व्यक्ती-परिचय

अरविंद गोपीनाथ देशपांडे

Category:

 

सहकार क्षेत्रात गेल्या पंचवीस वर्षांत अनेक उच्च पदांवरील कामाचा अनुभव

व्यक्ती-परिचय

अरविंद टिकेकर

Category:

 

अरविंद टिकेकर मुंबई विद्यापीठाच्या गंथालयाचे मुख्य गंथपाल म्हणून इतरांसमोर प्रकाशात आले. या मानाच्या पदावरून निवृत्त झाल्यानंतरही ते त्यांच्या आवडीच्या गंथपालन शास्त्रात मन:पूर्वक रमले होते. किंबहुना, नोकरीपेक्षाही अधिक व्यग्र झाले होते. ज्ञानक्षेत्रातली वाटचाल टिकेकरांच्या रक्तात वारसाहक्कानेच आली होती. त्यांचे काका श्री. रा. टिकेकर यांचा विविध विषयांमधला अधिकार, त्यांची चिकित्सावृत्ती आणि अभिजात अभिरुची यांचा संस्कार अरविंद आणि अरूण या दोन्ही भावांवर झाला. अरविंद टिकेकर यांची गंथपाल म्हणून जी जडण-घडण झाली तीच मुंबई विद्यापीठाचे दंतकथा बनलेले मुख्य गंथपाल प्राध्यापक दारा मार्शल यांच्या हाताखाली. टिकेकर यांनी मार्शल यांचा हा वारसा सांभाळला, संपन्न केला.

व्यक्ती-परिचय

अभिजित घोरपडे

Category:

 

अभिजीत घोरपडे हा निसर्गाविषयी अभिरूची असलेला एक तरूण पत्रकार, निसर्गतज्ञ, व हवामानाचे अचूक मोजमापन व त्यांसंबंधीचे शास्त्रीय विश्लेषण लोकसत्ता वृत्तपत्राद्वारे वाचकांपर्यंत सोप्या शैलीत पोहोचविणारा लेखक आहे. जीवनात आतापर्यंत कितीतरी बहुआयामी कामे त्याने केलेली आहेत. काही त्याच्यामधील आभ्यासु विद्यार्थ्याला वाव देणारी, काही त्याच्यामधील प्रतिभावंत कलाकाराला न्याय देणारी तर काही त्यांच्या मधील चळवळ्या समाजसेवकाला अधिक परिपुर्ण बनविणारी. अभिजीत घोरपडे हा अतिशय दक्ष व सतत डोळ्यात तेल घालून सामाजिक अस्मितेचे रक्षण करणारा धडाडीचा पत्रकार असण्याबरोबरच तो त्याला शाहारून टाकणार्‍या सूंदर पक्ष्यांचा, प्राण्यांचा व नद्यांचा सच्चा मित्रदेखील आहे.

व्यक्ती-परिचय

अभिजीत मुळ्ये

Category:

 

आरोग्यविषयक विपुल व वैविध्यपुर्ण लेखन करून अनेक कौटुंबिक जोडप्यांच्या जीवनांमध्ये लक्षवेधी सुधारणा करणार्‍या निवडक काही तरूण पत्रकारांमध्ये अभिजीत मुळ्ये यांचे नाव घेता येईल. पत्रकारितेच्या आपल्या प्रदीर्घ कालावधीमध्ये त्यांनी विवीध पदांवर व विभीन्न जबाबदार्‍यांवर आवडीने काम केले, असले तरी आरोग्याच्या सर्वांगीण विकासाच्या संकल्पनेभोवती फिरणार्‍या घटकांवर माहितीपर लेखन करणे हा त्यांचा विशेष जिव्हाळ्याचा प्रांत आहे. लहान असताना प्रत्येक गोष्टींवर चौफेर विचार करणार्‍या अभिजीत यांनी आपल्यातल्या जिज्ञासु पत्रकाराला अवांतर वाचनाद्वारे व सुक्ष्म निरीक्षण शक्तीद्वारे आकार दिलेला होता.

व्यक्ती-परिचय

अनंत माधव क्षीरसागर

Category:

 

अनंत माधव क्षीरसागर हे मिशीगनमध्ये आपल्या कर्तुत्वाचा झेंडा मानाने फडकविणारे व मराठी पाण्याची गोडी आणि खोली यांची जाणीव सातासमुद्रापार पोहोचविणारे एक अत्यंत बुधिमान व विचारशील व्यक्तिमत्व आहे. त्यांचा जन्म 16 ऑगस्ट, 1931 रोजी झाला. स्वातंत्र्यपुर्व काळात जन्मलेल्या अनंत यांनी भारताचा तो स्वातंत्र्यसंग्राम अगदी जवळून पाहिला आहे.

व्यक्ती-परिचय

अनिल यादवराव निमगाडे

Category:

 

अनिल यदाओराव निमगाडे यांचा जन्म अमरावती जिल्ह्यात 24 जानेवारी, 1972 रोजी झाला. अतिशय धार्मिक वृत्तीचे व आहाराने शुध्द शाकाहारी असलेले निमगाडे एक प्रतिष्ठीत क्रीडा अधिकारी आहेत.

व्यक्ती-परिचय

अनंत घोगळे

Category:

 

अभिनयापासून नाट्यस्पर्धांच्या आयोजनापर्यंत अनेक भूमिकांत रमणारे अनंत घोगळे हे एक वल्ली आहेत. नाट्यचळवळीची गौरवशाली परंपरा अखंड सुरू राहावी म्हणून अनेकजण धडपडत असतात. काही पडद्या समोर तर काही मागे! जे सतत प्रकाश- झोतात असतातत्यांना प्रसिद्धीचं वलय लाभतं, पडद्या-मागचे कलाकारांच योग्दान मात्र दुर्लक्षितच राहतं. ‘औट घटकेच्या’ या नाट्यावकाशात काही मंडळींनी ही तफावत मनोमन स्वीकारलेली असते. त्यांच्या दृष्टीने नाट्यसेवा हे एक प्रकारचं व्रत असतं. घेतला वसा टाकणार कसा, असाच त्यांचा बाणा असतो.

व्यक्ती-परिचय

अण्णाभाऊ साठे

Category:

 

संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जर डोळय़ांसमोर आली तर, या चळवळीत योगदान दिलेले शाहीर त्यांच्या कर्तृत्वाने डोळय़ांसमोर उभे राहतात. शाहीर गवाणकर, शाहीर अण्णाभाऊ साठे, शाहीर आत्माराम पाटील, शाहीर चंदू भराडकर, जंगम स्वामी, शाहीर लीलाधर हेगडे, शाहीर कृष्णकांत जाधव अशा अनेक लोककलावंतांनी संयुक्त महाराष्ट्राची चळवळ जागवली.