व्यक्ती-परिचय

किरण यज्ञोपावित

Category:

 

किरण यज्ञोपावित हा मराठीमधील ताज्या दमाचा दिग्दर्शक आहे., व तजेलदार चित्रपटांद्वारे रसिकांचे निखळ मनोरंजन करून काही लोकांच्या जीवनातील जळजळीत वास्तव त्यांच्यापर्यंत पोहोचविणे ही त्याची शैली आज मराठी रसिकांच्या मनाला चांगलीच भिडलेली दिसते. चिंचवडमधील एका मध्यमवर्गीय कुटुंबामध्ये जन्मलेल्या किरणला लहानपणापासूनच नाटक बघण्याची विलक्षण आवड होती. तरूणपणी प्रायोगिक रंगभुमीमध्ये चपखल बसणार्‍या अनेक चित्रपट, नाटके, लघुनाटके, व छोट्या मोठ्या जाग्रुतीपर स्किट्ससाठी संहितालेखनाचे काम त्याने केले होते.

  August 16, 2011


व्यक्ती-परिचय

वेधस पंडीत

Category:

 

वेधस पंडित म्हणजे मराठी माणसाच्या तंत्रज्ञानावरील प्रभुत्वाला अधोरेखित करणारा, व भारताचा झेंडा अरिझोना स्टेट युनिव्हर्सिटी मध्ये डौलाने फडकविणारा एक कर्तुत्ववान तरूण आहे. बालमोहन विद्यामंदिर येथे प्राथमिक शिक्षण घेतलेल्या वेधसला लहान्पणापासूनच प्रत्येक गोष्टीला स्वतःचा वेगळा स्पर्श देण्याची सवय होती. रामनारायण रूईया, सी. ओ. इ. पी., व आय. आय. टी. अशा मुंबईमधल्या व पुण्यामधल्या नामांकित, व व्यक्तिस्वातंत्र्याला चालना देणार्‍या शिक्षण संस्थांमध्ये शिक्षण घेतल्यामुळे त्याच्यातील, सतत नाविन्याच्या शोधात असलेल्या तंत्रज्ञाला चांगला व रेखीव आकार मिळाला.

  August 16, 2011


व्यक्ती-परिचय

आशुतोष सावे

Category:

 

आशुतोष सावे यांनी मुंबई पोर्ट ट्रस्ट येथे, तसेच ऑल इंडिया रेडिओ मध्ये बातम्यांचे वाचन, भाषांतर, व त्या बातम्या टी. व्ही. तसेच रेडिओ द्वारे प्रसारित करण्याचे काम त्यांनी अनेक वर्षे आवडीने केले आहे. बातम्या जेव्हा स्त्रोतांकडुन आकाशवाणीकडे येतात तेव्हा त्या विवीध भाषांमध्ये व कच्च्या स्वरूपाच्या असतात. अनेक तांत्रिक त्रुटी त्यांच्यात आढळुन येतात. या बातम्यांना व्यावसायिक साचा पुरविण्याचे व लोकांपर्यंत ह्या बातम्या निर्दोषरित्या पोहोचवणे हे काम त्यांच्या अखत्यारित यायचे. आशुतोष सावे यांचा जन्म मुंबईत झाला.

  August 16, 2011


व्यक्ती-परिचय

वरूण वेलणकर

Category:

 

वरूण वेलणकर हे पुण्याचे रहिवासी असून व्हाईट कॉपर एन्टरटेंमेंट या मार्केटिंग क्षेत्रात जगप्रसिध्द असलेल्या कंपनीमध्ये ते मानाच्या हुद्यावर काम करीत आहेत. वरुण हे त्यांच्या उत्तम तंत्रशुध्दपणाबद्दल तसेच कोणत्याही गोष्टीची प्रभावी जाहिरात करण्यासाठी त्यांना अवगत असलेल्या मार्केटिंग कसबांसाठी प्रसिध्द आहेत. कोणत्याही खेळाचा मोठा एव्हेन्ट असो किंवा बाजारात नव्याने आलेल्या एखाद्या खाद्यपदार्थाची किंवा सौंदर्यप्रसाधनाची जहिरात अथवा प्रसिध्दी करण्यासाठी आयोजित करण्यात आलेला कार्यक्रम असो, त्या कार्यक्रमाच्या दिवशी फलके, बोर्ड, मोठे होर्डिंग्स, आकर्षकरित्या व सुबकपणे डिझाईन करणे (सजविणे) व कमीत कमी शब्दांत आपला संदेश जास्तीत जास्त कलात्मकतेने ग्राहकांपर्यंत पोहोचविणे हे मोठ्या कल्पनाशक्तीचे काम असते.

