प्रा. नरहर रघुनाथ (न. र.) फाटक
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteप्रा. न. र. फाटक मराठीचे प्राध्यापक, प्रकांड पंडीत , पत्रकार , चरित्रलेखक , इतिहाससंशोधक, मराठी समीक्षक , संत साहित्याचे चिकित्सक होते. त्यांचे घराणे मुळचे कोकणातील ‘ कमोद ‘ गावातले होते.. त्यांनी न्यायमूर्ती महादेव गोविद रानडे यांचे आत्मचरित्र १९२४ साली लिहिले. ते १९४७ साली हैद्राबाद येथे झालेल्या मराठी साहित्य संमेलनाचे अध्यक्ष होते. प्रा. न. र. फाटक यांचे मराठी साहित्यात समीक्षक, विचारवंत , इतिहासकार म्ह्णून स्थान खूपच मोठे होते त्याचप्रमाणे त्यांची स्वतंत्र मते ही देखील वर्तमानाला धरून होती.