निसर्ग

सध्या निसर्गाशी नाते तुटताना दिसते. आपण निसर्गाशी कसेही वागतो आणि नंतर त्याचे परिणाम भोगतो. हे आपल्याला हृतू बदलात दिसून येत कधी पाऊस जास्त पडतो, कधी उन्हाळा जास्त होतो तर कधी कडाक्याची थंडी पडते. हे टाळण्यासाठी त्याच्याशी सख्य करा, त्याला जगवा आणि स्वत:ही जगाला शिका.



|| हरी ॐ ||

<निसर्ग निसर्गाशी घेऊ नका पंगा, भविष्यात करील आपला वांधा, निसर्गाशी ठेवा सख्य, करण्या सर्व कष्ट सुसह्य ! निसर्गाशी केलीत जवळीक, होतील सर्व ऋतू सकळीक ! माणसे माणसांसारखी वागली, तर ऋतूही आनंदाने बहरतील ! ऋतू हसले निसर्ग डोलू लागेल, ऋतू रडले निसर्ग काळवंडले, ऋतू हसला पिकं डोलू लागली, ऋतू चिडला, पिकांनी मान टाकली ! ऋतूंशी केली गट्टी, ऋतू हसवती, ऋतूंशी केली कट्टी, ऋतू रडवती ! ऋतूंशी वागणे सन्मानाने, ऋतूंचे देणे अमर्यादेने ! माणसांचे निसर्गाशी सख्य, ऋतूंच्या चेहेऱ्यावर खिलते सदैव हास्य ! <जगदीश पटवर्धन, बोरिवली (प) -- जगदीश पटवर्धन

Author