लेखसंग्रह

पंढरिये माझे माहेर साजणी

Category:

 

पंढरीच्या वारीत एकाचवेळी संतपरंपरा आणि लोकपरंपरा गुण्या-गोविंदाने नांदताना दिसतात. संतांना लोकोद्धाराची तळमळ असल्यामुळे त्यांनी लोकजीवनाच्या सर्व स्तरांचे बारकाईने निरीक्षण केले होते.

लेखसंग्रह

बुद्धीदेवता श्री गणेश – प्रज्ञापती

Category:

 

व्यावहारिक जगतातील अशा प्रत्येक अनुभवांनी जीवाला समृद्ध करणाऱ्या , सुख प्रदान करणाऱ्या प्रज्ञा रुपी बुद्धीचे कार्य ज्यांच्या शक्तीने चालते त्या भगवान श्रीगणेशांना प्रज्ञापती असे म्हणतात.

लेखसंग्रह

तमिळनाडूमधील पोंगल – सुगीचा सण

Category:

 

पोंगलच्या दिवशी अग्नीला नैवेद्य दाखवणे हा सर्वांत महत्त्वाचा विधी असतो. पोंगल सण हा प्रामुख्याने शेतात साजरा केला जातो. शेणाने सारवलेल्या जमिनीवर तीन दगडांची चूल मांडून त्यावर नवीन भांड्यात तांदूळ आणि डाळी टाकून आधण दिले जाते.

लेखसंग्रह

श्री क्षेत्र करवीर (कोल्हापूर)

Category:

 

देवी भागवतात उल्लेखिल्याप्रमाणे कोल्हापूरची महालक्ष्मी हे पूर्णपीठ असून अत्यंत प्राचीन शक्तिपीठ आहे. याला १०८ कल्पे झाली असे पुराणाचे मत आहे. कोल्हापुरला दक्षिणकाशी असे गौरवाने म्हटले जाते. येथे सतीचे तिन्ही नेत्र पडले म्हणून या ठिकाणाला शक्तिपीठाचे महात्म्य प्राप्त झाले.

लेखसंग्रह

श्रीगुरुस्तवन

Category:

 

ज्ञानदेव म्हणतात की सद्गुरु हा कृपामयी आहे. कैवल्याचे सोने प्रत्येकाच्या पदरात टाकणारा विश्वउदार आहे. तो विचारश्रीमंत आहे. आचारश्रीमंत आहे. तो विवेक श्रीमंतही आहे. इतकेच नव्हे तर सद्गुरु हा खरा सामर्थ्यवान आहे. सद्गुरु हा इतका सामर्थ्यवान आहे की प्रत्येक शिवाचेही सामर्थ्य तो आपल्या केवळ कैवल्य-अस्तित्वाने जिंकून घेतो. कारण एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे ती ही की शिव हा निराकारात स्थिर आहे. त्याचे सामर्थ्य हे त्याच्या भक्तांच्या सामर्थ्याच्या तुलनेतच त्या भक्ताकडून तोलले जाते. परंतु सद्गुरुचे सामर्थ्य दृश्य आहे आणि ते काही शिष्यांच्या सामर्थ्यदृष्टीकोनातून कधी तोलले जात नाही तर तो स्वयंभू सामर्थ्यवान आहे.