लेखसंग्रह

पावसाळ्यात आरोग्याची काळजी कशी घ्याल

Category:

 

पावसाळा सगळ्यांच्या आवडतीचा ऋतू असला तरी या दिवसांमध्ये अनेक आरोग्याच्या समस्या उदभवतात. मान्सून सुरू होताच आरोग्या बाबतीत समस्या डोकं वर काढतात. त्यासाठी पावसाळा सुरू होण्यापूर्वीच आपण आरोग्याची काळजी घेतली पाहिजे.

साहित्य - ललित

नऊवारी एअर होस्टेस

Category:

 

बाईंनी माईकवर जाहीर केल “सर्व अलौंन्समेंट म्हराटित होतील तवा समद्यांनी हित ध्यान द्यायाचय. पुन्ह्यांदा सांगन होनार न्हाई. डोईवरच प्यँनल घट लावा नाहीतर तुमच्या बँगा खाली घरंगळतील आनी कुनाची पन टकुर फुटतील. ” माझ्या प्रमाणे ईतरही उठले आणि भितीपोटी पँनल घट्ट बंद असल्याची खात्री करुन घेतली.

व्यक्ती-परिचय

भावगीतगायक जे. एल. रानडे

Category:

 

‘अति गोड गोड ललकारी’ या भावगीताने गायक जे. एल. रानडे हे नाव सर्वदूर पोहोचवले. स. अ. शुक्ल या कवीचे शब्द, भीमपलास रागात बांधलेली चाल आणि जे. एल. रानडे यांचा स्वर यांमुळे या गीताने जाणकारांचे चांगलेच लक्ष वेधले. गजानन वाटवे, जी. एन. जोशी व जे. एल. रानडे या तिघांच्या गाजलेल्या गाण्यांत- म्हणजे ‘रानारानात गेली बाई शीळ’, ‘वारा फोफावला’ व ‘गोड गोड ललकारी’ यांत वायु(तत्त्व) समान होते.

लेखसंग्रह

रात्रीच्या जेवणातील ‘या’ चूकांमुळे वाढतो लठ्ठपणा

Category:

 

रात्रीचे जेवण पचायला हलके व दिवसापेक्षा कमी प्रमाणात घेतले पाहिजे. रात्रीच्या आहारात विशेष काळजी घेणं गरजेचे आहे. वजन कमी करण्याचा मानस असल्यास रात्रीच्या जेवणातील पुढील गोष्टीची काळजी घ्या.

साहित्य - ललित

मुंगळा

Category:

 

मुंगीचे मिस्टर कोण आणि मुंंगळ्याची मिसेस कोण? या बालवयात निरागस जिज्ञासेपोटी विचारलेल्या माझ्या संयुक्त प्रश्णावर मास्तर खूपच कावले आणि निरुत्तर होउन उत्तरापोटी त्यांनी मला तास संपेपर्यंत वर्गाच्या दारात अंगठे धरुन उभे रहायची शिक्षा ठोठावली. शिक्षेच्या अम्मलबजावणीत केलेला माझा अगाउपणा माझ्या चांगलाच अंगाशी आला.

लेखसंग्रह

यशाचा निर्मळ झरा…….

Category:

 

जगात जन्माला आलेल्या प्रत्येक व्यक्तीला काहीतरी नवीन करण्याची धडपड असते. आणि ते साध्य करण्यासाठी प्रयत्नही तेवढेच करतात. पण प्रत्येक व्यक्तीला अपेक्षित यश मिळणार असे नसते तर कधीकधी अपयशाला ही सामोरे जावे लागते, पण त्या अपयशाला खचून न जाता जिद्द चिकाटीने आपल्या यशाची नौका पैलतीरी नेली पाहीजे.

साहित्य - ललित

पुण्यातील संगीत महोत्सव

Category:

 

गणपती, दसरा- दिवाळी या सणासुदीच्या दिवसांनंतर पुण्यात संगीताचे वेगवेगळे महोत्सव एकानंतर एक चालु असतात. सवाईगंधर्व भीमसेन संगीत महोत्सव, स्वरगंधार आणि शेवटी वसंतोत्सव. सवाईच्या सीझन तिकीटसाठी आतुन फिल्डिंग लावल्यास लाईनमधे उभे राहण व निराशा टाळता येउ शकते, स्वर गंधारमधे स्टुडंट डिस्काउंट असते तर वसंतोत्सव चक्क फ्रीच असतो. तिन्ही कार्यक्रमांसाठी खचाखच गर्दी होत असते. झुंडीने होणार्या ह्या गर्दीत दर्दी आणि “बेदर्दी” दोन्ही गटांचे सभासद आढळतात.

साहित्य - ललित

मुलाखत

Category:

 

साठी उलटली तरी माझ्या मित्रांना माझा मामा करण्यातच धन्यता वाटते. मी मुलाखत घ्यायची आणि ती सुध्दा एखाद्या प्रथितयश रागदारी गायकाची! संगीतातल ज्ञान तर सोडाच पण ज्या विषयात मी काठावरही पोहू शकत नाही हे माहीती असुनही मुद्दाम पुण्यातील एका प्रख्यात गवयाची मुलाखत घेण्यासाठी त्यांनी माझी व त्यांची वेळ परस्पर बुक करुन टाकली.

व्यक्ती-परिचय

भालचंद्र दिगंबर उर्फ आबासाहेब गरवारे

Category:

 

आबासाहेब गरवारे यांना नक्कीच महाराष्ट्राच्या औद्योगिक विकासातील एक प्रमुख शिल्पकार म्हणून मानले जाते. गरवारे उद्योगसमूहाचे ते संस्थापक होते. शून्यातून उद्योग सुरू करून त्यांनी गरवारे मोटर्स, गरवारे नायलॉन्स, गरवारे प्लॅस्टिक्स, गरवारे पेंट्स, गरवारे फिलामेंट कॉर्पोरेशन, गरवारे वॉल रोप्स अशा अनेक कंपन्या त्यांनी स्थापन केल्या.