उडणाऱ्या हत्तीची गोष्ट
Category:
कथा बाल-साहित्य साहित्य - ललितकुणी एकेकाळी हत्तीला चार पंख होते. जसा सकाळी कोंबडा बांग देतो
तसेच हत्ती पण देत होते. असंही म्हणतात की हत्तीवर बसून देव विश्वफेरीला
निघत असत. परंतु जेव्हा पृथ्वीची निर्मिती झाली आणि लोकांची वस्ती वाढली
तेव्हा नवनवीन अडचणी निर्माण होऊ लागल्या. आकाशात उडता उडता
थकवा आला की हत्ती घरांच्या छतावर येऊन बसत; त्यामुळे त्यांच्या वजनामुळे घरे पडायला लागली. काही माणसं मेली.