मौखिक आरोग्य दिवस
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानजेष्ठांपासून युवा वर्गापर्यंत मौखिक आरोग्य स्वच्छतेची काळजी आणि त्याच्या फायद्यांसंबंधी जागरूकता वाढवणे हाच या आंतरराष्ट्रीय दिवसाचा उद्देश आहे.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानजेष्ठांपासून युवा वर्गापर्यंत मौखिक आरोग्य स्वच्छतेची काळजी आणि त्याच्या फायद्यांसंबंधी जागरूकता वाढवणे हाच या आंतरराष्ट्रीय दिवसाचा उद्देश आहे.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानरंगभूमीवरील महत्त्वाची क्रांती ब्रिटीशकाळात १६ व्या शतकात एलिझाबेथ थिएटरच्या काळात जेव्हा शेक्सपियरने रंगभूमीचे पुनरुज्जीवन केले त्याकाळापासून म्हणजे `हॅम्लेट’, `मॅक्बेथ’, `ऑथेल्लो’, `किंगलियर’ या शोकांतिका किंवा `एज यू लाइक इट’, `ट्वेल्थ नाईट’ अशा सुखान्तिका रंगभूमीवर गाजत होत्या त्यावेळेस इंग्रजी रंगभूमीचा काळ हा सुवर्णकाळ मानला गेला. व्हिक्टर ह्युगो, अलेक्झांडर डय़ुमा, आल्बेर काम्यू, सॅम्युअल बेकेट, मोलिअरने फेंच रंगभूमीवर गाजवलेली नाटके, जर्मन रंगभूमीवरील ब्रेख्त आणि गटे यांची नाटके, अमेरिकन रंगभूमीवरील युजीनओ नील यांची नाटके, आधुनिक रंगभूमीचा पाया घालणारा नॉर्वेतील इब्सेन या नाटककारांच्या नाटकांनी रंगभूमीवर क्रांतीच केली.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानबालरंगभूमी हा उत्तम अभिनेता किंवा अभिनेत्री घडविण्याचा पाया आहे. हा पाया लहान वयातच पक्का करून घेतला तर पुढे व्यावसायिक रंगभूमी, चित्रपट किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांसाठी कसदार अभिनय करणारे चांगले कलाकार मिळू शकतात. नाटक, चित्रपट किंवा दूरचित्रवाहिन्यांवरील मालिकांमध्ये आघाडीवर असलेल्या अनेक कलाकारांची सुरुवात बालरंगभूमीपासूनच झाली आहे.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानमुकाभिनय हा संवादाचाच एक भाग आहे. चेहऱ्यावरची इवलीशी रेषा हलवून संवाद साधण्याच्या कलेत आपण तरबेज असतो. बायको स्वयंपाक करते. त्या माध्यमातूनही ती आपल्याशी संवाद साधण्याचाच प्रयत्नच करत असते. आपण टिव्ही पहात जेवणात मश्गुल झालेलो असतो. ती मात्र स्वयंपाक कसं झाला असावा हे जाणून घेण्यासाठी आपल्या चेहऱ्यावरची प्रत्येक रेषा वाचण्याचा प्रयत्न करत असते. स्वयंपाक छान झाला असेल तर बऱ्याचदा आपल्याकडून प्रतिक्रिया द्यायची राहून जाते. कारण आपण त्या चवीत रमून गेलेलो असतो.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानब्रिटिशांकडून भारताला स्वातंत्र्य मिळाले तरी शिक्षण पद्धती मात्र पूर्वीची ब्रिटिशांचीच होती. स्वतंत्र भारताचा कारभार क्षमतेने चालवायचा तर शिक्षण पद्धती भारतीयच हवी, हा विचार पुढे आला. भारताचे पहिले शिक्षणमंत्री मौलाना अबुल कलाम आझाद यांनी या कामी पुढाकार घेतला. त्यामुळेच प्रत्येक राज्यात माध्यमिक शिक्षण मंडळे स्थापन झाली. तसेच महाराष्ट्र राज्य शालान्त शिक्षण मंडळ अस्तित्वात आले. या मंडळाने ठरवलेल्या अभ्यासक्रमाप्रमाणे पहिली माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र परीक्षा (एस. एस. सी.) १९४९मध्ये आजच्या दिवशी सुरू झाल्या.