सट्खूळ
Category:
लेखसंग्रहमाझ्या लहानपणी सट्खूळ हा शब्द मी आईकडून, आज्जिकडून अनेक वेळा ऐकलाय. सट्खूळ म्हणजे शब्दशः सांगायचं तर, मुल सहा सात वर्षांचं झाल्यावर त्याला लागणारं खुळ. आता खुळ म्हणजे वेड लागणं किंवा खरोखर वेडं होणं असा अर्थ करून घेऊ नका अगदी. तर असं हे सट्खूळ, ठराविक वयात लागतं आणि निघूनही जातं. मुलं मोठी झाल्यावर त्यांना हे सांगितलं की, आपले प्रताप ऐकून ती खूप हसतात…..पण खुळावल्यासारखी नाही बरं…..