CTBC
परमपूज्य सद्गुरु कलावती आई – (संपादकीय)
Category:
लेखसंग्रहसंत, महात्मे, सद्गुरु हे पृथ्वीतलावर जन्म घेऊनी प्रचार-प्रसार करीत आहे. त्याचा उद्देश हाच आहे की प्रत्येक जीव हा शीव व्हावा म्हणजे आनंदी व्हावा त्यासाठी त्याने साधना करावी यासाठी पृथ्वीतलावरील प्रत्येक संत मार्गदर्शन करीत असतो. असेच मार्गदर्शन करुन परमपूज्य आईंनी भक्तांना “भक्ती करीत भगवंत” होण्यासाठी मार्गदर्शन केले त्याप्रमाणे साधना करून घेतली.
श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबध्द – अध्याय आठवा – अक्षरब्रह्मयोग
Category:
लेखसंग्रहइथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रम्हविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी अक्षरब्रह्मयोग नावाचा आठवा अध्याय
श्रीगुरुस्तवन
Category:
लेखसंग्रहज्ञानदेव म्हणतात की सद्गुरु हा कृपामयी आहे. कैवल्याचे सोने प्रत्येकाच्या पदरात टाकणारा विश्वउदार आहे. तो विचारश्रीमंत आहे. आचारश्रीमंत आहे. तो विवेक श्रीमंतही आहे. इतकेच नव्हे तर सद्गुरु हा खरा सामर्थ्यवान आहे. सद्गुरु हा इतका सामर्थ्यवान आहे की प्रत्येक शिवाचेही सामर्थ्य तो आपल्या केवळ कैवल्य-अस्तित्वाने जिंकून घेतो. कारण एक गोष्ट इथे लक्षात घेण्यासारखी आहे ती ही की शिव हा निराकारात स्थिर आहे. त्याचे सामर्थ्य हे त्याच्या भक्तांच्या सामर्थ्याच्या तुलनेतच त्या भक्ताकडून तोलले जाते. परंतु सद्गुरुचे सामर्थ्य दृश्य आहे आणि ते काही शिष्यांच्या सामर्थ्यदृष्टीकोनातून कधी तोलले जात नाही तर तो स्वयंभू सामर्थ्यवान आहे.
।। मनाचे श्लोक-एक दृष्टिक्षेप ।।
Category:
लेखसंग्रह“जगी सर्वसुखी असा कोण आहे? ” आपल्याच पूर्वकर्मांनी आपणच तयार केलेल्या संचिताची मूळच्या सुखदुःखरूप फळे जीवाला भोगावीच लागतात. सुखरुप असलेल्या पण दुःखाच्या कचाट्यात खितपत पडलेल्या अभागी जीवाचे वर्णन संतश्री प. पू. डॉक्टरकाका (डॉ. श्री. द. देशमुख) करतात.
श्रीमद्भगवद्गीता मराठीत श्लोकबद्ध – अध्याय सातवा – ज्ञानविज्ञानयोग
Category:
लेखसंग्रहइथे सुरू होतो श्रीमद्भगवद्गीतेच्या उपनिषदातील ब्रह्मविद्यायोगशास्त्रामधील कृष्णार्जुनसंवादापैकी ज्ञानविज्ञानयोग नावाचा सातवा अध्याय.
।। नामस्मरण भक्ती ।।
Category:
लेखसंग्रहअन्नमय आणि प्राणमय कोशा मध्ये वस्तुचे अथवा व्यक्तीचे स्मरण ठेवण्यास तिचे नाम पुन्हा पुन्हा आठवणे अतीशय उपयोगी पडते, म्हणून ज्या वैखरी वाणीने आपण दृष्ट्याशी व्यवहार करतो त्या वाणीने सारखे नाम घेणे हा भगवंताची आठवण ठेवण्याचा प्रथम उपाय आहे.
।। श्री समर्थ रामदास स्वामींचे चरित्र ||
Category:
लेखसंग्रहसमर्थांच्या आयुष्याचे ४ टप्पे आपल्याला पाहायला मिळतात. पहिला टप्पा (१६०८ ते १६२०) जन्म ते गृहत्याग. दुसरा टप्पा म्हणजे समर्थांनी केलेली साधना, तपश्चर्या (१६२० ते १६३२) ह्या काळात नित्यनेमाने पुरश्चरण, अभ्यास, मनन, चिंतन तिसरा टप्पा (१६३२ ते १६४४) समर्थांनी तिर्थाटन, तिर्थाटनात संपूर्ण देशाचे अवलोकन केले. आणि चौथा टप्पा (१६४४ ते १६८२) समाप्रबोधन, सज्जनगडावर मूर्तीस्थापना आणि अखेर समाधी.
सर्वांग परिपूर्ण सुखाची परिभाषा मेघदूतम् !
Category:
लेखसंग्रहरसग्रहण हा तर मेघाच्या दृष्टीने एक वेगळाच विषय. मार्गात येणारी प्रत्येक नदी त्याची प्रेयसी आहे. त्याच्या विरहात ती रोडावली आहे. त्या प्रत्येकीचे पाणी (णि) ग्रहण करीत रसग्राही मेघ पुढे सरकत राहतो. पाथेय म्हणून कमलतंतु धारण करणारे राजहंस, कर्दळीच्या कळ्या खाणारे हरीण शावक, मकरंद ग्रहणाने धुंद झालेले भ्रमर या सगळ्या रसांच्या सोबत भगवान महाकालाच्या मंदिरात आणि हिमालयावर प्रत्यक्ष भगवान शंकरांच्या सानिध्यात ओसंडून वाहणारा भक्तिरस हा एक वेगळाच आनंदोत्सव आहे.