साहित्य - ललित

ज्योत

Category:

 

श्रीमद् भगवद्गीतेतील हा श्लोक…. याचा अर्थ असा की निवा-यातील दिव्याची ज्योत जशी स्थिर असते तसेच चित्त, आत्मयोगाचे अनुष्ठान केलेल्या योगी मनुष्यास लागू पडते..

  May 13, 2021


साहित्य - ललित

हमने तुमको देखा !

Category:

 

मित्र झळकीकरच्या बरोबर कॉलेजच्या पायवाटेवर ऋषीचा पाहिलेला पहिला पिक्चर ! (अंहं – बॉबी खूप नंतर पाहिला आणि जोकरही) तेव्हापासून याला आम्ही पाहिलं अगदी शेवटच्या “मुल्क ” पर्यंत ! सुमारे ४०-५० चित्रपट या कलावंताचे मी आजवर पाहीले असतील आणि एकच केलं – आमच्या देव्हाऱ्यात दाटिवाटीत त्याला बसविले , शेजारच्या अमिताभ नामक कुलदैवताला धक्का न पोहोचविता !

  May 12, 2021


साहित्य - ललित

मी व माझा मामा (कथा)

Category:

 

आयुष्य हे कधीच न संपणारे कोडे आहे आणि मला तर ते कधीच सोडवता येणार नाही म्हणून हताश होऊन बाकावर बसलो होतो, तर अचानक दिलीप दिसला, ताईचा मुलगा,माझा भाचा. खूप हुशार मुलगा, गेल्यावर्षी सातवीच्या परीक्षेत पहिला आला तेंव्हा त्याला प्लेटो चं पेन बक्षीस देणार होतो, पण कसचं काय, प्लेटोच्या पेन पेक्षा पोटाची खळगी आणि ती भरण्याची पेन प्रचंड मोठी होती.

  May 12, 2021


लेखसंग्रह

गोष्ट सांगा आणि गणित शिकवा – ७

Category:

 

आत्ता पर्यंत: अंतराळात भ्रमण करून ज्ञानाच्या सीमा वाढवण्याच्या मोहिमेवर टीम पुणेला आय आर एस आर्यभट्टवर कॅप्टन नेमोंनी सहकारी म्हणून स्वीकारलं होतं. सध्या त्रिकोणी ग्रहावर… एरेटॉसथिनिस काका…

  May 12, 2021


साहित्य - ललित

लेडी विथ द लॅम्प

Category:

 

१८२० साली इटलीमध्ये फ्लाॅरेन्स येथे नाइटिंगेलचा जन्म झाला. वयाच्या ३३व्या वर्षी १८५३ मध्ये झालेल्या क्राइमियन युद्धात जखमी झालेल्या सैनिकांची तिने अहोरात्र शुश्रुषा केली. रात्री हातात दिवा घेऊन जखमी सैनिकांना शांत झोप लागली आहे का? हे ती प्रत्येक खाटेजवळ जाऊन पहात असे. इतकी तिने त्या जखमी सैनिकांची सेवाभावाने काळजी घेतली म्हणून तिला ‘लेडी विथ द लॅम्प’ असे संबोधले जाऊ लागले.

  May 12, 2021


नॉस्टॅल्जिया

शाळा हेच आमचे समाज माध्यम..

Category:

 

तेंव्हा शिक्षकाजवळ छडी असायचीच आज जसं मोबाईल असतो तशी.. त्या छडीमुळेच तर व्हायरल व्हायचे आमचे पराक्रम.. त्या छडीचीच फ्रेन्ड रिक्वेस्ट यायची आमच्या पाठीवर.. मग काय.. त्यात वेगवेगळे राग, आलाप, ताना घेऊन सुरु व्हायचे संगीत.. थोडी धूसफूस.. हे आमचं फेसबुक.. बुकात फेस लपवून फुंदत-फुंदत रहायचं कितीतरी वेळ.. थोड्या वेळात सारं विसरलं जायचं… आजही हे आठवलं की हसू आवरता येत नाही. सगळं आमच्या सोशल मिडिया मध्ये लोकप्रिय होतं.. कारण शाळा हेच आमचं समाज माध्यम होतं.. प्रभावी !!!

  May 12, 2021


लेखसंग्रह

सूर बदला, जग बदलेल

Category:

 

बोलक्या गाण्यांचा जसा एक “सुर” असतो तसा आपल्या सर्वांच्या बोलण्याचा पण “सुर” ( tone ) असतो उदा: तिरसट, टोचुन बोलण्याचा, राग, प्रेम, तिरस्कारपुर्ण, अलिप्ततापुर्ण, उपहासात्मक, आदरपुर्वक वगैरे. आपल्या बोलण्यामध्ये असल्या भावनांचा परिणाम लगेच संवादामध्ये होऊ न देतां सुर जर सामान्य अर्थात मृदु ठेवला तरी बरेंच काही साध्य होऊ शकते. सुदैवाने गोड बोलायला काही मेहनत पडत नाही व पैसेही पडत नाही, फक्त तशी खुणगांठ मात्र मनांत सतत लक्षांत ठेवावी लागते.

  May 12, 2021


लेखसंग्रह

लेडी विथ द लॅम्प’

Category:

 

परिचारिकेला इंग्रजीमध्ये नर्स म्हटले जाते. डाॅक्टरच्या हाताखाली नर्स, ही मदतनीस म्हणून काम करीत असते. पेशंटला हाॅस्पिटलमध्ये दाखल केल्यापासून नर्स त्या पेशंटची काळजी घेत असते. डाॅक्टरांची व्हिजीट झाल्यावर त्यांनी सांगितलेल्या सूचनांनुसार पेशंटला इंजेक्शन, औषधे वेळेवर देण्याचे काम नर्सचे असते. पेशंटच्या हाकेला नर्सच धावून येत असते. पेशंट बरा झाल्यावर तो घरी जातो. पेशंट नर्सच्या संपर्कात राहिल्यामुळे ती त्याला सहसा विसरत नाही. तिच्या सेवाभावी वृत्तीमुळे दोघांत एक जिवाभावाचं नातं निर्माण झालेलं असतं.

  May 12, 2021