सावज
Category:
साहित्य - ललितसन सेट ‘पाहण्यासाठी साक्षी रिसोर्ट मधून निघाली तेव्हा संध्याकाळचे पाच वाजले होते . रिसॉर्ट पासून समुद्र किनारा फक्त दोन किलोमीटर होता . संध्याकाळच्या थंड वातावरणात बहुतेक पर्यटक पायीच समुद्रा पर्यंत जात . रिसॉर्ट समोरचा छोटासा रस्ता थेट समुद्राला जाऊन भिडत होता . मध्ये खूप झाडी होती पण रात्री सात -आठ पर्यंत माणसांची वर्दळ चालू असे . पाचव्या मजल्यावरून साक्षी ग्राउंड फ्लोअरला अली तेव्हा तिच्या लक्षात आले कि मोबाईल रूम मधेच विसरलाय . ती परत लिफ्ट कडे गेली तर लिफ्ट बंद होती . लाईट गुल झाले होते ! . आता पुन्हा पाच मजले चढायचे आणि उतरायचे तिच्या जीवावर आले .’ तासा दीड तासांचा तर प्रश्न होता . साडे सहाला जरी परत निघालोतरी सात सव्वासात पर्यंत रिसॉर्टला परतु . मग निवांत ग्यालरीत बसून कोल्डकॉफी एन्जॉय करू . इथली कॉफी मात्र भन्नाट असते !’ असा काहीसा विचार करत साक्षी झाडीच्या रस्त्याला लागली .