बाबु घोलप

बाबु गणपत घोलप यांच्या शैक्षणीक कारकिर्दीवर नुसती धावती नजर जरी टाकली, तरी त्यांच्या प्रखर बुध्दीमत्तेची व सर्वांगिण क्षमतांची पोच, तसेच आभ्यासाप्रती त्यांनी दाखविलेल्या निष्ठेची खोली त्वरीत ध्यानात येते. बीड जिल्ह्यातील लिंबागणेश या लहानश्या तालुक्यात, 1 मे, 1978 रोजी जन्मलेल्या घोलपांनी विद्येसाठी भरपुर कष्ट उपसले.



बाबु गणपत घोलप यांच्या शैक्षणीक कारकिर्दीवर नुसती धावती नजर जरी टाकली, तरी त्यांच्या प्रखर बुध्दीमत्तेची व सर्वांगिण क्षमतांची पोच, तसेच आभ्यासाप्रती त्यांनी दाखविलेल्या निष्ठेची खोली त्वरीत ध्यानात येते. बीड जिल्ह्यातील लिंबागणेश या लहानश्या तालुक्यात, 1 मे, 1978 रोजी जन्मलेल्या घोलपांनी विद्येसाठी भरपुर कष्ट उपसले. आपल्या शैक्षणीक जीवनामध्ये बौधिक व शारिरीक
क्षमतांचा कस बघणार्‍या कित्येक, विवीधांगी शैक्षणीक विषयांची दालने, अगदी सहजतेने त्यांनी पालथी घातली व या प्रत्येक विषयाच्या आतल्या सुक्ष्म सौंदर्याचा हिरीरीने आस्वाद घेवून, आपल्या यशाचा नंदादीप सतत तेवता ठेवला.

दहावी व बारावी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केल्यानंतर, बी. ए.[मराठी, अर्थशास्त्र, व राज्यशास्त्र हे विषय घेवून], एम. ए.[राज्यशास्त्र व मराठी घेवून], बी. एड.[मराठी व इतिहास घेवून] पी. एच. डी., सी. सी. सी. ओ. ही संगणक परीचलनाशी संबंधित असलेली स्पर्धात्मक परीक्षा, व सी. सी. आय. टी. ही माहिती तंत्रज्ञानाशी हितगुज साधणारी परीक्षा, अशा नानाविध पदव्या व स्पर्धा परिक्षांच्या निकालावर त्यांचे नाव अग्रभागी झळकले. या त्यांच्या एकंदरीत शैक्षणीक आलेखाबद्दल असे म्हणावेसे वाटते की भाषाक्षेत्रात त्यांनी जेवढी उत्तम कारागिरी दाखविली, तेवढाच तीव्र ओढा त्यांचा विज्ञान व तंत्रज्ञानाकडे झुकणार्‍या वाटांकडेदेखील होता.

भाषा, विज्ञानामध्ये पुरेसे तज्ञत्व मिळावल्यानंतर, त्यांचे प्रतिभावंत हृद्य कला क्षेत्राकडेही वळले व भारतीय संगीत प्रसारक मंडळाकडुन घेतली जाणारी संगीत प्रवेशिका परीक्षा [ विषय- संवादिनी [हार्मोनियम] ] सुध्दा त्यांनी चांगल्या गुणांनी उत्तीर्ण केली. बाबु घोलप हे आता प्राध्यापक म्हणुन रूजु झाले आहेत व विद्यार्थ्यांना आभ्यासाची गोडी लावण्याव्यतिरीक्त, एक लेखक व व्हिडीयो एडिटर ह्या भुमिका सक्षमतेने करण्या इतके अष्टपैलुत्व त्यांनि नेहमीच जोपासले आहे.

Author