आपल्या सर्वानाच माहित आहे की, आपले आरोग्य हे आपल्याच आहारावर अवलंबून असते. आपल्या प्रत्येक दिवसाची सुरूवात ही पोटभर नाश्ता करून झाली पाहिजे, संतुलित पोषण आहाराचा दुपारच्या जेवणामध्ये समावेश आणि रात्रीचे जेवण पचायला हलके व दिवसापेक्षा कमी प्रमाणात घेतले पाहिजे. अशाप्रकारे पौष्टिक व संतुलित आहार योग्य वेळेवर घेतल्यास आपले शारीरिक स्वास्थ चांगले राखायला मदत होते. परंतु सध्याच्या धावपळीच्या जीवनात हे चक्र बरोबर उलटं झालेले आपल्याला आढळून येते. खूप जण वेळ नसल्यामुळे सकाळचा नाश्ताच करत नाहीत, दुपारी खूप कमी प्रमाणात खाल्लं जात आणि रात्री उशिरा जास्त प्रमाणात पचायला जड असं जेवण घेतलं जातं. आपल्या ह्या बदलत्या जीवनशैलीमुळे आपल्या आरोग्यावर मात्र विपरीत परिणाम होताना आढळून येतात. थोडक्यात काय, जेवण्याच्या अयोग्य सवयी आणि वेळा यामुळे आपलं वजन अतिरिक्त वाढतं. तसेच अनेक शारीरिक समस्याही निर्माण होतात. म्हणूनच आहारात योग्य बदल करणे आवश्यक आहे, तसेच रात्रीच्या आहारात विशेष काळजी घेणं गरजेचे आहे. वजन कमी करण्याचा मानस असल्यास रात्रीच्या जेवणातील पुढील गोष्टीची काळजी घ्या.
रात्रीच्या जेवणातील ‘या’ चूकांमुळे वाढतो लठ्ठपणा
रात्रीचे जेवण पचायला हलके व दिवसापेक्षा कमी प्रमाणात घेतले पाहिजे. रात्रीच्या आहारात विशेष काळजी घेणं गरजेचे आहे. वजन कमी करण्याचा मानस असल्यास रात्रीच्या जेवणातील पुढील गोष्टीची काळजी घ्या.