युवा-विश्व

प्रिय नंदिनी जाधव

Category:

 

पत्रास कारण की भावनांच आदान-प्रदान करणार पत्र,आज अचानक गायब झाल आहे,कितीतरी जणांचे आयुष्य याचं पत्रांनी घडवलं आहे.पत्र हे संवादाचे उत्कृष्ट माध्यम आहे. यंत्राने माणसाची बोलतीच बंद केली आहे. पत्र नाही मित्र नाही अशा वातावरणात आजची पिढी वाढत आहे.

  June 20, 2026


संगीत मानापमान
मराठी नाटक

संगीत मानापमान

Category:

 

विनय लाड दिग्दर्शित संगीत नाटक. कलाकार : प्रसाद सावरकर, चारुदत्त आफळे, रमेश चंद्र, दिलीप ठाकूर

3:23:08

  June 20, 2026


युवा-विश्व

कोटा येथील प्रिय विद्यार्थ्यांनो

Category:

 

प्रिय विद्यार्थी, केवळ पुस्तकी ज्ञानात, स्पर्धेत न गुंतता पुस्तकांच्यापलीकडेही जग आहे, हे लक्षात ठेवा. पुस्तकातल्या ज्ञानाने आयुष्याच्या समस्या सोडवायच्या असतात, समस्या उभ्या करायच्या नसतात. तुमच्यावर आत्महत्येला परतवून लावण्याची जबाबदारी आहे. कोटा येथील जिल्हाधिकाऱ्यांनी ‘मैं हूं ना’ म्हणत तुम्हाला धीर दिला आहे. ससा व कासव या गोष्टीप्रमाणे सशासारखे स्पर्धेच्यामागे जाऊ नका, थकून जाल, कासवाप्रमाणे अविरत श्रम करा व शर्यत जिंका.

  June 20, 2026


युवा-विश्व

एका बोटांचे कौशल्य

Category:

 

आपल्यात असलेलं व्यंग नैराश्याच्या गर्तेत आपल्याला लोटणार या भावनेनं जीवन‌ अनेक जण जीवन जगत असतात.काही पुस्तकं माणसें घडवतात,नैराश्य घालवतात.मालिनी चिब यांचे वन लिटील फिंगर हे पुस्तक असेच प्रेरणेची‌ पायवाट आहे. मालिनी चिब या बहुविकलांगता म्हणजे सेरेब्रल पाल्सी या विकाराने ग्रस्त आहेत. असे असूनही या शारीरिक स्थितीशी झगडत शालेय शिक्षण ते पदव्युत्तर शिक्षण या प्रवासामध्ये भारत आणि परदेशामध्ये घेतलेले अनुभव त्यांनी स्वत:च ‘वन लिटील फिंगर’ या पुस्तकातून मांडले आहेत. दिव्यांग व्यक्तींबाबत समाजामध्ये असणारे घोर अज्ञान, त्यातून निर्माण झालेली नकारात्मक वृत्ती, दिव्यांगांना समाजाकडून मिळणारी वागणूक, शासकीय यंत्रणांची उदासीनता, भारत व पाश्चिमात्य देशांमध्ये दिव्यांगांना दिल्या जाणाऱ्या सुविधांमधील जमीन अस्मानाचा फरक, यामुळे शाळा, महाविद्यालयात प्रवेश मिळवताना येणाऱ्या अपरिमित अडचणी यांसारख्या असंख्य गोष्टींचे दाहक चित्रण आणि त्याला मालिनीने केलेला यशस्वी सामना या पुस्तकात आहे.

