व्यथा आता नडत नाही तुझ्यावर प्रेम करतो मी
कुणावरही चिडत नाही तुझ्यावर प्रेम करतो मी
तुझ्या श्वासात मी जगतो तुझ्या गंधात मी लपतो
कुणाला सापडत नाही तुझ्यावर प्रेम करतो मी
उन्हातान्हात फिरतो मी, कधी काटे तुडवितो मी
पिडा कुठली पिडत नाही तुझ्यावर प्रेम करतो मी
तुझ्या प्रेमामध्ये बाई किती आकंठ मी बुडलो
तसा कोठे बुडत नाही तुझ्यावर प्रेम करतो मी
तुझ्यावर प्रेम करतो मी, तुझ्यावर प्रेम करतो मी
नवे काही घडत नाही तुझ्यावर प्रेम करतो मी
— प्रदीप निफाडकर
Author
Post Views: 13