नक्षत्रांची वेल
Category:
कथा साहित्य - ललितआंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त लिहिलेली, कोरोना काळातील माझी एक कथा.
January 20, 2026
Category:
कथा साहित्य - ललितआंतरराष्ट्रीय परिचारिका दिनानिमित्त लिहिलेली, कोरोना काळातील माझी एक कथा.
January 20, 2026
Category:
कथा साहित्य - ललितमीरग संपत आलता. आभाळ ठणठण व्हतं.ढग कुठ बियाल पण दिसत नव्हते.निराशेनं कौतीका वसरीत दुचित बसला व्हता. मनात घालमेलं चालली व्हती.काय कराव ते त्यालं काय बी सुदरयनं गेलतं.बसल्या जागुन उठायलं आवसन व्हत नवतं.त्यालं आस वाटु लागलं की आभाळानं ढगायबरोबरच आपलं आवसन बी पळवलय की काय.अन्नाचा घास गोड लागयन गेलता.मंग जरा चहान तरी बर वाटल मनुन कस बस वसरीतुन उठत त्यानं नेमकच पाणी शेंदुन आलेल्या बायकोल,ईमलीलं चहा कर आसं मनलं.तस वस्काळतच ईमली त्यालं मनली,“घरात गुळ ,साकर्या,पत्ती कशाचाच पत्त्या नाय….सगळे डब्बे तुमच्यासारखेच ठणठण गोपाळ झालेतं.आज वडपौर्णिमेचा सन हे.जरा दुकानावर जाऊन किराणा माल आणा.काय बाई किती वढाव एकटीन संसार. या माणसाचं बिलकुल जरासं सुद्धा घरात लक्ष नाही.मी आहे म्हणून टिकली या घरात….दुसरी कोणी टिकली नसती. काय पाहून बापानं मलं या घरी दिलं काय माहीत.कोण्या जन्माचा सुड काढला बापाणं काय ठाऊक माय…. ये पोर्हयवो काय हुडदंग माजवलाय रे….ईकडं या .ईथ बसा मह्यापुढं अभ्यासालं.”
January 20, 2026
Category:
कथा साहित्य - ललितकॉलेजच्या नोटीस बोर्डावर गॅदरींगची नोटीस लागली होती.हे जस समजल तसं गण्यानं टुन्नकन उडीच मारली.गण्या कॉलेजमधील सांस्कृतिक कार्यक्रमांत नेहमीच पुढं पुढं करायचा.गण्यालं नाटकात काम करायची लय हौस होती.तसं पाहिलं तर लहान पणापासुनच गण्याच्या अंगात अभिनयाची गोम वळवळ करायची.तर असा हा गणेश उर्फ गण्या रणवीर नाटकाचा प्रचंड शौकीन होता.गल्लीत गणपती बसले की गण्याच्या ग्रुपचा नाटकाचा एक कार्यक्रम हमखासच असायचा.गण्याला आपली कला लोकांपुढं पाजळायलं लय भारी वाटायचं. श्रीराम लागु,विक्रम गोखले,दाजी पणशीकर ते हल्लीच्या प्रशांत दामले पर्यंत त्याने सर्वांचे नाटकं पाहिले होते.नाटकाचा शौकीन असलेल्या गण्याला चित्रपटांविषयी मात्र प्रचंड राग होता.तो नाटकाला अभिजात कलाकृती मानायचा तर चित्रपटाला कलेला लागलेला कलंक मानायचा.तस गण्या नाटकात चांगलं काम करायचा पण कुठल्या प्रेक्षकांपुढं काय सादर करावे हे गणित त्याला कधीच जुळले नाही.त्यामुळे नेहमीच त्याची फजीती व्हायची.एकदा असच गल्लीतल्या रसीक प्रेक्षकांपुढं गण्यानं कुठलंतरी एक प्रायोगीक नाटक सादर केलं.विषय ग्रामस्थांच्या डोक्यावरून गेलाच पण नाटकातले काही संवाद देवा धर्माविरोधात आसल्यानं पब्लीक खवताळली आण मग त्यांनी जे गण्याचा समाचार घेतला ते गण्या आठ दहा दिवस तरी खाटेला चिकटुनच राहिला होता.
