तेज:पुंज स्वातंत्र्यसूर्य

तेज:पुंज स्वातंत्र्यसूर्य,उगवला आपल्यामुळे,
हरेक भारतीय मान तुकवी,
आपुल्या या कर्तृत्त्वापुढे,---!!!

असामान्य कार्याचा तुमच्या,
गौरव किती करावा,-?
प्रत्येकाने ओंजळभर वसा,
हृदयी आपुल्या जपावा,--!!!

हीच आपणांस श्रद्धांजली,
शब्दकुसुमे विनम्र वहाते,
तसे,भारतमातेच्या सुपुत्रास,
शतश: नमन मी करते,---!!!!!

विनायक नाम ते,
आपण सार्थ केले,
नायक बनुनी भारताला,
स्वतंत्र तुम्ही केले,--!!!!

हिमगौरी कर्वे.©



तेज:पुंज स्वातंत्र्यसूर्य,उगवला आपल्यामुळे,
हरेक भारतीय मान तुकवी,
आपुल्या या कर्तृत्त्वापुढे,—!!!

असामान्य कार्याचा तुमच्या,
गौरव किती करावा,-?
प्रत्येकाने ओंजळभर वसा,
हृदयी आपुल्या जपावा,–!!!

हीच आपणांस श्रद्धांजली,
शब्दकुसुमे विनम्र वहाते,
तसे,भारतमातेच्या सुपुत्रास,
शतश: नमन मी करते,—!!!!!

विनायक नाम ते,
आपण सार्थ केले,
नायक बनुनी भारताला,
स्वतंत्र तुम्ही केले,–!!!!

हिमगौरी कर्वे.©

Author