साहित्य - ललित

…आणि चष्मा लागला

Category:

 

स्थळ ठाणे रेल्वे स्टेशनचा तीन नंबरचा फलाट. तीन नंबरवर येणारी गाडी मी दोन नंबर फलाटावरच येते आहे असे समजून गाडी येणार्‍या फलाटाच्या कडेला जाउुन वाकून बघत होतो. एवढयात दिन्याने नुकत्याच खाल्लेल्या सुप्रसिद्ध कचेरी मिसळीचे उपकार विसरून मी आंधळा असल्याचे फलाटाच्या त्या गर्दीतच जाहीर केले.

कथा

गोष्ट वाईट मुलाची आणि गोष्टीतला वाईट मुलगा

Category:

 

तो एक वाईट मुलगा होता . ‘आदर्श कथा ‘ मधल्या वाईट मुलाच्या गोष्टीतल्या सारखाच . गोष्टीतल्या मुलाचे नाव राम असते ,पण याचे नाव शाम होते . गोष्टीतल्या गोष्टी सारखी याची परिस्थिती कधीच नव्हती . म्हणजे गोष्टीतल्या रामाची आई , म्हातारी , थकलेली , अंथरुणाला खिळलेली . ‘ आता माझ मरण जवळ आलंय ! माझ्या माघारी तुझं कस होणार ?तुला कोण पहाणार ? तुझे लाड कोण करणार ? तू शाळेतून आल्यावर तुला -गाजर का हलवा -कोण करून देणार ? तुला झोपताना अंगाई कोण म्हणणार ? ‘असं म्हणून घळाघळा रडणारी असते . ( तशी ती लवकर मरत नाही म्हणा ! )