सागर आणि समुद्र पक्षी
Category:
कथा बाल-साहित्य साहित्य - ललितनाताळची सुटी लागली. सुटीत काय करायचे असा प्रश्न सागर, सीमा, परेश या मुलांपुढे पडला. सीमा म्हणाली, अभ्यासापेक्षा वेगळं काहीतरी करूया? परेश म्हणाला, संक्रांत येतेच आहे. आपणपतंग उडवू या. सागरने आकाशाकडे पाहिलं तर खरंच, काही मुलांनी पतंग उडवायला सुरुवातही केली होती. प्रत्येकाने पॉकेट मनीतले पैसे एकत्रित केले.