व्यक्ती-परिचय

सुधीर राशिंगकर

Category:

 

मुंबईच्या व्यावसायिक वर्तुळामध्ये सुधीर राशिंगकर यांचे नाव माहित नसलेला उद्योजक विरळाच असावा, एवढया सक्रियतेने व सक्षमतेने आपल्या उत्तुंग कारकिर्दीत, मुंबईच्या व्यावसायिक विस्तारीकरणामागे त्यांनी मोलाची भुमिका बजावली आहे. शैक्षणीक दिवसांपासुनच त्यांच्यातील इतरांना दिपवणारी बुध्दिमत्ता, व दुसर्‍यांना सतत आपल्या खिशांत ठेविण्यासाठी लागणारी संभाषण कला त्यांच्यामध्ये ओतप्रोत भरलेली पाहून ते व्यावसायिक उड्डाणपट्टीवर, आपल्या यशाचे विमान लीलया उडवू शकतील, याची त्यांच्या घरच्यांना चांगलीच कल्पना होती.

व्यक्ती-परिचय

सुमन कल्याणपूर

Category:

 

मूळच्या बंगालच्या असणार्‍या सुमन कल्याणपूर यांचा जन्म, आजच्या बांगलादेशाची राजधानी ढाक्का येथे २८ जानेवारी १९३७ साली झाला. सुमन हेमाडी हे त्यांचे माहेरचे नाव. रामानंद कल्याणपूर यांच्याशी विवाहबध्द झाल्यावर त्या मुंबईत आल्या. दहा वर्ष वेगवेग़ळ्या गुरूंकडून संगीत शिकत असतांनाच अनेक कार्यक्रमांतून गायनाची संधीही सुमन कल्याणपुर यांना मिळत गेली.

व्यक्ती-परिचय

सुभाष परशुराम रासम

Category:

 

ठाणे शहरात फार थोडी अशी व्यक्तिमत्व आहेत जी अष्टपैलू म्हणून गणली जातात. त्यापैकीच एक म्हणजे सुभाष परशुराम रासम हे होय! बी.ए. पदवीधर, इंटिरीयर डिझायनर, वास्तुशास्त्र पदविका, ज्योतिशास्त्र विशारद अशा विविध क्षेत्रांतील पदव्या आणि पदविका रासम यांनी प्राप्त केल्या आहेत आणि या सर्वच क्षेत्रात ते कार्यरतही आहेत.

सुनीती अरविंद काशीकर
व्यक्ती-परिचय

सुनीती अरविंद काशीकर

Category:

 

आपल्या मनातील ठाण्याविषयी सौ. सुनिती काशीकर अगदी मन मोकळेपणाने बोलतात. त्या म्हणतात की, त्यांच्या जन्मापासूनच ठाणे अनुभवलं आहे. पूर्वीचं ठाणं हे तलावाचं ठाणं, वेड्यांचं हॉस्पिटल असलेलं ठाणे म्हणून ओळखलं जाई. आजचं ठाणे हे मुंबई पाठोपाठ विकसित झालेलं एक महानगर म्हणून ओळखलं जात आहे.

सुभाष आंदे
व्यक्ती-परिचय

सुभाष आंदे

Category:

 

पाणी शुद्ध करण्यासाठी ‘नीरी-झर’ ही गावातल्या माणसालाही पुराचे गढूळ पाणी शुद्ध करता येईल अशी ही सोपी पद्धत त्यांनी विकसित केली.

व्यक्ती-परिचय

सुषमा शिरोमणी

Category:

 

मराठी चित्रपटांमध्ये पारंपारिक स्त्री व्यक्तीरेखेला काहिसा छेद देऊन त्याजागी “डॅशिंग वुमन” आणि “तडफदार स्त्री” ची व्यक्तीरेखा साकारण्याचं काम सुषमा शिरोमणी यांनी चपलखपणे साध्य केलं; मराठी सिनेमामध्ये सर्वप्रथम “भिंगरी” या चित्रपटातून “आयटम सॉंग” चा ट्रेंड हा सुषमा शिरोमणींमुळे रुजला आणि तोही मराठमोळ्या ढंगात. चित्रपटांच्या निर्मिती व्यतिरिक्त सुषमा शिरोमणींनी “इम्पा” या चित्रपटांसाठीच्या संघटनेचं तीनवेळा अध्यक्षपद भुषवलं असून, पायरसी विरोधी कायदा हा त्यांच्या कार्यकाळातच अमलात आला.