विडा घ्या हो नारायणा – भाग ६
Category:
आरोग्य लेखसंग्रहपानाला चुना लावून कात घातल्यावर त्यावर सुपारी टाकावी. सुपारी दोन प्रकारे वापरली जाते. ओली आणि सुकी. ओली सुपारी सवय असणाऱ्यांनीच खावी. नाहीतर गरगरल्यासारखे वाटते, म्हणजेच “लागते”. ओली सुपारी मद निर्माण करणारी आहे. पक्व सुपारी तशी “लागत” नाही. सुपारी जर वाळूत भाजून घेतली तर वात पित्त आणि कफ हे तिन्ही दोष शांत करणारी आहे. जर भाजली नसेल तरीदेखील कफ आणि पित्ताला कमी करणारी आहे.