लेखसंग्रह
शिक्षणाचा पोरखेळ
Category:
लेखसंग्रहविषय अर्थातच नुकत्याच लागलेल्या इयत्ता १० वी किंवा एसएससीच्या निकालाचा आहे. या विषयावर गेल्या पाच-सहा दिवसांत इतकं उलट-सुलट लिहीलं, बोललं गेलंय, की आता त्याचा कंटाळा येऊ लागलाय. खरी मेख इथंच आहे, आपल्याला कंटाळा किंवा आनंद अगदी तत्परतेने वाटतो पण अशा प्रकारच्या कोणत्याही गोष्टीवर ‘असं का व्हावं’ असा शांतपणे विचार करावासा वाटत नाही.