कविकुलगुरु कालिदास
Category:
लेखसंग्रहकालिदास प्राचीन नाही, मध्ययुगीन नाही. तो ‘होऊन गेलेला’ नाही, तो ‘आहे तसाच’ आहे. तो काल होता, आज आहे आणि उद्याही राहील. तो एका प्राचीन भाषेच्या नागमंडलात खिळलेला नाही, तो कालनिरपेक्ष आहे. ‘मेघदूत’ निर्माण करणार्या कालिदासाची पदवी तरी कशी ठरवावी ? तो निसर्गाकडून पाठ घेणारा आणि पाठ देणारा नाही. तो केवळ प्रेमिकही नाही. मग त्याचे सृष्टीशी नाते तरी काय ? सर्व नात्यांपलीकडचे त्याचे नाते अवघ्या आसमंताशी आहे. तो आणि निसर्ग असे द्वैत मुळातच मावळलेले आहे. उरले आहे फक्त तादात्म्य.”