लेखसंग्रह

अतिरेक्यांना धन्यवाद!

Category:

 

हजारो पोलिसांना गडचिरोलीच्या जंगलात तैनात करूनही नक्षल्यांची ताकद कमी का होत नाही, या प्रश्नाचे उत्तर सरकारच्या या शेतकरी विरोधी धोरणातही शोधणे गरजेचे आहे. थोडक्यात सांगायचे तर अतिरेकी आणि नक्षल्यांच्या नावाखाली कुणाचे काही भले झाले असेल तर ते पोलिसात किंवा अन्य सुरक्षा यंत्रणेत दाखल झालेल्या बेरोजगार तरुणांचे, सुरक्षेची विविध साधने पुरविणाऱ्या कंपन्यांचे, वाहन उद्योगाचे आणि शस्त्रास्त्रे उत्पादन करणार्‍या कंपन्यांचे भले झाले आहे. बाकी सगळ्या समस्या जिथल्या तिथे आहेत.

  October 16, 2011


साहित्य - ललित

दोन क्षणिका – पोथी आणि तारे दिसले भर दुपारी

Category:

 

कोरा कागदात लक्ष्मी असते तो बाजारात विकला जातो , पण शाई लागलेला कागदात सरस्वती उतरते, तिची कीमत काय बाजारात….

  October 12, 2011


लेखसंग्रह

धोरण शेतकरी केंद्रित असावे !

Category:

 

आज गुजरात एक प्रगत राज्य म्हणविले जाते; कारण तिथला शेतकरी समृद्ध झाला आहे. गुजरातमध्ये भारनियमन नाही, शेतीसाठी भरपूर पाणी उपलब्ध करून देण्यात आले आहे आणि शेतकऱ्यांच्या मालाला उचित दाम मिळण्याची काळजी तिथले सरकार घेते, शासन आणि प्रशासन स्तरावर भ्रष्टाचार अगदी नसल्यातच जमा आहे. गुजरात सरकारने शेतकऱ्यांना जोडधंदे उभारण्यासाठी प्रोत्साहन दिले आहे. त्याचाही परिणाम शेतकर्‍यांच्या उन्नतीवर झाला आहे. हे आपल्याकडे का होऊ शकत नाही?

  October 9, 2011


लेखसंग्रह

गुटखा निर्मिती कंपन्यांमार्फत कायद्याची पायमपल्ली…कागदी वेष्टनाच्या आत प्लास्टिक आवरण

Category:

 

प्लास्टिकच्या अमर्याद वापरामुळे झालेल्या प्रदूषणाने भारतातील तमाम जनता त्रस्त झाली असतांना, काही प्रमाणात दिलासा देण्यासाठी सरकारने प्लास्टिकच्या वापरासंबधी काही नियम घालून दिलेत. परंतु या नियमातील त्रुटींचा आधार घेऊन गुटखा निर्मिती कंपन्यांनी पर्यावरणालाच धोका निर्माण केला.

  September 30, 2011


अध्यात्मिक-धार्मिक

अनुभवात ईश्वरी दर्शन !

Category:

 

प्रत्येक व्यक्तीचे अध्यात्मिक ध्येय असते की तिने त्या चैतन्यमय ईश्वरी शक्तीचे अस्तित्त्व जाणावे, अनुभवावे. कुणाला ईश्वर भेटला वा दिसला, ह्याची खऱ्या अर्थाने विचारवंताना देखील सत्यता पटलेली नाही. परंतु अनेक प्रसंगातून मात्र त्याच्या योजनेची शक्तीची कुशलतेची जाणीव निश्चित झालेली आहे.

  September 27, 2011


साहित्य - ललित

“टायपिस्ट” बायकोचा

Category:

 

आपल्या श्रीमतीची रेसिपीज टाईप करताना सुचलेली वात्रटिका, तशी ती माझ्या कविता कधीच वाचत नाही (माझे सौभाग्य), पण तिने ही वात्रटिका वाचली तर काय होईल…

  September 25, 2011


लेखसंग्रह

नोकरशाहीच आहे, ग्यानबाची मेख !

Category:

 

देशाला स्वातंत्र्य मिळून 64 वर्षे झालीत आणि तेव्हापासून एक रुपयातले 85 पैसे असेच मध्येच गडप होत आले आहेत, हा सगळा पैसा शेवटच्या घटकापर्यंत पोहचला असता तर आज भारतात गरिबी नावालाही शिल्लक राहिली नसती. किमान आता तरी सरकारने वेगळ्या दिशेने, वेगळ्या वाटेने विचार करायला हवा.

  September 25, 2011


साहित्य - ललित

आजी ग आजी!

Category:

 

सर्वाना आपली आजी खुप आवडत असते. जेथे फक्त प्रेम व माया भरपूर प्रमाणात तुमच्यावर सतत बरसत असते. त्यात कोणताच राग नसतो. शिस्त लावण्याची गरज भासण्याची वृत्ती नसते. कोणताही लोभ व्यक्त झालेला दिसत नाही. फक्त निर्मळ प्रेम. वासना विकार रहीत. कदाचित हे वयाचे व परिस्थितीचे गुणधर्म असू शकतील. आजी म्हणून ती जी भूमिका करते, ती एकदम त्यात एकरूप होऊन गेल्या प्रमाणे भासते. लहान मुलगी कुमारिका विवाहित स्त्री माता, ह्या सर्व भूमिका, तिने जगाच्या व्यासपिठावर केलेल्या असतात. तिने जीवनाचा संसारिक अनुभव अनेक प्रसंगातून घेतलेला असतो. आजपर्यंत ती जीवनाची गाठोडी, केवळ जमा करण्यातच व्यस्त होती. आज्ञा ऐकणे पाळणे, वा करणे, ह्याच कार्यचक्रात ती गुंतलेली होती. आता ती परिपक्व भूमिकेत आलेली आहे. येथे जे जे आजपर्यंत जमा केलेले होते ते सारे वाटीत जाणे आता तिचे काम झाले आहे. निसर्ग चक्रानुसार घटनाची सतत पुनुरावृती होत असते. तशाच गोष्टी थोड्याश्या फरकाने होत असतात. ज्या इतरांना सर्वस्वी नवीन व वेगळ्या वाटणाऱ्या असतात, त्याचा आंतरिक गुंता आजीच्या अनुभव चौकटी मधलाच असतो. त्यामुळे त्याचा धागा तिच्या लक्षात येत असतो. अनुभवाच्या मार्ग दर्शनाचे पैलू येथेच मदत करतात.

  September 24, 2011