खाद्ययात्रा

मटार काजू पनीर मोदक

Category:

 

मोदक पीठ वगळता वरील सर्व साहित्य मंद आचेवर एकत्र करणे, साखर मीठ शेवटी थंड झाल्यावर घालणे हे सारण मोदक पिठात घालून मोदक तयार करा.

  September 4, 2016


खाद्ययात्रा

पांढरे शुभ्र रव्याचे मोदक

Category:

 

ओल्या नारळाचं खोबरं, साखर वेलदोडे पुड, पेढे आणि केळी यांचं सारण बनवून घ्यावं. एका भांड्यात पाणी गरम करून त्यात मीठ आणि डालडा टाकावा. एक उकळी आल्यावर त्यात रवा घालून नीट एकत्र करावं. ५-६ मिनिटं मंद गॅसवर झाकण लावून वाफवा. मग एका परातीत काढून नीट मळून घ्यावा.

  September 4, 2016


खाद्ययात्रा

आजचा विषय मोदक….

Category:

 

मोदक म्हटलं की लगेच आठवते ते तांदुळाच्या पिठाच्या गरम उकडीचे, मऊसूत, चाफेकळी नाकाच्या, सुबक पाकळ्यांच्या, भरपूर गूळ-खोबरे-वेलचीयुक्त सारणाच्या मोदकांचा – साजूक तुपाच्या धारेबरोबर – शब्द-स्पर्श-रूप-रस-गंध असा सर्वांगांनी आस्वाद असलेला हे उकडीचे मोदक जे गणपती आल्यावर पहिल्या जेवणात नैवेद्ध म्हणून असतातच. प्रत्येक घरात गृहिणीनी बनवलेले मोदक, याची एक वेगळीच चव असते. काही जणी तर साचा न वापरता मोदकाच्या पाकळ्या खूप सुंदर करतात.

मोदक हा गणपतीचा आवडता पदार्थ. इतर वेळी चतुर्थी सोडल्यास मोदक सहसा कोणी करत नाही, पण गणपतीचे १० दिवस मात्र सर्व जण आवर्जून तो करतात.

  September 4, 2016