कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

कुमार गंधर्व

Category:

 

कुमार गंधर्व म्हटलं की मला हेरॅक्लिटसची आठवण यायची. ”तुम्ही एकाच नदीत पुन्हा पुन्हा पाऊल टाकूच शकत नाही; तुम्ही एकदा पाऊल टाकलं की पुन्हा पाऊल टाकेपर्यंत तिचं स्वरुप बदललेलं असतं” असं हेरॅक्लिटस म्हणे. कुमारांचं तसंच काहीसं होतं. त्यांचा एकदा बागेश्री ऐकला की पुन्हा तो तसाच यायचा नाही. अगदी तीच बंदिश असली तरी! ”टेसूल बन फुले, रंग छाये, भंवर रस लेत फिरत मद भरे” ही कुमारांची बंदिश मी प्रत्यक्ष मैफिलीत कितीतरी वेळा ऐकली असेल.

  January 2, 2012


लेखसंग्रह

अन्याय्य ’मजूर-कंत्राटदारी‘ प्रथेचा निषेध

Category:

 

तुम्ही ‘पांढरपेशे‘ आहात की ‘श्रमजिवी‘ आहात, याच सद्यस्थितीतील ‘कंत्राटदारी‘ नावाच्या अमानुष ‘शोषण-तंत्राला काहीही सोयरसुतक असण्याचं कारण उरलेलं नाही! १ते२ टक्के निर्दय बुध्दिमंत बाळांनी व राजकीय मनगटशहांनी चालविलेल्या, या आधुनिक सरंजामदारी व्यवस्थेनं उत्पादन, सेवा इ. सर्वच क्षेत्रात धुडगूस घातलाय.

  January 2, 2012


लेखसंग्रह

“नॉएडा” चा धडा!

Category:

 

२२ सप्टेंबरला विषुववृत्तावर मध्यान्ही सूर्य अगदी अचूक डोक्यावर आलेला असतानाच, सर्लिकॉन्-ग्रॅझियानो ट्रान्स्मिशन् प्रा. लि. या गिअर बॉक्सेस् व बेअरिंग्ज् तयार करणार्‍या ‘ग्रेटर नॉएडा‘ स्थित इटालियन (तुरीन येथील) बहुराष्ट्रीय कंपनीत, आंदोलक कामगारांकरवी कंपनी MD/CEO ललितकिशोर चौधरी यांच्या झालेल्या क्रूर हत्येनं, भारतातीलच नव्हे तर जगभरातील औद्योगिकविश्व अक्षरशः हादरून गेलयं!

  January 2, 2012


कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

सुस्वागतम २०१२… !!!

Category:

 

सुस्वागतम दोनहजारबारा,घेऊन ये सुख स्वप्नांचा वारा ! प्रत्येक दुख:चा कर निचरा, स्पर्शुनि आपला मोर पिसारा ! नव्या वर्षात पीकपाणी चांगले,जळो जिणे लाजिरवाणे ! शेतकऱ्यांच्या पिकाला मिळो रास्त भाव, नको सरकारच्या ‘पॅकेज’चा डाव !

  January 1, 2012


लेखसंग्रह

शिक्षणाच्या संगणकीकरणाला पर्याय नाही!

Category:

 

सरकारी शाळा भंगार आहेत म्हणूनच यांच्या शाळा दर्जेदार आहेत. उद्या सगळ्याच शाळा दर्जेदार झाल्या, तर दर्जेदार हे विशेषण आपोआपच गळून पडेल. तेच या लोकांना नको आहे. त्यांना उच्चस्तरीय शिक्षणात, उच्चपदस्थ नोकऱ्यांमध्ये आणि राजकारणातील उच्चस्तरीय पदांमध्ये स्पर्धा नको आहे. ही सगळी क्षेत्रे सामान्य लोकांच्या आवाक्यापलीकडे ठेवण्याचा या लोकांचा अट्टहास आहे आणि म्हणूनच देशातील ऐंशी टक्के विद्यार्थ्यांना आज कालबाह्य ठरलेल्या मेकॅलेच्या शिक्षण पद्धतीत भरडले जात आहे.

  January 1, 2012


लेखसंग्रह

ठाण्यातील कामगार भीमराव भंडारेंची ’आत्महत्या‘…की, ’सरकारी हत्या‘(?)

Category:

 

लोकमान्य टिळक म्हणाले होते की, ”शेतकरी व कामकरी (कामगार) हेच या देशाचे मालक आहेत!“… याचा साधा सरळ अर्थ हा की, समाजातील इतर अभिजनवर्ग हा कामगारांनी निर्माण केलेल्या ’अतिरिक्त मूल्याचा‘ आणि निसर्गशक्तिच्या (विशेषतः सूर्यप्रकाश) सहाय्यानं शेतकर्‍यांनी निर्मिलेल्या अतिरिक्त खाद्यान्नांचा, तसेच इतर पूरक गोष्टींचा (उदा. कापूस) आधार घेऊन जगत असतो.

  December 31, 2011


साहित्य - ललित

फस गये ओबामा

Category:

 

मल्लिका शेरावत यांना आता कोण ओळखत नाही.याचा अर्थ त्यांना पूर्वी कुणी ओळखत नव्हतं असा होत नाही.पण पूर्वी त्यांची ओळख ही केवळ बांद्रा तलावापुरतीच मर्यादित होती.पण त्यांना अमेरिकेचे राष्ट्रपती बराक ओबामा यांनी चहा पिण्याचे आमंत्रण दिले ,तेव्हा पासून ,सारं जग त्यांना ओळखायला लागलय.

  December 30, 2011


लेखसंग्रह

घरगुती समारंभ साजरे करताना याचा विचार व्हावा…!

Category:

 

महागाई कमी व्हावी म्हणून रिझर्वबँकेने नामी युक्ती शोधून काढली. बँकांच्या सर्व प्रकारच्या कर्जांवरील व्याजांचे दर एक-दोन वेळा नाही तर चक्क १३ वेळा वाढविले तरीही महागाई काही अजून आटोक्यात येत नाही उलट त्याने विकासाची गती मात्र मंदावली. दैनंदिन जीवनात सातत्याने भेडसावणाऱ्या अडीअडचणींचे विशेषता महागाईचे गणित सोडवायचे असेल तर त्यासाठी चिंतन, शोध व अभ्यास करणे गरजेचे आहे.

  December 27, 2011