श्री सुवर्ण गणेश मंदिर, दिवेआगर
Category:
लेखसंग्रहश्रीवर्धन तालुक्यातील दिवेआगर हे एक निसर्गसमृद्ध व टुमदार गाव. हे गाव प्रसिद्ध आहे ते येथील विस्तीर्ण, स्वच्छ व सुंदर समुद्रकिनाऱ्यामुळे! याच दिवेआगरची एक वेगळी ओळख निर्माण झाली ती येथील सुवर्ण गणेश मंदिरामुळे! नोव्हेंबर १९९७ मध्ये येथे सुमारे १३२० ग्रॅम वजनाचा गणेशाचा सोन्याचा मुखवटा आणि २८० ग्रॅम वजनाचे गणेशाचे दागिने जमिनीत खोदकाम करताना सापडले आणि दिवेआगर संपूर्ण राज्यात प्रसिद्धीच्या झोतात आले.
September 28, 2025