लेखसंग्रह

आरक्षणाचे राजकारण!

Category:

 

इतर मागासवर्गीयांना उच्च शिक्षणसंस्थांमध्ये घटनेतील तरतुदीनुसार 27 टक्के आरक्षण देण्याची घोषणा मानव संसाधन विकासमंत्री अर्जुनसिंग यांनी केली आणि संपूर्ण देशातील वातावरण चांगलेच ढवळून निघाले. अर्जुनसिंगांच्या या निर्णयाला विरोध करण्यासाठी आरक्षण विरोधकांनी आंदोलनाचा मार्ग स्वीकारला. त्यात प्रामुख्याने वैद्यकीय शाखेच्या विद्यार्थ्यांचा समावेश आहे.

  May 21, 2006


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

घराच्या अंगणात

Category:

 

नेहमीसारखीच मी यवतमाळला गेले. मधून मधून चक्कर होते, कारण यवतमाळ माझं माहेर. पस्तीस वर्षांपूर्वी बाबांनी हे नवीन घर बांधलंय. पण आता ठरवलं, की या वेळी आपण जुन्या घरी जाऊ या, ज्या घरात माझा जन्म झाला. उमलत्या वयाची 17 वर्ष घालवली. त्या घराकडे या 35-40 वर्षांत आपण फिरकलोच नाही.

  May 15, 2006


लेखसंग्रह

रोग बळावतोय, उपचार बदला!

Category:

 

शेतकऱ्यांच्या वाढत्या आत्महत्यांना रोखण्यासाठी सरकारने विशेष पॅकेजची घोषणा केली. सरकार म्हणते त्याप्रमाणे पॅकेजची प्रभावी अंमलबजावणीदेखील सुरू झाली. परिणाम काय झाला तर शेतकरी आत्महत्येच्या बातम्या पूर्वी आठवड्यातून तीनचार दिवस उमटायच्या त्या आता दररोज उमटू लागल्या.

  May 14, 2006


लेखसंग्रह

स्वामीनाथनचे नक्राश्रू!

Category:

 

राष्ट्रसंत तुकडोजी महाराज विद्यापीठाच्या दीक्षांत समारोहात बोलताना राष्ट्रीय शेतकरी आयोगाचे अध्यक्ष डॉ. स्वामीनाथन यांनी ‘शेतकऱ्यांना वाचवा, शेती वाचवा’ , हा नारा घेऊन ठाामस्तरावर काम करण्याचे आवाहन केले. तत्पूर्वी पॅकेजने आत्महत्या थांबत नसतील तर कृषी धोरणाचा फेरविचार करावा लागेल, असे वत्त*व्य त्यांनी केले होते.

  May 7, 2006


साहित्य - ललित

सत्यम् शिवम् सुंदरम्

Category:

 

माणसाचं मन असतं कुठे? त्यात काय, काय असतं? ते सगळं आपल्याला कळतं का? माणूस मनाचा वापर करतो, की मन आपल्यावर स्वार होतं? असे एका ना दोन अनेक प्रश्न प्रदीर्घ काळ माझं मन कुरताडत असतं. अस्वस्थ करीत असतं. माझ्या वयाच्या अकराव्या वर्षी मी पहिली चोरी केली. एका पानटपरीवाल्याचे आठ रुपये पंचेचाळीस पैसे मी लांबविले. ती घटना मी विसरलो, असं समजत होतो. नित्यजीवनावर त्या घटनेचे काही परिणामही जाणवत नव्हते; पण दहा वर्षांच्या कालावधीनंतर जेव्हा मी त्या पानवाल्याकडे या चोरीची कबुली दिली, त्याचे पैसे दामदुपटीने परत केले तेव्हा कळलं, की माझी चोरी त्याला त्याचवेळी ज्ञात होती. तो काही बोलला नव्हता. त्या दहा वर्षांत त्यानं कधीही या घटनेची आठवणही मला करून दिलेली नव्हती. मी चोर नाही, माझा सद्सद्विवेक जागा आहे, असा त्याचा विश्वास होता. एका अर्थानं चूक कबूल केल्यानंतरही तोच जिंकला होता. एक साधा पानवाला; पण मनाच्या नीतळपणाची साक्ष तो अजूनही मला देत असतो.

  April 25, 2006