  June 20, 2026


युवा-विश्व

प्रेरणा निसर्गाची

Category:

 

कुंडीतील सदाफुली बहरली होती. टवटवीतपणे डोलत डोलत नेत्राला सुख देत होती. प्राप्त परिस्थितीमध्ये मिळेल तेवढ्या पाण्यावर मिळेल तेवढ्या जमिनीवर फुलायचं हे वनस्पती पासून शिकायला हवं. कड्या कपारीत बीज रुजतं आणि वाढतं. कसल्याही तक्रारी न करता या वनस्पती वाढतात, बीज अंकुरतं. कुठली प्रेरणा ?कोणाकडून घेतात काहीच कळत नाही. आपणास त्यांच्यापासून प्रेरणा घ्यायला हवी की प्राप्त परिस्थितीत सुद्धा समाधान असतं व त्याही परिस्थितीत फुलायचं व दुसऱ्यांना आनंद द्यायचा असतो. दोन दिवस पाणी येणार नाही म्हणल्यावर आपण जास्तीचं पाणी भरून ठेवू शकतो पण वनस्पतींनी काय करावं? कसलीही तक्रार नाही, कसलीही खदखद नाही मिळेल तेवढ्यात खुश राहायचं,दुःखं‌ उगाळायचं नाही.

  June 19, 2026


मनोरंजन

मी नाटकाचे पार्श्वसंगीत करतो

Category:

 

त्याचवेळी विजय तेंडुलकर लिखित ‘एक हट्टी मुलगी’ हे नाटक रंगभूमीवर आणण्याचे ठरले. निर्माते मोहन तोंडवळकर, संस्था ‘कलावैभव’. नाटकाचे दिग्दर्शक आत्माराम भेंडे. प्रमुख भूमिकेत विनोदी अभिनेते म्हणून गाजलेले शरद तळवलकर. भेंडेंना पार्श्वसंगीताची जबाबदारी नंदू भेंडे या त्यांच्या मुलाकडे द्यायचं मनात होतं. परंतु जयंत सावरकरांच्या प्रयत्नांमुळे ते काम करण्याची संधी मला मिळली. अर्थात मला त्या कामाचा अनुभव नव्हता. प्रसंगानुरूप पार्श्वसंगीत वापरतात एवढंच ठाऊक होतं. देवाचं नाव घेऊन सुरुवात केली. नाटकाच्या तालमी पाहताना आवश्यक तेवढ्या जागा निश्चित केल्या. मध्यांतराआधीच्या प्रसंगानुरूप मिश्र शिवरंजनीचा एक पीस कंपोझ केला. त्यात सतारीची आवश्यकता होती. के. के. जीजीना ( तबलजी आबान मिस्त्री यांचे गुरू) यांनी ते करायचं कबूल केलं. त्याचं रेकॉर्डिंग झालं आमच्या फॅमिली डॉक्टर सुंदरताई गावस्कर – केंकरे (प्रख्यात क्रिकेटपटू सुनील गावस्कर यांची आत्या ) यांच्या घरी. रात्री दहानंतर हे रेकॉर्डिंग केलं होतं. इतर वादक कोण होते ते आठवत नाही. पण जीजीना साहेबांनी ‘आपने ये पीस बहुत खूबसुरत कंपोझ किया है। इसे मै मेरे प्रोग्रॅम में इस्तेमाल करूंगा,’ अशी दाद दिली.

  June 19, 2026


युवा-विश्व

जोगेवाडीची शाळा

Category:

 

शिक्षकांमुळे शाळेला ओळख मिळते व शाळेमुळे विद्यार्थ्यांना ओळख मिळते. अशीच ओळख सुनील खेडकर यांनी अहमदनगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यातील जोगेवाडी या शेवटच्या टोकावरच्या गावाला मिळवून दिली. महाराष्ट्रातील कायम दुष्काळी छायेत असणारा पाथर्डी तालुका व या तालुक्यातील दुर्गम व डोंगराळ भागात छोटीशी लोकवस्ती असणारे मौजे जोगेवाडी गाव तालुक्यापासून ३५ किलोमीटर अंतरावर आहे. या गावात बहुसंख्येने भटक्या जमातीतील लोक राहातात. यात वंजारी, मागासवर्गीय यांचा प्रामुख्याने समावेश होतो. गावात विकासाच्या मागासलेपणासोबतच मोठ्या प्रमाणावर शैक्षणिक अनास्था होती.

  June 19, 2026