oldsite
निसर्गाचे खेळणे
Category:
कविता-गझल-चारोळी-वात्रटिकाजैत रे जैत
Category:
साहित्य - ललितगो नी दांडेकरांनी लिहून ठेवलेल्या अनेक अजरामर कांदबर्यांपैकी जैत रे जैत हि ठाकरवाडीतल्या ठाकरांची विशेषतः नाग्या अन् चिंधीची प्रेमकथा. महादेवाच्या गळ्यात बांधलेल्या पोळ्यात विराजमान असलेल्या राणी या मधमाशीविषयीची सूडकथा.
क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – लेख १
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteइंग्रजांनी चापेकर बंधूंना फासावर चढवले आणि सावरकर मनातून पेटून उठले. त्यांची कुलदेवता भगवती (कालिका) होती. असे म्हणतात की चापेकर बंधूंच्या फाशीनंतर सावरकर घरातील देव्हाऱ्यातील देवी समोर संतापाने स्वतःचे प्राण त्याग करण्याच्या मनःस्थितीत होते. या देशाला स्वातंत्र्य दिलेस तर मी माझी मान सुद्धा कापून तुझ्यावर माझ्या रक्ताचा अभिषेक करीन असे ते देवी समोर बसून गाऱ्हाणे घालीत होते. “देशाच्या स्वातंत्र्यासाठी सशस्त्र क्रांतीचा सेतू उभारून मारिता मारिता मरेतो झुंजेन” अशी शपथ त्यांनी देवी समोर घेतली. मनात जी क्रांतीची ठिणगी पेटली त्यामुळे सावरकर अत्यंत अस्वस्थ होते.
छंद
Category:
साहित्य - ललितप्रसिद्ध लेखक व पु काळे त्यांच्या वपुर्झा या पुस्तकात असं म्हणतात कि, माणसाला काही ना काही छंद हवा. स्वप्नं हवीत. पुरी होणारी किंवा कायम अपुरी राहणारी. त्यातून तो स्वतःला हरवायला शिकतो. सापडायला शिकतो. हे ‘हरवणं-सापडणं’ प्रत्येकाचं निराळं असतं.
क्रांतीचा महामेरू स्वातंत्र्यवीर सावरकर – प्रस्तावना
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteसावरकरांनी भोगलेल्या जन्मठेपेत त्यांना जो मानसिक त्रास झाला त्यापेक्षा अधिक त्रास त्यांच्या आत्म्याला देश स्वतंत्र झाल्यावर झाला असेल. त्यामुळे सावरकर प्रेमींना सुद्धा यातना होत आहेत. निवडणुका येतात आणि जातात परंतु त्यानिमित्ताने सामान्य वकूब असलेले जेव्हा महापुरुषांवर चिखलफेक करतात त्यामुळे यातना होतात. काही सामान्य बुद्धिमत्तेच्या राजकारण्यांनी सावरकरांचा उल्लेख “माफीवीर” असा केला आणि समाजात मोठे वादळ उठले.
खांदेरी – उंदेरी जलदुर्गदर्शन मोहिम
Category:
लेखसंग्रहअलिबाग म्हटलं कि नजरेसमोर उभे रहातात छत्रपती शिवाजी , संभाजी महाराज अन् त्यांचाच वारसा चालवत दर्यावर आपला दरारा निर्माण करणारे इंग्रज , डच, पोर्तुगीज, सिद्धीच्या उरात धडकि भरवणारे सरखेल कान्होजी आंग्रे. अलिबाग म्हटलं कि नजरेसमोर उभे रहातात ते अज्रस्त लाटांचे तडाखे सोसत वर्षानुवर्षे समुद्रात ताठ मानेने बुरुजावर झेंडा रोवून उभे असलेले कुलाबा, खांदेरी – उंदेरी , मुरुड- जंजिरा, कोरलई, रेवदंडा किल्ले.
लडाख मधील पेंगौंग लेक
Category:
लेखसंग्रहपृथ्वीवरील स्वर्गच उतरलेला आहे की काय अशी वाटणारी जागा म्हणजे १४२७० फूट उंचीवरील ११० किमी लांब व ५ कीमी रुंद खार्या पाण्याचे सरोवर, लेह पासून १५५ किमी. ६ तासाचा प्रवास १७८०० फुटावरील बर्फात गाडलेल्या चांगला पास मधून होतो.