January 20, 2026
Category:
कथा साहित्य - ललितकुमार गंधर्वांच्या आवाजातली ही अमर भूपाळी शंकर मथार्याच्या टेपरिकॉर्डरवर लागली तसं सारजाची झोप मोडली.शंकर मथार्याच्या टेपरिकॉर्डरचा भोंगा वाजनं आण गल्लीतल्या बायामाणसांचं पहाटचं उठनं हे मागील काही वर्षांपासून गल्लीतल्या बायकांसाठी नेहमीचच होतं.गावात फक्त शंकर म्हाताऱ्याच्या घरीच टेपरिकॉर्डर होता. शंकर मथरा पहाट सुखाची चांदणी निघाली की मोठ्ठया आवाजात आपला टेपरेकॉर्डर सुरू करायचा. सारजा जरा गडबडीनच उठली. कामाचा लय रोंभा पडला व्हता,त्यात पेरणीचे दिवस व्हते. पहाटचे सगळे कामं आटपुन शेतात जायचं व्हतं. तिनं उठून तोंडावर पाण्याचा सपकारा मारला,केसं नीट करून बुचडा बांधला अन चुली जवळ जाऊन चुलीतला एक भला मोठा ढेपसा हातावर घेऊन दात घासत घासत तिच्या नवऱ्याल,दौलतल आवाज दिला.पेरणी पाण्याचे दिवस असल्यानं दिवसभरच्या कष्टानं थकून दौलत आरमोडून झोपला व्हता. त्यालं तसं झोपलेलं पाहून सारजाच्या डोळ्यालं समाधान वाटत होतं. खरं म्हंजे कामाचा लय रोंभा पडला होता पण तरी बी त्याची झोप न मोडु देता तशीच ती उठली . पारोश्या अंगानं सयपाक पाणी करू नाही मंतात…! सारजीलं लहानपणापासूनच थंड पाण्यानं आंघुळ करायची सवय होती,म्हणून मग आधी तिनं आंघुळ करून घेतली. तव्हरोक दौलत बी उठला होता. त्याच्याकडं रेडीओ होतख.रेडिओवर गाणे ऐकण्याचा त्यालं लय नाद होता. झोपतून उठून त्यांनं रेडिओवर विवीध भारती लावलं.तेव्हड्यातं नहानीतून आंघुळ करून बाहिर येणारी सारजा त्यालं दिसली. सारजालं पाहून त्याचे डोळे उघडे ते उघडेच राहिले.तिचा तो लांब लांब केसांचा वलबट केशसंभार पाहून तो खुळ्यागत तिच्याकडं पाहू लागला. तेवढ्यात रेडिओवर गाणं लागलं होतं…
January 20, 2026
Category:
कथा साहित्य - ललितकर कचुन एसटीचा ब्रेक लागला अन् सिटवर बसुन मान खाली पाडुन पेंगाटलेल्या महादाची झोपमोड झाली. आपल्या हातातल्या ईस्टीलच्या चिमट्यानं गाडीतल्या लोखंडी रॉडवर प्रहार करत,“अय्य्….चलो भुर्याचीवाडी….चलो भुर्याचीवाडी…..!” असा कंडक्टरने पुकारा दिला आणि त्या पुकार्यानं महादा भानावर आला.आपल्या सोबतची शबनम बॅग गळ्यात लटकवत सोबतच्या सुदामा अन् रम्यालं आवाज देत तो गडबडीतच एस.टी.तून खाली उतरला.सुदामा आणि रम्याही त्याच्यापाठोपाठच एस.टी.तून खाली उतरले.भुऱ्याचीवाडी फाट्यावर उतरणारे ते तिघचं पॅसेंजर होते.रात्रीचे अकरा-साडेअकरा वाजले असतील.अमावस्येची रात्र असल्याने काळा निबीड अंधार पडलेला होता.तसं पाहिलं तर त्यावेळी त्या रस्त्यावरून कुणीही जायचं नाही.त्यातही अमावस्येच्या रात्रीला तर बिलकुलच नाही.त्याला कारणही तसंच होतं ते म्हणजे भुऱ्याचं….! होय…. भुऱ्याचच…! भुऱ्याच्या नावावरूनच त्या गावाचं नाव भुऱ्याचीवाडी असं पडलं होतं.गावातली वाडवडील माणसं नेहमी भुऱ्याच्या वेगवेगळ्या अन् रंजक कहाण्या सांगायचे,म्हणुनच सहसा अमावस्येच्या रात्रीला त्या रस्त्यावर सामसुम असायची.त्या काळरातीला त्या रस्त्यावर भुऱ्याचं साम्राज्य असतयं असं गावकरी म्हणायचे.अमावस्येच्या रात्रीला बारा वाजल्यापासून ते सव्वा एक या कालावधीत भुर्या त्या रस्त्यावरील साम्राज्याचा अनभिषिक्त सम्राट असायचा असही म्हणतात.रात्रीच्या त्या प्रहरी जो कुणी भुर्याच्या त्या मायावी साम्राज्यात प्रवेश करायचा त्याचा खात्माच व्हायचा.भुऱ्या वेगवेगळ्या रूपात येऊन हे सर्व करतो असही गावातले म्हातारे -कोथारे लोकं सांगायचे.