  August 16, 2011


व्यक्ती-परिचय

विरेंद्र तिखे

Category:

 

विरेंद्र तिखे हा संगणक क्षेत्रातील कल्पनाशक्तीशी निगडीत असलेला एक उत्साही तरूण आहे. कोणत्याही गैरप्रकारांनी व उचला उचली न करता, स्वछ हातांनी कोडींग केलेली संकेतस्थळे लोकांना बनवून देणे, आकर्षक आय कॉन्स तयार करणे, कमीत कमी गिचमिडीमधूनही ग्राहकांना खुप काही सांगून जाणारे लोगोस डिझाइन करणे, प्रेसेन्टेशन्स तयार करणे, यंत्र व त्याला वापरणार्‍यांमध्ये ॠणानुबंध तयार करणारे, साधे, सोपे परंतु सुबक इंटरफेसेस निर्माण करणे हा त्याचा व्यवसाय असला तरी व्यवसायापेक्षाही, आपल्या अचाट कल्पनाशक्तीचा अविष्कार ग्राहकांना कसा लाभ देईल याचाच विचार तो जास्त करत असतो.

  August 16, 2011


व्यक्ती-परिचय

अमित भंडारी

Category:

 

अमित भंडारी हा स्टार माझा या मराठीमधील सध्या सर्वात आघाडीवरच्या वृत्तवाहिनीवर दररोज झळकणारा एक लोकप्रिय पत्रकार आहे. दिलखुलास गप्पा मारून समोरची व्यक्ती कितीही छोटी किंवा मोठी का असेना, तिला बोलतं करण्याची कला अमितला उत्तमरित्या जमते. आजवर अनेक मराठी व हिंदी भाषेशी जोडले गेलेले कलाकार, व्यावसायिक, राजकीय सामाजिक, सांस्कृतिक, आर्थिक, क्रीडा, अशा वेगवेगळ्या क्षेत्रांमध्ये गुंफल्या गेलेल्या व्यक्तिमत्वांच्या मुलाखती त्याने सारख्याच सहजतेने व त्याच्या मिश्कील शैलीमध्ये घेतल्या आहेत.

  August 16, 2011


व्यक्ती-परिचय

मिलिंद भागवत

Category:

 

मिलींद भागवत हे स्टार माझा या मराठीमधील सध्याच्या सर्वात जास्त चालणार्‍या वृत्त वाहिनीवर, निवेदक व पत्रकार म्हणून काम करणारे सर्वपरिचीत व लोकप्रिय असे सदस्य आहेत. बातम्या देण्याची त्यांची पध्दत, व ढब प्रेक्षकांच्या चांगलीच अंगवळणी पडली आहे. सर्वांना हवाहवासा वाटणारा सदैव प्रसन्न चेहरा, व ओघवती भाषा या वैशिष्टांच्या जोरावर त्यांनी प्रेक्षकांच्या मनात आदराचे व हक्काचे स्थान निर्माण केले आहे.

  August 16, 2011


व्यक्ती-परिचय

किरण जाधव

Category:

 

रॉबर्ट बॉश ही जगातील आघाडीवरची तंत्रज्ञान, सेवा, पुरविणारी तसेच आय. टी. तंत्रज्ञानाचा प्रसार, विकास, संशोधन, निर्मिती व विक्री अशा जवळ जवळ सर्वच क्षेत्रामध्ये अग्रेसर मानली जाणारी कंपनी आहे. आय. टी., विज्ञान, तंत्रज्ञान, व व्यवसाय क्षेत्रात तज्ञ मानल्या जाणार्‍या असंख्य हिर्‍यांचा इथे खच पडलेला असतो. या खाणीतला असाच एक तेजाने तळपणारा हिरा म्हणजे किरण जाधव हा मराठमोळा तरूण.

  August 16, 2011


व्यक्ती-परिचय

संकेत आहिरे

Category:

 

संकेत अहिरे यांनी जर्मनी सारख्या प्रतिष्ठीत व तंत्रज्ञानप्रेमी देशात आपल्या प्रगल्भ बुध्दिमत्तेचा व अफाट कल्पनाशक्तीचा सुंदर मिलाफ साधला असून, आपल्या कार्यक्षमतेने सर्वच भारतीयांची मान गर्वाने उंचावली आहे. कन्सेप्ट मिडीया वर्क्स ही जर्मनीमधील प्रथितयश व वेब तसेच संगणक क्षेत्रातील कोणत्याही समस्येवर रामबाण इलाज असणारी कंपनी आहे.

  August 16, 2011


व्यक्ती-परिचय

अद्वैत दादरकर

Category:

 

अद्वैत दादरकर हा मुंबईमधील रहिवासी असून मराठी प्रायोगिक रंगभुमीच्या प्रसारासाठी व प्रचारासाठी त्याने लिहीलेली अनेक दर्जेदार नाटके व बसविलेले एकपात्री अभिनयाचे खेळ आज महाराष्ट्राच्या संवेदनशील प्रेक्षकाच्या मनाला चांगलेच भिडले आहेत.

  August 16, 2011