बालनाट्याची ६० वर्ष (बाल रंगभूमी माझ्या नजरेतून लेख – २)
Category:
साहित्य - ललितमनोरंजनाबरोबरच सुसंस्कार करणे हे बालनाट्याचे प्रमुख उद्दिष्ट मानले गेले. या दोन दशकांत आलेल्या बालनाट्यांचा ओढा अदभूततेकडे जास्त होता. अधिकांश बालनाट्ये परीकथा किंवा फैंटसीवर आधारित होती. राजा-राणी, राक्षस-परी इत्यादी काल्पनिक पात्रांद्वारे जादू व चमत्कारांच्या साहाय्याने व विनोदी पद्धतीने बालनाट्य सादर करण्याकडे कल होता. वास्तववादी कथा-कल्पना, गंभीर विषय, शोकांतिका यांना बालनाट्यात स्थान नव्हते.