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानराष्ट्रीय दिनदर्शिका ही भौतिकशास्त्रज्ञ डॉ. मेघनाथ साहा यांच्या अध्यक्षतेखालील समितीने सुचविलेली आणि २२ मार्च १९५७ रोजी केंद्र सरकारने अधिकृतरीत्या स्वीकारलेली दिनदर्शिका. ती खगोलशास्त्रावर आधारित असून ऋतुचक्र, भौगोलिक परिस्थिती इ. अनेक घटकांचा सखोल विचार करून तयार करण्यात आली आहे. म्हणूनच तिचा प्रचार व प्रसार होणे गरजेचे आहे.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानस्थापनेपासूनच जनसंघाचे कार्य महाराष्ट्रात सुरु झाले. अर्थात विविध राजकीय विचारधारा, विशेषतः काँग्रेसची विचारधारा, महाराष्ट्रात प्रचलित असल्याने हे काम तेवढेसे सोपे नव्हते. येथील वाटचालीत जनसंघासमोरील आव्हाने जेवढी मोठी होती, तेवढीच मोठी आव्हाने दुसऱ्या स्वातंत्र्यानंतर १९८० मध्ये स्थापन झालेल्या भारतीय जनता पार्टी (भाजपा) समोरही होती. पुर्वी जनसंघ असतांना जनसंघाचा दिवा घरोघरी लावा. असे कार्यकर्ते म्हणायचे. कारण पूर्वीच्या जनसंघाची निशाणी दिवा (पणती) होती. त्यावेळी विरोधक (कॉँग्रेस) जनसंघ व दिव्याची खिल्ली उडवायचे. त्यावेळी विजय दूरच परंतु उमेदवार मिळणे कठीण जायचे. आता निवडणूक जिंकल्यानंतर कार्यकर्त्याना जसा आनंद होतो तसाच आनंद तेव्हा जनसंघाला उमेदवार मिळाल्यानंतर व्हायचा. महाराष्ट्रात त्यावेळी स्व. उत्तमराव पाटील, स्व. रामभाउ म्हाळगी , स्व. रामभाउ गोडबोले, स्व. मोतीराम लाहने यांनी खूप कष्ट करून जनसंघ वाढवला. कॉँग्रेसला योग्य पर्याय म्हणूनही भाजपाचे नाव त्या वेळी होऊ लागले. याचबरोबर भाजपा एका-एका राज्यात सत्तेत येऊ लागला व अन्य पक्षांचे लोक भाजपात येऊ लागले.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानहनुमान आणि रुद्र : हनुमानाला रुद्राचा अवतार मानतात. पुराणकाळात हे नाते विकसित झाले. स्कंद पुराण (अवंतीखंड ८४), ब्रह्मवैवर्त पुराण (कृष्णजन्मखंड ६२), नारदपुराण (पूर्वखंड ७९), शिवपुराण (शातारुद्रसंहिता २०), भविष्यपुराण (प्रतिसर्ग पर्व १३०), महाभागावात्पुरण (३७) इ.ठिकाणी रुद्र व हनुमान हे नाते स्पष्ट केले आहे. हनुमानाची एकादश रुद्रांत गणना होते. भीम हे एकादश रुद्रांतील एक नाव आहे. म्हणूनच समर्थानी त्याला भीमरूपी महारुद्र म्हटले आहे. हनुमानच्या पंचमुखी मूíत रुद्रशिवाच्या पंचमुखी प्रभावातून आली आहे.
Category:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञानCategory:
दिनविशेष लेखसंग्रह सामान्यज्ञान१९४९ ते ६०च्या कालखंडात ऑल इंडिया रेडिओवर हिंदी सिनेमागीतांना बंदी असताना रेडिओ सिलोनने ती सारी गाणी घराघरात पोहोचवली. आशिया खंडातल्या विविध भाषांमधल्या ३५ हजार ओरिजनल रेकॉर्डस सिलोनच्या संग्रही असून, विविध भारतीकडे नसलेल्या अनेक रेकॉर्ड्सचा त्यात समावेश आहे.
Copyright © 2025 | Marathisrushti