कथा

धनतेरस

Category:

 

आश्विन वद्य त्रयोदशीचा दिवस ‘धनतेरस’ या नावाने वाखाणला जातो. तेरस याचा अर्थ तेरा! म्हणून त्रयोदशीला बोली भाषेत तेरस म्हणू लागले.

धनतेरस ह्या दिवसाला बायकांची दिवाळी असेही म्हणतात. कारण या दिवशी प्रभातकाली घरातील सर्व स्त्रिया व मुली अभ्यंगस्नान करतात. धनतेरस या सणामागे प्राचीन काळची एक कथा जडलेली आहे.) प्राचीन काळी यमुना नदीच्या काठी हरीतपूर नावाची एक नगरी होती. तेथे हंस नावाचा एक राजा राज्य करीत होता. तो मोठा शूर व प्रजाहितदक्ष होता.

  November 25, 2025


कथा

ग्रहणासंबंधी दंतकथा

Category:

 

एकदा देव आणि दैत्य दोघांनी मिळून समुद्रमंथन करून चौदा रत्ने मिळवली. वाटणी करता करता सुधा (अमृत) कोणी घ्यावे याबाबत वाद निर्माण झाला. या वादात दैत्यांनी सुधेचा कुंभ जबरदस्तीने देवांपासून हिसकून घेतला. तेव्हा विष्णूने मोहिनीचे रूप घेतले. मोहिनीरूप विष्णूने दैत्यांना अमृत वाटण्याचे काम मी करतो असे सांगितले.

  November 15, 2025


कथा

चंद्रावरील मुलगी

Category:

 

कोणे एके काळी निकोबारमध्ये एकाकी जागी असलेल्या घरात एक विधवा स्त्री चार मुलींसह राहत होती. त्या चौघींमध्ये तीन मुली मोठ्या वय झालेल्या तर शेवटची मुलगी छोटी होती. त्या छोटीचे नाव होते टो-मी-रॉक (म्हणजे सौंदर्य ) तर इतर मुलींची नांवे अशी होती. टो-केन (मेहनती), टो-पेट-नागेन (स्वतःपूरते पाहणारी) आणि वा-मी-रो (गोष्ट सांगणारी)

  November 15, 2025


कथा

आधारियेचा परिसाचा दृष्टांत

Category:

 

(महानुभाव ग्रंथातील गोष्ट)

कव्हणा एका महात्माचिये आधारिये परिसू होता तो कव्हणी एका ब्राह्मणाचे
घरा वसतीसी जाये. दारी तिटत तिटत ऐसे पाणी पडत होते तेणे तयाचे वस्त्र
आंबट-ओले ऐसे जाले होते.

  November 15, 2025


कथा

चंद्र-सूर्याच्या घरी पाणी

Category:

 

कोणे एके काळी सूर्य आणि पाणी खूप चांगले मित्र होते. पृथ्वीवर सूर्य आणि पाणी गुण्या गोविंदाने रहात होते. पाण्याला भेटायला सूर्य नित्यनेमाने येत होता. परंतु पाणी कधीच सूर्याला भेटायला जात नव्हते. एके दिवशी गप्पांच्या ओघात सूर्याने पाण्याला विचारले, ‘मित्रा मी नेहमी तुझ्याकडे येतो.

  November 15, 2025


कथा

सत्यकामाची गोष्ट

Category:

 

सत्यकाम अगदी एकटा पडला. त्याचे सर्व खेळगडी त्याला सोडून गेले होते. त्यांच्या आईबापांनी त्यांची उपनयने करून त्यांना विद्याध्ययनासाठी गुरुगृही पाठवून दिले होते

  November 15, 2025


कथा

इंद्रधनुष्य

Category:

 

(गढवाली लोककथा)

वसंतऋतू नुकताच सुरू झाला होता. अलखनंदेच्या काठी एक अत्यंत सोयीची जागा वसंतोत्सवासाठी निवडली गेली होती. आर्य युवक युवती यांचा जल्लोष सुरू झाला होता. आपल्यायोग्य वर वधू निवडण्याची स्पर्धा वसंतोत्सवात सुरू व्हायची!

  November 15, 2025


कथा

नचिकेताची गोष्ट

Category:

 

प्राचीन काळी उद्दालक नावाचे एक ऋषी होऊन गेले. त्यांना नचिकेता नावाचा एक पुत्र होता. नचिकेता फार चाणाक्ष हुषार व चौकस बुद्धीचा होता. अवतीभवती घडणा-या घटनांबद्दल नानाप्रश्न विचारून तो आपल्या पित्याला भंडावून सोडी. एकदा उद्दालक ऋषींनी ‘विश्वजित’ नावाचा फार मोठा यज्ञ आरंभिला.

  November 15, 2025


कथा

प्युली

Category:

 

जंगली भागात, पहाड-पर्वतामध्ये एक छोटेसे पिवळ्या रंगाचे फूल दिसून येते. टेहरी, गढवाल मधील लोक त्या फुलाला ‘प्ली’ म्हणून ओळखतात. तिकडील लोकांमध्ये या फुलासंबंधी एक लोककथा आहे

  November 15, 2025


कथा

देवी व कंस यांची गोष्ट

Category:

 

यादववंशांत शूरसेन नांवाचा एक राजा झाला. हा मथुरेंत राहून राज्याचा कारभार पाहत असे. म्हणून मथुरा ही सर्व यादव राजांची राजधानी असे लोक समजू लागले. या शूरसेनाचा मुलगा वसुदेव याचे कंसाची बहीण देवकी हिच्याशी मोठ्या थाटाने लग्न झाले. लग्नसमारंभ उरकल्यावर देवकीला घेऊन वसुदेव जाण्यास निघाला, तेव्हां कंस हा आपल्या बहिणीस व मेहुण्यास पोचविण्यासाठी मोठ्या इतमामानें सोन्याचे शेकडों रथ घेऊन निघाला; इतकेच नाही, तर आपल्या बहिणीच्या संतोषासाठी तिचा रथ हांकण्याचे काम त्याने स्वतः हातीं घेतले.

  November 15, 2025