साहित्य - ललित

फ्युज उडालेले बल्ब

Category:

 

शहरातील पाॅश एरियातील हाउसिंग सोसायटीमध्ये, रहायला येऊन मला पाच वर्षे झाली होती. मी भारतीय नौदलात पस्तीस वर्षे सेवा करुन निवृत्त झालो होतो. रोज सायंकाळी आम्ही आठ दहाजणं ज्येष्ठ नागरिक, सोसायटीच्या बागेत गप्पा मारत बसायचो. त्यामुळे वेळ मजेत जात असे.

गेल्या महिन्यापासून आमच्याच वयाची एक नवीन व्यक्ती आम्हाला बागेत दिसू लागली होती. ते गृहस्थ उंचेपुरे व धिप्पाड शरीरयष्टीचे होते. ते आमच्या समोरुन जाताना, आमच्याकडे तुच्छतेने पहात असत. बागेत दोन चकरा मारुन झाल्यावर कोपऱ्यातील बाकड्यावर, ते एकटेच बसत. कधी कुणाशी बोलणे नाही, कुणाला पाहून हसणं नाही.. आम्हा सर्वांना त्यांचं वागणं हे चमत्कारिकच वाटायचं..

  May 23, 2022


दिनविशेष

जागतिक कासव दिन

Category:

 

ग्रीन टर्टल म्हणजे हिरवे कासव. ते पिवळ्या, पांढऱ्या रंगाचे गुळगुळीत पोट असलेले व टणक पाठीचे दिसते. भारतात पूर्व व पश्चिम किनार्यारवर ते दिसून येते. हॉक्स बिल टर्टल म्हणजे चोचीसारखे तोंड असलेले कासव. याची लांबी १७० से.मी. व वजन ५०० ग्रॅम असते. पाठ मऊशीर आवरणाने झाकलेली असते. त्याचा जबडा कात्रीसारखा असतो. भारताच्या नकाशाच्या भूभागापासून थोडे दूर असलेल्या अंदमान आणि निकोबार बेटांवर ही कासवे आढळतात. कासवाच्या पाठीचा दागिन्यांसाठी वापर होत असल्यामुळे त्यांची संख्या कमी होत आहे.

  May 23, 2022


दिनविशेष

जावा प्रोग्रामिंग भाषेची पहिली आवृत्ती

Category:

 

जावा समजण्यासाठी सी शिकण्याची काहीच गरज नाहि. जावामध्ये इतर भाषांपेक्षा एक वेगळी खासियत आहे, ती म्हणजे जावा मध्ये एक विशिष्ट प्रोग्राम लिहिता येतो त्याला आपण अप्लेट (APPLET) असे म्हणतो. Applet ला इंटरनेट वरून डाऊनालोड केलं जाऊ शकतं किंवा एखाद्या वेब ब्राउजर मध्ये सुरक्षित रन करता येतं. पारंपारिक कॉम्पुटर मध्ये सुरक्षिततेविषयी समस्या होती. इंटरनेट वरील साईट आपल्या कॉम्पुटर ला जास्त एक्सेस करू शकत होती. परंतु जावाने या समस्येचे निवारण केले. जावा Applet च्या क्षमतेवर निर्बंध घालते. या मार्गाने जावा समस्येचे निवारण करते. एक जावा एप्लेट युजरच्या मदतीशिवाय हार्ड डिस्क मध्ये काहीही लिहू शकत नाहि. हे एप्लेट अनियंत्रितपणे कॉम्पुटर च्या मेमरी मध्ये काहीही लिहू शकत नाही आणि त्यामुळे कॉम्पुटर सुरक्षित राहतो.जावा मध्ये एप्लेट प्रमानेच अनेक वैशिष्ट्ये आहेत. त्यामध्ये सर्वात महत्त्वाचे आहे ते म्हणजे JVM

  May 23, 2022


लेखसंग्रह

जागतिक व्यंगचित्रकार दिन

Category:

 

१८९५ मध्ये पहि‍ले रंगीत व्यंगचि‍त्र द यलो कीड प्रकाशि‍त झाले होते, त्याची आठवण आणि‍ व्यंगचि‍त्रकलेचा गौरव म्हणून ५ मे हा जागति‍क व्यंगचि‍त्रकार दि‍न म्हणून साजरा करण्यात येतो. 

  May 22, 2022


लेखसंग्रह

संगीताचं विद्यापीठ – गांधर्व महाविद्यालय

Category:

 

संपूर्ण पारतंत्र्याच्या काळात पं. विष्णू दिगंबर पलुसकरांनी लाहोर शहरात गांधर्व महाविद्यालयाची केलेली स्थापना ही एक संपूर्ण स्वतंत्र घटना होती आणि पुढे त्यांच्या शिष्य-प्र-शिष्यांच्या रूपानं आणि देशात ठिकठिकाणी गांधर्व महाविद्यालयाच्या शाखांच्या रूपानं हेही दिसून आलं की, या कार्याचा व्याप एखाद्या विद्यापीठासारखाच आहे.

  May 22, 2022


साहित्य - ललित

जीना यहाँ, मरना यहाँ !

Category:

 

राज कपूर साठी रचलेल्या या गीतपंक्ती दोनदा खऱ्या ठरल्या – १९८७ साली त्याच्या मृत्यूच्यावेळी आणि आता २०१९ मध्ये त्याने निर्मिलेली हिंदी चित्रसंस्कृतीची वास्तू ” आर के स्टुडीओ “अस्तंगत होत असताना ! हे गीतकाराचे द्रष्टेपण म्हणायचे कां ? येणाऱ्या काळाची चाहूल इतकी आधी लागू शकते कां ? कदाचित हे चिरंतन सत्य काहींना आधीच कळत असावे.

  May 22, 2022


लेखसंग्रह

कन्नुदादा (एक काल्पनिक व्यक्तिचित्र)

Category:

 

कन्नुदादाशी आणि माझी ओळख कशी झाली, आणि तो आमच्याकडे कधीपासून येऊ लागला हे आता आठवतही नाही.  घरात काही मोठं काम करायला काढलं, म्हणजे संपूर्ण घराची स्वच्छता, माळ्यावरचं सगळं जड सामान काढून माळा स्वच्छ करून पुन्हा जागच्या जागी ठेवणे, घरात काही समारंभ असला किंवा लग्नकार्य असलं की सामानाची ने आण करणं अशा कामांसाठी मी त्याला मदतीला बोलावून घेत असे.

  May 22, 2022


साहित्य - ललित

पिठापूर – कुरवपूर यात्रा – भाग ८

Category:

 

आता मी तो फोटो नीट निरखून पाहिला, तर आजोबा वाटतील असे प्रेमळ भाव स्वामींच्या चेहऱ्यावर होते. खूप दिलासा आणि आपुलकी निर्माण झाली माझ्या मनात. मनोमन मी फोटोला नमस्कार करुन आईजवळ आले.

  May 22, 2022