माध्यमांचे अंतरंग एक दृष्टिक्षेप
Category:
लेखसंग्रहमाणूस आणि जीवसृष्टीतील इतर प्राणीमात्र यात एकच मोठा फरक आहे तो म्हणजे माणसात जिज्ञासा अथवा कुतुहल असते इतर प्राणीमात्रात ती नाही. या जिज्ञासेपोटी माणूस विचार करीत गेला आणि त्याचा मेंदू अधिक तल्लख झाला. माणूस केवळ स्वतः चा विचार करीत नाही तर इतरांचा, जीवसृष्टीचा व त्यापलीकडचाही विचार करतो. या मानवी जिज्ञासेतूनच माध्यमांचा जन्म झाला. ‘माध्यम’ हा शब्द मुळात ‘मिडियम’ या असिरिअन शब्दापासून तयार झालेला आहे.