लेखसंग्रह

एडटेक कंपन्यांचे शैक्षणिक संस्थांच्या अस्तित्वावर प्रश्नचिन्ह?

Category:

 

संवादात्मक स्क्रीन ,ऑनलाइन वर्ग तसेच एड टेक स्टार्टअप मुळे विषय अधिक चांगल्या प्रकारे समजतो ,शिकणें मनोरंजक  व जटील संकल्पना समजण्यास मदत होते. संबोध स्पष्ट नसणें हेच शिक्षणाच्या पिछेहाटीचं कारण आहे. पोपटपंची ने करिअर करण्याचे दिवस आता संपले आहेत. शैक्षणिक परीणाम वाढविण्यासाठी डिझाईन केलेले तंत्रज्ञान, सॉफ्टवेअर वापरून शिक्षण अधिक आकर्षक व सुलभ बनविले जात आहे.

साहित्य - ललित

तुम न जाने किस जहां मे खो गयें..

Category:

 

लतांनी प्रेमिकांच्या आयुष्यात बहार आणली आहे . लहान मुलांना नाचायला शिकवले. नाच रे मोरा आंब्याच्या बनात, आई मी पावसात जाऊ कां? जन पळभर म्हणतील हाय हाय म्हणून, वृद्धांना संध्याछायेची आठवण करून दिली आहे .एक-दोन-तीन-चार या जावेदच्या मासिक बाराखडीच्या गाण्याला लतांनी रंगत आणली.

लेखसंग्रह

व्हाय वुई  किल्ड गांधी

Category:

 

प्रत्येकानेच गांधीजींना थोडे थोडे मारले आहे, कोणी विचाराने मारले आहे कोणी आचाराने मारले आहे. जगणे आज त्या त्या भूमिकेत शिरणं व त्या त्या संदर्भासहित जगणं हेच अभिप्रेत आहे. विचार व आचार पूर्वी अमलात आणण्यासाठी होते आता ते जाहिराती मध्ये व जाहिरातीसाठी वापरले जातात.

लेखसंग्रह

प्रसारमाध्यमातून झिरपणारी ‘नग्नता’

Category:

 

उदात्त प्रेम आज का निपजत नाही? पूर्वीची प्रेमगीते ही उदात्त होती, संस्कारक्षम होती, शरीर स्पर्शसुध्दा नव्हता. नग्नता मनाला शिवतही नव्हती. सौंदर्याचे आयाम इतके बदलले की केवळ नग्नतेच सौंदर्य शोधणं सुरु झाले. नग्नतेपलिकडेही काही सात्विक, सुंदर आहे, सत्य आहे, शिवासारखे आहे हे जाणवायला हवं तरच विकृती संस्कृतीवर मात करणार नाही.

लेखसंग्रह

महात्मा, मुन्नाभाई ते संजू

Category:

 

महात्मा गांधी आज अनेकांना हवे आहेत, अनेकांना नको आहेत. आऊटडेटेड माणसं व तत्वज्ञान आजच्या परिस्थितीत वापरुन तरुणांना काही संदेश देतांना आजच्या परिस्थितीत relevance, त्याचं दाखवता आलं तरी पुरेसं आहे. महात्मा आज बंदिस्त झाले आहेत. नोटात महात्मा, फोटोत महात्मा, मात्र प्रत्यक्ष जीवनात सगळा खोटाच व्यवहार.

लेखसंग्रह

प्रसारमाध्यमांचे संस्कार व विकार 

Category:

 

प्रसारमाध्यमांतून वास्तूशास्त्रवाले, कोचिंगवाले, भविष्यवाले, संत, महात्म्ये आपले विकार, संस्कार म्हणून बिंबवत आहेत. हीच आजची शोकांतिका आहे. संस्काराच्या टिपकागदाने विकार टिपलेच पाहिजेत, नाही तर रंगाचा बेरंग व्हायला वेळ लागणार नाही. 

लेखसंग्रह

शिस्तीचा ढासळलेला बुरुज 

Category:

 

शाळा नावाचं मंदिर असो की, परमीटरुम, राजकारण्यांची शिफारस लागते, “अर्थ”  असल्याशिवाय शैक्षणिक संस्था मिळत नाहीत, विनाअनुदान, अनुदानित करण्यासाठी “अर्थ” आवश्यक आहे. विनाअनुदानाचे दुकान उघडण्याचे व त्याला अनुदान मिळवून घ्यायचे. राजकारणातल्या  अस्तित्वासाठी, तिकिट मिळवण्यासाठी, शैक्षणिक संस्था, साखर कारखाना, सहकारी संस्था, परमीटरुम, वर्तमानपत्र, खून, बलात्कार हा स्वतःच्या साम्राज्याचा भाग अनेकांना आवश्यक वाटायला लागला.

लेखसंग्रह

महात्मा गांधी यांना अनावृत्त पत्र

Category:

 

आदरणीय महात्माजी,  विसाव्या शतकातील एक श्रेष्ठ जगतवंद्य विभूती आपणांस मानले जाते. विलक्षण निर्भयता, नम्रता, कमालीची साधी राहणी, दीन-दलितांविषयी अथांग करुणा आणि शोषितांबद्दल सहानुभूती या गुणांचा संगम आपल्या ठिकाणी होता. तत्वज्ञान ही जीवनाबरोबर विकसीत होणारी गोष्ट आहे, हे आपल्या बाबतीत खरे आहे. नैतिकता हेच संस्कृतीचे अधिष्ठान, संयम व त्याग हाच तिचा आत्मा. सुखोपयोगी साधने वाढविण्याची संस्कृती सध्या निर्माण होत आहे. श्रमप्रतिष्ठेची पीछेहाट होत आहे.