वैविध्यांनी नटलेल्या श्रीलंकेची सफर
पॉडकास्ट

वैविध्यांनी नटलेल्या श्रीलंकेची सफर

Category:

 

हिरवागार निसर्ग, देखणा समुद्रकिनारा, समृद्ध सांस्कृतिक वारसा, बहुविध वन्यजीव आणि पक्षी, साहसी पर्यटन – हे सगळे जर एका शॉर्ट ट्रिप मध्ये करायचे असेल तर तुम्ही नक्कीच जायला पाहिजे श्रीलंकेला!! अधिक माहिती आजच्या पॉडकास्ट मध्ये.

  April 8, 2026


भारताच्या एकसंधतेला खरा धोका कोणता ?
व्हिडिओज

भारताच्या एकसंधतेला खरा धोका कोणता ?

Category:

 

भारताच्या एकसंधतेला खरा धोका कोणता? – एक सखोल विश्लेषण
प्रस्तावना
भारत हा विविधतेने नटलेला देश आहे—धर्म, भाषा, संस्कृती, जाती आणि प्रदेश यांच्या विविधतेतून निर्माण झालेली एक अद्वितीय राष्ट्रीय ओळख. परंतु हीच विविधता, योग्य प्रकारे व्यवस्थापित न झाल्यास, राष्ट्रीय एकात्मतेसाठी सर्वात मोठे आव्हान ठरू शकते.
आजच्या बदलत्या जागतिक आणि प्रादेशिक सुरक्षा वातावरणात, भारतासमोर उभे ठाकलेले धोके केवळ सीमांवरून येणारे नाहीत, तर देशाच्या आतून उगवणारे आहेत. हाच या चर्चेचा गाभा आहे—भारताच्या एकसंधतेला खरा धोका कोणता?

  April 6, 2026


गरज ही नवीन कल्पक नाविन्याची [innovation] पण  जननी असते.
लेखसंग्रह

गरज ही नवीन कल्पक नाविन्याची [innovation] पण  जननी असते.

Category:

 

एके दिवशी नोकिया कंपनीच्या मुख्य व्यवस्थापकाने मला तातडीने, सिंगापूर येथे महत्वाच्या चर्चेसाठी बोलाविले. दोनच दिवसात मी आमच्या दोन वरिष्ठ मॅनेजरांबरोबर सिंगापूरच्या नोकिया प्लांटला पोचलो. चर्चेत त्यांनी आम्हाला सांगितले की मोबाईल फोन बिझिनेस मध्ये वेगाने होत असलेले बदल पाहता पुरवठा साखळीचा सात दिवसांचा कालावधी ते मान्य करू शकत नाहीत. तो वेळ (through put time, TPT) त्यांना चार किंवा त्याहीपेक्षा कमी करून हवा होता.(४२ टक्क्यांनी कमी), आणि तो सुद्धा पुढच्या १२ आठवडयातच, आणि ते जर जमत नसेल तर ते आमच्या ऐवजी दुसरा पुरवठादार शोधणार होते.

  April 4, 2026


आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये संरक्षण निर्यातीचा 38,424 कोटी रुपयांचा उच्चांक; 62.66% ची प्रचंड वाढ
व्हिडिओज

आर्थिक वर्ष 2025-26 मध्ये संरक्षण निर्यातीचा 38,424 कोटी रुपयांचा उच्चांक; 62.66% ची प्रचंड वाढ

Category:

 

संरक्षण निर्यातीने 2025-26 या आर्थिक वर्षात 38,424 कोटी रुपयांचा आतापर्यंतचा उच्चांक गाठला आहे. गेल्या आर्थिक वर्षात 23,622 कोटी रुपयांच्या निर्यातीच्या तुलनेत यामध्ये 14,802 कोटी रुपयांची (62.66%) प्रचंड मोठी वाढ झाली आहे. या ऐतिहासिक टप्प्यामध्ये संरक्षण क्षेत्रातील सार्वजनिक उपक्रम (DPSUs) आणि खाजगी क्षेत्राचा वाटा अनुक्रमे 54.84% आणि 45.16% इतका आहे. भारतीय संरक्षण उद्योगाचे हे यश, भारताला जगातील प्रमुख संरक्षण निर्यातदारांपैकी एक म्हणून प्रस्थापित करण्याच्या पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दूरदृष्टीला अनुसरून आहे.

  April 4, 2026


इराण अमेरिकेला गुडघ्यावर आणणार ?
व्हिडिओज

इराण अमेरिकेला गुडघ्यावर आणणार ?