January 20, 2026
Category:
कथा साहित्य - ललितएखाद्या देशाला उद्ध्वस्त करायचं असेल तर त्या देशाच्या शिक्षण क्षेत्रात प्रचंड गोंधळ , गुंता करून ठेवा . देश केव्हा उद्ध्वस्त होईल हे कुणाला कळणारही नाही . हे कुणी म्हटलं होतं कुणास ठाऊक , पण ते सत्य होतं . अगदी पूर्वनियोजित कारस्थान असावं तसंच चाललं होतं . विद्यार्थी केंद्रीभूत शिक्षणव्यवस्था , बक्कळ पैसा देणारी इंडस्ट्री केव्हा झाली , हे धुरीणांच्या लक्षात सुद्धा आले नाही . त्या व्यवस्थेत विद्यार्थ्यांचे स्थान केवळ कच्चा माल या स्वरूपाचे झाले आणि त्यांचे पालक कच्च्या मालाचे वाहक झाले .
त्यात विद्यार्थी कुठं होता ?
त्याच्या मनाचा , बुद्धीच्या स्तराचा आणि शारीरिक क्षमतेचा विचार कुठं होता ?
त्याच्या अंगभूत गुणांचा विचार कुणी , कधी केला होता ?
शारीरिक विकासासाठी मोकळी मैदाने लागतात , त्याचा विचार कुठं होता ?
चार भिंतींची शाळा आणि एकत्रित शालेय सहजीवन खूप काही शिकवत असते , याचा विचार कुठं होता ?
January 20, 2026
Category:
कथा साहित्य - ललितवैधानिक इशारा : ही कथा अश्लील नाही . भविष्यातील गंभीर संकटाची ही सुरुवात आहे . आपल्या मुलांची काळजी असेल तर पालकांनी ही कथा वाचायलाच हवी . ब्रेक तुटलेले आहेत . गाडी तीव्र उतारावर आहे . उद्ध्वस्त करणाऱ्या विचारसरणीची खोल गहिरी दरी आ वासून उभी आहे … म्हणून कथा वाचायला हवी
January 20, 2026
Category:
कथा साहित्य - ललितस्वातंत्र्यवीर सावरकरांचे स्मारक , बुलडोझर लावून उखडून टाकील , असा माणूस जन्माला यायचाय . हिंमत असेल तर हात लावून दाखवा त्यांच्या स्मारकाला.
“राष्ट्रीय स्मारकांचा विध्वंस करून , या देशाच्या परंपरेशी , संस्कृतीशी , ज्ञानाशी आणि मातीशी गद्दारी करणाऱ्या देशद्रोह्यांनो , तुमचा मेंदू सडलाय . स्वातंत्र्यवीर सावरकर आणि त्यांच्यासारखे असंख्य क्रांतिकारक या देशात होऊन गेले म्हणून तुम्ही जिवंत आहात . त्यांनी सुखासीन आयुष्याचा त्याग केला म्हणून तुम्ही आज सुखासीन आयुष्य जगत आहात . त्यांची चरित्रं वाचा . त्यांचा त्याग , त्यांनी सोसलेल्या यातना , ऐहिक सुखाकडे पाठ फिरवून अवघ्या देशाचा केलेला विचार , संघर्षमय आयुष्य हे सगळं माहितेय तुम्हाला ? हिंदुत्व , सामाजिक समरसतेसाठी केलेले प्रयत्न , हिंदुस्थानच्या सीमा आणि त्यांचे संरक्षण याबद्दल केलेला विचार , देशाच्या एकात्मतेसाठी मांडलेल्या संकल्पना … यातलं काय माहितेय तुम्हाला ? परदेशातून येणाऱ्या अमाप पैशावर जगणारी तुम्ही बांडगुळे आहात , तुम्हाला काय माहिती सावरकर , काय माहिती देशहित ? तुम्ही सगळे देशाला लागलेली वाळवी आहात . देश आतून पोखरत जाणारी वैचारिक , षंढ वाळवी . भ्रम फैलावणारी वाळवी . संपत चाललेली पण संपता संपता देशाचं , समाजाचं , संस्कृती , किती नुकसान करता येईल याचा विचार करणारी वाळवी . त्यासाठी वापरत असलेल्या शब्दांना लाखो करोडो रुपये मलिदा मिळतोय , याच निर्बुद्ध जगण्यात स्वतःचं सुध्दा नुकसान होतंय हे विसरून गेलेली बधीर वाळवी”. तो क्षणमात्र थांबला .
