परिचय – परिक्षण

स्वातंत्र्य लढ्याबद्दलचा महत्त्वाचा दस्तावेज – ‘जिंकू किंवा मरू’

Category:

 

भारतीय स्वातंत्र्याचा इतिहास वेगवेगळ्या प्रकारच्या आंदोलनांनी भरलेला आहे. कायदेभंगाची चळवळ, अहिंसक सत्याग्रह, शत्रूला हिंसक मार्गाने संपवण्याची क्रांतिकारक चळवळ असे सारे प्रकार या स्वातंत्र्यलढ्यात अंगीकारण्यात आले. हा सगळा इतिहास आज उपलब्ध आहे तो निरनिराळ्या स्वरूपातील पुराव्यांच्या रूपाने. ‘चलेजाव’ची १९४२ सालातली चळवळ. हा स्वातंत्र्यचळवळीतील आंदोलनाचा शेवटचा टप्पा होता. इतर सर्व आंदोलनापेक्षा १९४२ ची चळवळ खूपच वेगळी होती. एकतर या चळवळीला एक असा नेता नव्हता, कारण गांधीजींपासून बहुतेक सारे महत्त्वाचे नेते तुरुंगात होते. भूमिगत नेते आणि कार्यकर्ते ही चळवळ चालवत होते. अंतिम टप्प्यात आलेले स्वातंत्र्य आंदोलन या शेवटच्या लढाईत तेजाळून उठले… योगोयोगाची गोष्ट म्हणजे, ऑगस्ट महिन्यात स्वातंत्र्य चळवळीशी संबंधित दोन महत्त्वाचे दिवस येतात. नऊ ऑगस्टला बेचाळीसच्या लढ्यानिमित्त साजरा होणारा क्रांतिदिन आणि पंधरा तारखेस स्वातंत्र्यदिन. स्वातंत्र्य चळवळीची आठवण जागवणाऱ्या एका पुस्तकाबद्दल जाणून घेणे म्हणूनच अगत्याचे ठरेल.

परिचय – परिक्षण

सुवर्णमुद्रा – लखलखती सोनेरी वाटचाल – दाजीकाका गाडगीळ

Category:

 

पु. ना. गाडगीळ आणि कंपनी या पुण्यातल्या सराफी पेढीचे आधारस्तंभ, नव्वदीतही तरुणाईला लाजविणारा उत्साह अंगी असणारे अनंत गणेश ऊर्फ दाजीकाका गाडगीळ यांना वाहिलेला मानाचा मुजरा म्हणजे `सुवर्णमुद्रा.’ दाजीकाकांचे नातू सौरभ गाडगीळ यांच्या आग्रहातून तयार झालेल्या उत्कर्ष प्रकाशनच्या या देखण्या पुस्तकाला शब्दसाज चढविला आहे, सहजसुंदर भाषाशैली असलेल्या मंगला गोडबोले यांनी.

परिचय – परिक्षण

राष्ट्रीय धोरण जपताना नुतन अर्थव्यवस्थाही महत्त्वाची

Category:

 

अमेरिका आणि चीन ही राष्ट्रे सातत्याने राष्ट्रीय धोरणांवर लक्ष केंद्रीत करून असतात. आपल्या अर्थव्यवस्थेला कशाप्रकारे बळकटी आणि नवीन बाजारपेठ मिळेल यावर ही राष्ट्रे सतत काही ना काही धोरणे राबवताना दिसतात. आपल्या अर्थव्यवस्थेला आणि एकूणच राष्ट्रीय हिताला साजेशे निर्णय अमेरिका आणि चीन ही राष्ट्रे घेत असतात.

परिचय – परिक्षण

पैसा झाला मोठा

Category:

 

सतराव्या-अठराव्या शतकात नाणी वा कागदी नोटांच्या स्वरूपातला पैसा आजच्याप्रमाणे सरसकट वापरात नव्हता. अनेक आर्थिक व्यवहार वस्तूंच्या प्रत्यक्ष देवाण-घेवाणीतून केले जात. सोन्या-चांदीच्या नाण्यांचा उपयोग मुख्यत: व्यापारी आणि राजांपुरता मर्यादित असे. आजच्या प्रमाणे प्रत्येक गोष्टीचे, वस्तूचे, सेवेचे मोल पैशांत करण्याची पद्धत नव्हती.

लेखसंग्रह

गुन्हेगार, दारूडे

Category:

 

काही वृत्तपत्रात ज्या बातम्या झळकल्या आहेत त्या धक्कादायक आहेत. तसेही आजकाल वृत्तवाहिन्यांची अमाप पीक आल्यापासून धक्कादायक बातम्यांमध्ये जाण राहीली नाही.

लेखसंग्रह

कुत्र्यांना धरावे की मारावे?

Category:

 

 रोगग्रस्त, पिसाळलेले आणि आक्रमक कुत्र्यांना तर नक्कीच ठार मारले पाहिजे. श्‍वान प्रेमिंनी कुत्र्यांवर प्रेम करण्यासोबत त्यांच्या पालनाचीही जबाबदारी घ्यावी. त्यांना जर कुत्र्यांवर एवढंच प्रेम करायच असेल तर त्याची किंमतही मोजायला तयार रहायला हव. मनुष्य हा प्रथम माणसांसाठी आहे. आपल्या देशात अनेक अनाथ मुले आहेत त्यांच्याबद्दल ही मंडळी सहानुभुती का दाखवित नाही?