहेत अशा काही निवडक प्राण्यांची माहिती देणारे पर्यावरण रक्षणासाठी प्रत्येकाने वाचावे असे पुस्तक. विनाशाच्या वाटेवरील प्राणी 15, विद्याविहार, प्रतापनगर, नागपूर 440 022 लेखक : गो. बा. सरदेसाई पाने : ११२, किंमत : ११० रू. प्रकाशक : नचिकेत प्रकाशन मो. : 9225210130

      September 29, 2012


  • राजा थिबा

    Raja-Thiba-Front-300मधु मंगेश कर्णिकांच्या लेखणीतून तब्बल १२ वर्षानंतर लिहिली गेलेली कादंबरी. इंग्रजांना ब्रह्मदेशचा राजा थिबा याला रत्नागिरीला आणून स्थानबध्द केलं. राजाचा मोठा डामडौल होता. राण्यांवर तो खूप खर्च करावयाचा. आपल्या राहणीमानाला पूरक व्हावं म्हणून त्याने पोत्यांमधून जडजवाहिर बोटीत बसायच्या आधी टाकून घेतलं होतं. रत्नागिरीला आल्यावर जवळचे जडजवाहिर विकून ते आपला थाट करीत होते. रत्नागिरीला त्यांच्यासाठी 'थिबा पॅलेस' बांधण्यात आला. घरातील अंतर्गत बाबींचा यात अंतर्भाव केलेला आहे.

    राजा थिबा
    लेखक : मधु मंगेश कर्णिक
    प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
    मूल्य : १३०/- रुपये
    पाने : १२८

      October 17, 2016


  • श्र्वास आणि इतर कथा

    Shwaas-Front-300'श्यामची आई' या सिनेमानंतर तब्बल २५ वर्षांनी मराठी सिनेमाला भारत सरकारचा उत्कृष्ठ सिनेमाचा 'कमळ' पुरस्कार 'श्र्वास' या मराठी चित्रपटाला मिळाला. या चित्रपटाची 'श्र्वास' ही कथा माधवी घारपुरेंची.

    श्वास व इतर कसदार कथांचा गुच्छ म्हणजेच श्र्वास कथासंग्रह. महाराष्ट्र शासनासह इतर साहित्यिक संस्थांनी गौरविलेला हा कथासंग्रह.

    श्र्वास आणि इतर कथा
    लेखिका : माधवी घारपुरे
    प्रकाशक : अनघा प्रकाशन, ठाणे पूर्व
    मूल्य : १६०/- रुपये
    पाने : १४२

      October 18, 2016