बाळक्रीडा अभंग क्र.१८

बाळक्रीडा अभंग क्र.१८

संत तुकाराम महाराज यांनी श्री भगवान श्रीकृष्ण यांचे बालपणाचे वर्णन करणारे जे अभंग आहेत, त्या अभंगाला बाळक्रीडा अभंग असे शिर्षनाम देण्यात आलेले असून त्या अभंगांना वारकरी सांप्रदायात फार मोठ्या प्रमाणात गायिल्या जात असतात. हे बाळक्रीडा अभंग ४२ असून त्या सर्व अभंगांना (माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम काहीं कळा ||धृ||) हे गाताना एकाच धृपद लावले जाते.



लीळाविग्रही तो लेववी खाववी । यशोदा बैसवी मांडीवरी ॥१॥
मांडीवरी भार पुष्पाचिये परी । बैसोनिया करी स्तनपान ॥२॥
नभाचाही साक्षी पाताळापरता । कुर्वाळिते माता हाते त्यासि ॥३॥
हाते कुर्वाळुनी मुखी घाली घास । पुरे म्हणे तीस पोट धाले ॥४॥
पोट धाले मग देतसे ढेकर । भक्तीचे ते फार तुळसीदळ ॥५॥
तुळसीदळ भावे सहित देवा पाणी । फार त्याहुनि क्षीरसागरा ॥६॥
क्षीराचा कांटाळा असे एकवेळ । भक्तीचे ते जळ गोड देवा ॥७॥
देवा भक्त जिवाहुनि आवडती । सकळ हि प्रीति त्यांच्या ठायी ॥८॥
त्यांचा हा अंकित सर्व भावे हरि । तुका म्हणे करी सर्व काज ॥९॥
माझी वाणी तुझे वर्णी गुण नाम | ऐसें देईं प्रेम कांहीं कळा ||धृ||

Author