लेखसंग्रह

“मोले घातले रडाया….”

Category:

 

एखाद्या व्यत्त*ीचे निधन झाल्यावर त्याच्या आप्तस्वकीयांना दु:ख होणे स्वाभाविक असते. डोळ््यांतील अश्रूंची वाट मोकळी करून हे दु:ख व्यत्त* केले जाते. दु:खाचा तो स्वाभाविक उद्रेक असतो परंतु बरेचदा असेही आढळून येते की, मृत व्यत्त*ीशी कुठलेही भावनिक संबंध नसलेली माणसेही आपल्या न झालेल्या दु:खाचे अतिरेकी प्रदर्शन करीत असतात.

  June 25, 2006


लेखसंग्रह

कुणी न राहिला वाली!

Category:

 

यादेशाचे सर्वस्व कशात असेल तर ते शेतीत आहे आपल्या घामाने ही शेती कसणाऱ्या शेतकऱ्यात आहे. त्यामुळे शेती आणि शेतकरी हा विषय टाळून पुढे जाण्याचा प्रयत्न देशाच्या दृष्टीने आत्मघाताचाच ठरणार आहे. दुर्दैवाने या देशाचे धोरण ठरविणाऱ्या संसदेला, त्या संसदेचे नेतृत्व करणाऱ्या सरकारला याची जाणीव राहिलेली दिसत नाही.

  June 18, 2006


लेखसंग्रह

आत्महत्या ते नक्षलवाद!

Category:

 

एक भुकेलेला मुलगा काहीतरी खायला दे असे म्हणत आईकडे जातो. खरेतर कोणत्याही मातेसाठी लेकराच्या भुकेपेक्षा अधिक महत्त्वाचे काहीही नसते. ते नसायलाही नको असे समाज समजतो.

  June 4, 2006


साहित्य - ललित

आजचे रामशास्त्री

Category:

 

रोजचे वर्तमानपत्र उघडले रे उघडले, की बलात्कार, दरोडे, खून, लफडी, घोटाळे, अब्जावधी-कोट्यवधी बेनामी मालमत्तेचा पोलिसांनी लावलेला शोध, खोट्या चलनी नोटांचे कारखाने या अशा बातम्या वस्सकन अंगावर येतात. संघटित गुन्हेगारी, पोलीस खात्याची बदनामी हे विषय तर वर्तमानपत्रात रतीब घालणारे विषय झाले आहेत. रोज सकाळी वृत्तपत्र वाचून मन विषण्ण होते, सुन्न होते. काही इंग्रजी वृत्तपत्रांत, विशेषत या दैनिकांच्या रविवार पुरवण्यात स्वैर सेक्स, पोर्नोग्राफी यांना प्रतिष्ठा देणारे लेख वाचायला मिळतात.

  May 30, 2006


लेखसंग्रह

लाखमोलाचा प्रश्न!

Category:

 

सरकारने दाखविलेल्या ‘कापूस ते कापड’ या सोनेरी स्वप्नात हरवून गेलेला विदर्भातील कापूस उत्पादक शेतकरी जेव्हा वास्तवात परतला तेव्हा फार उशीर झाला होता. त्या स्वप्नाच्या धुंदीत त्याने खूप काही गमावले होते आणि नंतर गमाविण्यासाठी काही शिल्लक राहिले नाही तेव्हा तो आपला जीव गमावू लागला. रोजच्या आत्महत्या सुरू आहेत.

  May 28, 2006


साहित्य - ललित

वास्तव

Category:

 

मनातील वादळे तिथल्या तिथे शमविण्याचा प्रयत्न करणे, माझ्य मते न्याय्य होणार नाही. या वादळांना वाट मोकळी करून दिल्यास दिलासा मिळेल, अशी आशा वाटते. परवा नौशाद अली आमच्यातून गेले अन काय लिहू काय नाही असे वाटायला लागले. `न मिलता गम तो बरबादी के अफसाने कहाँ जाते? अगर दुनिया चमन होती तो विराने कहाँ जाते?’ असे म्हणून मनाची समजूत घालावी, की `सुहानी रात ढल चुकी, ना जाने तुम कब आओगी?’ असे म्हणत स्मृतींना उजाळा द्यावा? जन्नतमध्ये नौशादसाहेबांची मैफील शकील बदायुनी, शैलेंद्र, मदन मोहन, रफी यांच्यासोबत रंगेल का? अनेक वेड्या प्रश्नांनी भंडावून सोडणारे मन! बहिणाबाईंनी म्हटलेच आहे, `मन वढाय वढाय, उभ्या पिकातलं ढोरं, किती हाकला हाकला परी येत पिकावर!’ माणसाचे आयुष्य फारतर पाचपन्नास वर्षांचे.

  May 23, 2006