Category:

 

१. “IRAN–USA युद्ध – ३२वा दिवस” संदर्भ
सध्या इराणविरुद्ध चालू असलेल्या अमेरिकन इस्त्रायली मोहिमेला अंदाजे ३२ दिवस झाले आहेत आणि तीव्र हवाई हल्ले, क्षेपणास्त्र व ड्रोन ऑपरेशन्स सुरू आहेत. तणावाचा मुख्य केंद्रबिंदू इराणचे तेल निर्यात केंद्र (उदा. खार्ग आयलंड) आणि होर्मुझ सामुद्रधुनीतून जाणारी जागतिक तेल वाहतूक हा आहे.

  April 1, 2026


लेखसंग्रह

मृत्यू शिका

Category:

 

जन्म झाल्यापासून आपल्याला कसे जगावे हे शिकवले जाते. वय वाढेल तसं जगण्याचं शिक्षण वाढत जातं. सगळी धडपड जगण्यासाठी चालू रहाते. जीवन इतके चिवट बनते की मृत्यूचा विचारही शिवत नाही. हा विचारही आपल्या मनात का यावा हे सांगत आहेत निरेन आपटे.
कधीतरी, कोणीतरी मृत्यू पावतो. आज एक जातो, उद्या दुसरा जातो. पण आपण गेलेले नसतो. त्यामुळे मीही एक दिवशी जाईन हा विचार मनाला शिवत नाही. तरुण वयात तर मुळीच नाही. पण आपण कुठपर्यंत जगणार आहोत हे कोणालाही माहित नसतं. म्हणून जगता जगता मृत्यूही शिकायला हवा. मृत्यू शाश्वत आहे, आज ना उद्या येणारच! मग तो शिकून घेतलेला बरा. हा विचार सहसा आपण करत नाही, पण ह्याचा विचार खूप प्राचीन काळापासून झालेला आहे.

  March 29, 2026


लेखसंग्रह

कल्याण-डोंबिवलीचं “कल्याण ” झालं !, तुमच्या शहराचंही होणार!!

Category:

 

काही वर्षांपूर्वी कोकणचं California करण्याची घोषणा झाली होती. पण त्या नादात California चं कोकण होण्याची भीती असल्यामुळे तो बेत रद्द करण्यात आला. मग मुंबईचं सिंगापूर, bankbook वैगरे करायला निघाले. मुंबईत लघुशंकेला जागा मिळत नाही Bangkok करायला कुठे जागा मिळणार? तोही बेत फसला.
अनेक शहराचं बरंच काय काय करायचा प्रयत्न झाला. फक्त कल्याण-डोंबिवली शहराने कधीही कोणाचं अनुकरण केलं नाही. इथे सत्ता कोणाचीही असो, प्रत्येकाने कल्याण डोंबिवलीकरांचं “कल्याण” करून टाकलं.
ह्या शहराची मजेदार सफर घडवत आहेत निरेन आपटे.

  March 28, 2026


दाजी पणशीकर- गुरु शिष्य परंपरा- भाग ०१
व्हिडिओज - Marathi

दाजी पणशीकर- गुरु शिष्य परंपरा- भाग ०१

Category:

 

ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी नृत्यगुरु सोनिया परचुरे यांच्या विद्यार्थ्यांसमोर गुरुपरंपरेबाबत विचार मांडले. त्या व्याख्यानाचा पहिला भाग आज गुरुपौर्णिमेच्या पूर्वसंध्येला आपल्यासमोर प्रसारित करीत आहोत. या भागात दाजी पणशीकर यांनी गुरु महत्त्व तसेच वक्तृत्वाचे महत्त्व देखील विषद केले आहे…
जरूर ऐका.

  March 27, 2026


गुरु-शिष्य परंपरेवर व्याख्यान- भाग ०२
व्हिडिओज - Marathi

गुरु-शिष्य परंपरेवर व्याख्यान- भाग ०२

Category:

 

आज गुरुपौर्णिमा !
ज्येष्ठ विचारवंत दाजी पणशीकर यांनी आपल्या एका व्याख्यानात ‘गुरु कसा असावा? शिष्य कसा असावा? गुरुकृपा कुणाला प्राप्त होते’ याचे केलेले विवेचन आजच्या दुस-या भागात ऐकुया

  March 27, 2026


लेखसंग्रह

नवीन वर्ष गड-किल्ल्यांवर

Category:

 

आपण मराठी माणसं भाग्यवान आहोत. आपल्याला जन्मताच शिवाजी महाराजांचा इतिहास मिळतो आणि अनेक गड किल्ल्यांचा वारसाही. हे किल्ले केव्हाही पाहावेत असे आहेत. काही विशेष कारणाने पहिले तर आणखी सुंदर दिसतात. एखादा सण किंवा नवीन वर्ष किल्ल्यांवर साजरे केले तर त्याच्या निराळ्या आनंदाचं वर्णन करत आहेत निरेन आपटे.

  March 27, 2026