oldsite
लेखक आणि दिग्दर्शक सय्यद अली रझा
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteआन, अंदाज, मदर इंडिया, रेश्मा और शेरा, राजा जानी आणि दस नंबरी यासारख्या हिट चित्रपटांच्या पटकथा त्यांनी लिहिल्या होत्या. १९६८ मध्ये त्यांना सरस्वतीचंद्र सर्वोत्कृष्ट संवाद लेखक म्हणून त्यांना फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. १९७५ मध्ये त्यांनी प्राण जाये पर वचन ना जाये या चित्रपटाचे दिग्दर्शन केले होते.
जेष्ठ गीतकार तन्वीर नकवी
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteतन्वीर नकवी यांचे खरे नाव सय्यद खुर्शीद अली. तन्वीर नकवी यांचे वंशज मूळचे इराणचे. १९४० च्या दशकात तन्वीर नकवी यांनी हिंदी चित्रपटसृष्टीत गीतकार म्हणून सुरुवात केली. त्यांनी पाकिस्तानमध्ये जाण्यापूर्वी सुमारे २०० हून अधिक चित्रपटांसाठी गीत लिहिले.
मराठी चित्रकार आणि नेपथ्यकार पुरुषोत्तम श्रीपत काळे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteपुरुषोत्तम श्री काळे यांना जवळचे लोक अण्णा म्हणत असत. ललितकलादर्श’चे कल्पक चित्रकार आणि नेपथ्यकार म्हणून पु.श्री. काळे यांची ओळख होती. मराठी लेखक व.पु. काळे यांचे हे वडील होत. व.पु. काळे यांनी आपल्या वडिलांच्या वर “वपु सांगे वडिलांची कीर्ती” हे पुस्तक लिहिले आहे.
ज्येष्ठ लेखिका गिरिजा उमाकांत कीर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteगिरीजाबाईंनी विविध वाङ्मय प्रकारांनी आपले लेखन केले. त्यांची एकूण ७८ पुस्तके प्रकाशित झाली आहेत. त्यात कथा, कादंबरी, मुलाखती, प्रवासवर्णने, बालसाहित्य इत्यादी विविधता आहे. १९६८ ते १९७८ या काळात ‘अनुराधा’ मासिकाची सहाय्यक संपादिका म्हणूनही त्यांनी काम केले.
बॉलिवूडमध्ये ८० चे दशक गाजवणारी अभिनेत्री पद्मीनी कोल्हापुरे
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteपद्मिनी कोल्हापूरे… हिंदी चित्रपटसृष्टीत नाव कमावणारी मराठमोळी अभिनेत्री. ‘प्रेम रोग’,’आहिस्ता आहिस्ता’,’वो सात दिन’,’विधाता’ अशा विविध सिनेमातील भूमिकांनी पद्मिनी कोल्हापूरे यांनी रसिकांच्या मनात अढळ स्थान मिळवलं आहे. त्यांच्या चेह-यावरील निरागसपणा, आकर्षक आणि घायाळ करणारं सौंदर्य यामुळे ८०च्या दशकात पद्मिनी कोल्हापूरे यांची वेगळीच जादू होती.
कवी अरुण बालकृष्ण कोलटकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub site१९७४ साली त्यांनी लिहिलेल्या ‘ जेजुरी ‘ या इंग्रजी काव्य संग्रहाला राष्ट्रकूल पारितोषीक मिळाले , आणि अरुण कोलटकर हे नांव थेट जागतीक पातळीवर पोहोचले. अन पुढे ते भारतीय इंग्रजी कवी म्हणून प्रसिद्ध पावले.
टीम इंडियाचा माजी खेळाडू व्ही.व्ही.एस लक्ष्मण
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteक्रिकेट जगतात एक वेळ अशी होती की या व्हेरी व्हेरी स्पेशल फलंदाजाला ऑस्ट्रेलिया संघ घाबरत होता. लक्ष्मणने आपल्या करिअरमध्ये सर्वात अधिक धावा ऑस्ट्रेलियाविरूद्ध २,४३४ इतक्या धावा काढल्या आहेत. त्याने कसोटीत कंगारू विरूद्ध ६ शतके तर १२ अर्धशतके ठोकले आहेत.
संगीतकार, संयोजक, वादक अरुण पौडवाल
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteएकापेक्षा एक सुरेल गीतांनी मराठी-हिंदी सिनेजगतात आपली छाप सोडणारे संगीतकार अनिल-अरुण अर्थात अनिल मोहिले व अरुण पौडवाल यांनी संगीतबद्ध केलेल्या बहारदार गीतांचे गारूड आजही रसिकांच्या मनावर आहे. मराठीतले शंकर-जयकिशन अशी ओळख असणाऱ्या या संगीतकार जोडीची कारकीर्द विलक्षण गाजली.
ज्येष्ठ अभिनेते शरद तळवलकर
Category:
व्यक्ती-परिचय व्यक्ती-परिचय - articles sub siteशरद तळवलकर हे नाव मराठी चित्रपटसृष्टीशी निगडित असले तरी त्यांचे स्वतःचे नाट्यवेड हे प्रख्यात होते. नाटकाप्रमाणे चित्रपटातदेखील शरद तळवलकरांनी महत्त्वपूर्ण भूमिका केल्या. लाखाची गोष्ट, पेडगावचे शहाणे, तुळस तुझ्या अंगणी, रंगल्या रात्री अशा अखेर जमलं, वाट चुकलेले नवरे, बायको माहेरी जाते, मुंबईचा जावई आणि एकटी अशा कितीतरी गाजलेल्या चित्रपटातून त्यांनी भूमिका केल्या.