लेखसंग्रह

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग २- सदाहरित जंगलातील सोने, सागवान वृक्ष

Category:

 

‘शाक’ ह्या संस्कृत नावापासून ‘साग’ हे मराठी आणि इतर भारतीय भाषांतील तत्सम नावे आली असणे शक्य आहे. महाभारतात (इ.स.पू. ३१००–१०० वर्षे ) आणि सुश्रुतसंहितेत ‘शाक’ व चरकसंहितेत ‘द्वारदा’ असा उल्लेख आढळतो. याची इतर काही संस्कृत नावेही प्राचीन वैद्यक ग्रंथांत आढळतात. लॅटिन नावातील टेक्टोना हे नाव मूळचे ग्रीक भाषेतील टेक्टन म्हणजे सुतार या अर्थाचे असून ग्रँडिस हे गुणनाम त्यांच्या मोठ्या पानाला उद्देशून वापरले आहे. ‘टेका’ या पोर्तुगीज नावावरून इंग्रजी ‘टीक’ नाव पडले आहे. मलायी भाषेतील ‘टेक्कू’ या नावाचा इंग्रजी ‘टीक’ या नावाशी संबंध दिसतो.

कविता-गझल-चारोळी-वात्रटिका

गायत्री मंत्र संपादन (नवीन गायत्री मंत्रांसह)

Category:

 

गायत्री मंत्रांबद्धल अनेक लोकांना कुतूहल असते. पण त्याबद्दलची विशेष माहिती नसते. बहुतेक लोकांना ‘ॐ भूर्भुवः स्वः तत्सवितुर्वरेण्यं’ ही सविता गायत्री म्हणजे सूर्य गायत्री माहिती असते. मूळ सूर्य गायत्री मंत्राशिवाय पण अशा खूप गायत्र्या आहेत. त्या या लेखात संकलित करण्याचा प्रयत्न केला आहे. गायत्र्या वेगवेगळ्या देवतांच्या असतात. सर्व ठिकाणी एकवाक्यता नाही.

लेखसंग्रह

ओळख महाराष्ट्रातील जंगलांची : भाग १ – जंगलाचे प्रकार

Category:

 

महाराष्ट्रातील वनश्रींचे आढळणारे विविध प्रकार आणि विविधता यांचे अस्तित्व स्थानिक परिसरात असलेली भौगोलिक परिस्थिती, पर्जन्यमान, जमिनीचा मगदूर, चढउतार, समुद्रसपाटीपासून उंची यांवर अवलंबून असलेले दिसतात. वनश्रीच्या जडणघडणीमध्ये वरील नैसर्गिक व काही अनैसर्गिक कारणांचाही म्हणजे बोगदा जंगलतोड, अनिर्बंध गुराढोरांची चराई, वणवे इ. मोठा भाग असतो. या कारणांमुळे विद्यमान वनश्रींच्या प्रकारात पूर्णपणे आविष्कार झालेली वने फारच क्वचित ठिकाणी, अतिदुर्गम ठिकाणी, अभयारण्यातून अथवा देवरायांतून आढळतात.

लेखसंग्रह

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग १० – पृथ्वीवरील कल्पवृक्ष : नारळ

Category:

 

हिंदूंसह आशियातील अनेक श्रद्धावान, नारळ हे फळ पवित्र मानतात. त्याला धार्मिक कार्यात वापरताना श्रीफळ म्हणतात. नारळचा वापर सगळ्यात जास्त मंदिरांमध्ये केला जातो. दिवाळी, दसरा, गणपती पूजा या दिवशी देवाला मोठ्या प्रमाणात नारळ अर्पण केले जातात. या झाडाला इच्छापूर्तीचे झाड असेही म्हटले जाते, कारण या झाडाच्या सगळ्या अंगाचा उपयोग करता येतो.

लेखसंग्रह

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ९ – शिवप्रिय वृक्ष : रुद्राक्ष

Category:

 

रुद्राक्ष ही भारत, नेपाळ, इंडोनेशिया ( बाली) आणि हिमालयाच्या परिसरातील अन्य प्रदेशात उगवणारी एक आयुर्वेदिक औषधी वनस्पती आहे. रुद्राक्ष हा मिश्र असा संस्कृत शब्द आहे, ज्यात रुद्र (शंकर) आणि अक्ष (“डोळ्यातील अश्रुचे थेंब”) हे सामील आहेत. याला रुधिरवृक्ष असेही म्हणतात. इलोकार्पस जेनिट्रस हे हिमालयाच्या पायथ्याशी गंगेच्या खोऱ्याच्या क्षेत्रात वाढते. तसेच ते दक्षिण पूर्व आशिया, नेपाळ, इंडोनेशिया, न्यू गिनी ते ऑस्ट्रेलिया, आणि हवाईमध्ये सुद्धा आढळते.

लेखसंग्रह

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ८ – अशोक वृक्ष

Category:

 

बागेत पिरॅमिडसारखा दिसणारा, शोभेसाठी लावलेला जो ‘अशोक’ म्हणून ओळखला जातो, तो अशोक वृक्ष नसून ‘आशुपल्लव’ वृक्ष आणि सीतेला अशोकवनात ठेवले होते तो वृक्ष म्हणजे अशोक किंवा सीता अशोक. दोन्हींची कुळे वेगळी आहेत. सीता अशोक सीसॅल्पिनिऑइडी,लेग्युमिनोजी ) व हिरवा अशोक अनॊनेसी कुळातील आहे. मूळचा भारत-श्रीलंकेतला असलेला ‘सीता अशोक’ हा वृक्ष सुंदर दिसणाऱ्या सदाहरित वृक्षांमध्ये गणला जातो.

लेखसंग्रह

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ७ – पारिजात

Category:

 

पारिजातकाचे झाड हे शोभेचे झाड म्हणून बगीचा तसेच घराच्या आवारात लावले जाते. गावात बहुतांश लोकांच्या अंगणात पारिजातचे झाड असतेच. पारिजात झाडाच्या आसपासचे वातावरण अतिशय प्रसन्न असते. पारिजातकाचे फूल हे पश्चिम बंगाल या राज्याचे राज्यफूल आहे.

लेखसंग्रह

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ६ – कदंब

Category:

 

निसर्गप्रेमींना भुरळ पाडणारा कदंब वृक्ष अत्यंत राजस दिसतो. हिरवाकंच डेरेदार पसारा आणि त्यात मधेमधे डोकावणारी पिवळी गोल फळं. कदंबाला दृष्ट लागेल असा डोळ्यांना सुखावणारा वृक्ष. कदंबाचा पसारा आणि दैवी गुण यामुळे त्याला देव वृक्ष असे संबोधतात.

लेखसंग्रह

हिंदू धर्मातील प्राचीन व पौराणिक वृक्ष – भाग ४ – शमी

Category:

 

याचा प्रसार भारतातील उष्ण व रूक्ष प्रदेशांत सर्वत्र आहे. जमिनीत आत ओलावा आणि वर वाळू असली तरी हा वृक्ष चांगला वाढतो. हा वृक्ष काटेरी आहे. पानांच्या विरुद्ध बाजूला अणकुचीदार, बाकदार काटे असतात. जुनी पाने गळण्याच्या वेळेसच नवीन पालवी फुटते. फुले पिवळी, गुलाबी लहान आणि एका दांड्यावर असतात.