मागणे





मागणे

आजी ग आजी एक मागु का तुला?

छानशी कविता करुन दे मला

नको मला बार्बी डॉल नको मला बुक

खूप खूप वाचनाची लागलीय भुक

माझ्यावरती कविता करून दे मला

शाळेत नेईन मैत्रीणीना दाखवीन

आहे बोवा ऍट असा देतील त्या लुक!

दिसते मी कशी? हसते मी कशी?

कधी कधी मी काय करते रॉन्ग

म्हणते कुठ्ले सॉग् कवितेतुन तु हे सारे सान्ग

लहाणपण माझ कवितेतुन मान्ड

कशी करत होत मी सान्डासान्ड

करत होते का अभ्यास?

का रहायची झोपुन?

मोठी झाल्यावर मला कळेल वाचुन

बागेत कशी जायची बसुन तुझ्या कडे

कवितेत हे सारे लिहून म्हण ह्यापी बर्थ डॅ !

प्रभा मुळे

— प्रभा मुळे

Author