No Picture
व्यक्ती-परिचय

माझे आदरणीय गुरुजी पं. दिनकर पणशीकर

Category:

 

पणशीकर गुरुजी म्हणजे भारतीय अभिजात संगीतातील एक प्रयोगशील आणि एका वेगळ्या पद्धतीने हे अभिजात संगीत समृद्ध करणारे एक व्यक्तीमत्व आहे. व्याकरण, ज्योतिष, भाषा, कीर्तन इ. चा मोठा कौटुंबिक वारसा लाभलेल्या गुरुजींचा लहानपणापासूनच संगीताकडे ओढा होता. गुरुजींचे आजोबा व वडील हे संस्कृत पंडित तर एक ज्येष्ठ बंधू नटवर्य प्रभाकर पणशीकर आणि दुसरे दाजीशास्त्री हे पुराणकाल अभ्यासक असताना याच कुटुंबातील गुरुजींनी मात्र संगीताची वेगळी वाट शोधली.

No Picture
लेखसंग्रह

काय आहे ऑफिस कोल्ड आणि कसा कराल यापासून बचाव?

Category:

 

जर तुम्हाला तुमच्या ऑफिसमध्ये सतत जास्त थंडी जाणवत असेल तर आपण वेळीच सावध झालं पाहिजे कारण नेहमीच असं होतं की जेंव्हा आपण ऑफिस बाहेर येतो तेंव्हा लगेचच तुम्हाला नॉर्मल वाटू लागतं. अनेकदा ऑफिसमध्ये काम करत असताना सर्दी होणे, शिंकणे, खोकला या गोष्टी अनेक लोकांना होतच असतात. पण जर तेच थोडावेळ ऑफिसच्या बाहेर आल्यावर लगेच बरं वाटतं. हे सगळं जर तुमच्या बाबतीत घडत असेल तर तुम्ही ऑफिस कोल्डने ग्रस्त असल्यामुळे होतं आहे.

No Picture
लेखसंग्रह

मॅनहॅटनहेंज.. मॅनहॅटन.. न्यूयॉर्क.. अमेरिका

Category:

 

या सूर्यास्ताला ‘मॅनहॅटनहेंज’ म्हटलं जातं. याला मॅनहॅटन सोल्स्टाईस असंही म्हटलं जातं. असा हा सूर्यास्त वर्षातून दोन वेळा होतो … मे महिन्याच्या शेवटच्या आठवडयात आणि जुलैच्या दुसऱ्या आठवडयात. अगदी असाच… वर्षातून दोन वेळा त्याच पॉईंटला सूर्योदय देखील होतो.

No Picture
अवर्गिकृत

इंन्का साम्राज्याच्या राजधानीत – कुझ्कोत

Category:

 

दक्षिण अमेरिकेची कुठलीही चित्रे पाहिलीत तरी माचूपिचूचे चित्र बघायला मिळणारच. किंबहुना माचूपिचूशिवाय दक्षिण अमेरिका ट्रीप पूर्ण होऊच शकत नाही म्हणा !त्यामुळे आमचा पुढचा टप्पा ’पेरू’.या देशातच इन्का संस्कृतीचे अवशेष असणारे माचूपिचू हे अत्यंत महत्त्वाचे स्थान.हे कुझ्कोपासून ८० किमी अंतरावर आहे त्यामुळे लीमा या राजधानीपेक्षा‘ इंन्कांची राजधानी कुझ्कोकडॆ’ आम्ही मोर्चा वळवला.

No Picture
साहित्य - ललित

किस्सा रघ्याचा !

Category:

 

दुपारची उन्ह करकर तापली होती. रेल्वे स्टेशनच्या दादऱ्याखाली, ते दोन मळक्या, फाटक्या कपड्यातले भिकारी सावली धरून बसले होते. नुकतीच बाराची प्यासिंजर निघून गेली होती. ‘धंद्याच्या’ दृष्टीने त्यांचा हा ‘भाकड’ पिरेड होता. त्या मुळे ते दोघे ‘सुख -दुःखाच्या’ गप्पा मारत असावेत असे, पहाणाऱ्यांना वाटत होते. आणि ते खरे हि होते. ज्यास्त कमाई(विना सायास ) म्हणजे ज्यास्त सुख हे त्यांच्या जीवनाचे सूत्र होते! हाच त्यांच्या गप्पांचा विषय पण होता. 

No Picture
लेखसंग्रह

भारताचे अंतराळक्षेत्रातील स्थान

Category:

 

एकंदरीत भविष्य काळात अंतराळ ही देखील प्रमुख युद्धभूमी असेल हे लक्षात घेऊन भारताने केंद्रीय मंत्रिमंडळाच्या सुरक्षाविषयक बैठकीत देशाच्या स्वसंरक्षणासाठी ‘डिफेन्स स्पेस रिसर्च एजन्सी’च्या (डीएसआरए) स्थापनेचा खूप चांगला निर्णय घेतला. ही यंत्रणा अंतराळ युद्धासाठी आवश्यक असलेली शस्त्रात्रे व त्यासंबंधीचे तंत्रज्ञान विकसित करील. या संशोधनाच्या माध्यमातून ‘डिफेन्स स्पेस एजन्सी’ला सहाय्य करण्याचे काम (डीएसआरए) द्वारे केले जाईल. आणि भारताने घेतलेला निर्णय खरोखरच स्तुत्य आणि संरक्षण दृष्ट्या आवश्यक आहे.

No Picture
लेखसंग्रह

तुम्ही कॉफी पीता का?

Category:

 

एक बातमी – ‘गेली कित्येक वर्ष डॉक्टर सांगत आले आहेत की कॉफी शरीराला घातक असते. पण आता नवीन संशोधनानुसार कॉफी शरीरावर सकारात्मक परिणाम घडवू शकते असे लक्षात आले आहे.’