सुरीली’ सफर
Category:
साहित्य - ललितगुणगौरव’मध्ये जाहिरातींची कामं सुरु करण्याआधी आम्ही घरातूनच कामं करीत होतो. ऑर्केस्ट्राचं पहिलं काम केलं ते पपीशकुमार ललगुणकर यांच्या तिकीटाच्या डिझाईनचं. हत्ती गणपतीजवळ एक छोटा ‘लकी प्रिंटींग प्रेस’ होता. शहा व लाळे असे दोघेजण त्याचे पार्टनर होते. त्यांच्याकडे डिझाईनचं काही काम आलं की, ते आमच्याकडून करुन घ्यायचे.