January 20, 2026
Category:
कथा साहित्य - ललितरत्नागिरीकर भाग्यवान, कारण स्वातंत्र्यदेवतेचा साक्षात अवतार या भूमीत राहून गेला . ज्याच्या कर्तृत्वाला , त्यागाला , विजिगीषू वृत्तीला देशभक्तीला , दूरदृष्टीला , विज्ञानवादी दृष्टिकोनाला , साहित्याच्या सर्व प्रांतात निष्ठेने दिलेल्या योगदानाला , जिद्दीला, साहसाला आणि अतुलनीय अशा त्यागमूर्तीच्या अविस्मरणीय कर्तृत्वाला प्रतिमा प्रतीकं आणि शब्दात साकारणं म्हणजे गगनाला गवसणी घालण्याएवढं अवघड काम !
आपण सूर्याच्या दाहकतेला स्पर्श करू शकत नाही, पण क्रांतिसूर्याच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या
कारातीर्थाचे
दर्शन घेऊन मनोमन कृतज्ञता व्यक्त करू शकतो ना ?
२६ फेब्रुवारी ही क्रांतिसूर्य विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी !
आपण सर्वांनी रत्नागिरीच्या तुरुंगात निर्माण झालेल्या कारातीर्थाला जायला हवं . दर्शन घ्यायला हवं . मनोबल जागवायला हवं . वाढवायला हवं .
सावरकर अभिवादन यात्रा आणि सावरकर विचार यांची एक चळवळ सुरू व्हायला हवी.
आपलं हे कर्तव्यच आहे, आपण आपल्या कुटुंबियांसह दर्शन घ्या.
स्मार्टफोन मध्ये गुंतलेल्या आपल्या तरुण पिढीला सांगा…
रत्नागिरी बाहेर असलेल्या सर्वाना, येणाऱ्या पर्यटकांना, पाहुण्यांना, महाराष्ट्रातील सर्वाना सांगा…
रत्नागिरीत कारातीर्थ आहे,त्याचं दर्शन घ्या, तिथे असलेल्या बेड्या, साखळदंड यांना कृतज्ञतेने स्पर्श करून स्वातंत्र्यवीर सावरकर यांना विनम्रतेने अभिवादन करा.
January 20, 2026
Category:
कथा साहित्य - ललितत्यानं दिलेल्या उपम्याची चव अजून जिभेवर रेंगाळत होती . तिला वाटलं , अजून थोडा उपमा हवा होता पोट भरण्यासाठी नाही , केवळ चवीसाठी .
तिनं इकडे तिकडे पाहिलं .
ट्रेनमध्ये बऱ्यापैकी गर्दी होती .
बहुतेक सगळ्यांच्या हातात त्यानं दिलेल्या उपम्याच्या डिश दिसत होत्या .
आणि सगळे चवीनं खात होते .
” उपमा विकणारा गेला का पुढच्या डब्यात ? ”
तिनं कुणाला तरी विचारलं . ज्याला विचारलं त्यानं पुढच्या डब्याकडे बोट दाखवलं . आणि तो खाण्यात मग्न झाला . ती गर्दीतून वाट काढत पुढच्या निघाली . पण तिला फार पुढं जावं लागलं नाही . दाराजवळच्या छोट्याशा जागेत तो उभा होता . पायाजवळ स्टीलच्या मोठ्या डब्यांच्या दोन पिशव्या ठेवल्या होत्या .
” संपला का उपमा ? “
January 20, 2026
Copyright © 2025 | Marathisrushti