व्यक्ती-परिचय

माधवराव शिंदे

Category:

 

राजमाता विजयाराजे शिंदे यांचे चिरंजीव माधवराव शिंदे यांनी राजकारणात प्रवेश करत १९७१ मध्ये गुना लोकसभा मतदारंसघातून निवडणूक लढवली आणि जिंकली. त्यानंतर १९८४ पर्यंत ते गुनातून खासदार म्हणून निवडून आले.

व्यक्ती-परिचय

मारुती माने

Category:

 

१९६४ ला मेहेरदीन याला पराभूत करून ‘हिंदकेसरी’ किताब पटकावलेल्या मारुती माने यांनी त्यानंतरच्या दशकात अनेक दिग्गजांशी कुस्त्या केल्या. त्यात मास्टर चंदगीराम, सादिक पंजाबी, विष्णुपंत सावर्डेकर-पाटील आणि बसलिंग करजगी आदींचा समावेश होता.

व्यक्ती-परिचय

माणिक सीताराम गोडघाटे (कवी ग्रेस)

Category:

 

“इन्ग्रिड बर्गमन“ या पाश्चात्य अभिनेत्रीच्या अभिनयाने प्रभावित होऊन माणिक गोडघाटेंनी “ग्रेस” हे साहित्यिक नाव धारण केले होते. मर्ढेकरोत्तर नवकवींच्या दुसर्‍या पिढीतील प्रमुख कवींमध्ये यांची गणना होते. १९७१ ते १९७६ या काळात दिल्लीच्या भारतीय साहित्य अकादमीच्या मराठी सल्लागार समितीचे ते सदस्य होते, तर “महाराष्ट्र राज्य मराठी विश्वकोश निर्मिती मंडळा”चे १९८२ ते १९८६ या काळात ते सदस्य होते.

व्यक्ती-परिचय

मारुतीराव कीर

Category:

 

मारुती राव कीर यांनी आधी एस.डी बर्मन यांच्या साठी आणि नंतर आर.डी बर्मन यांच्या साठी शेवटपर्यत रिदम असिस्टट म्हणून काम केले.

व्यक्ती-परिचय

मारोतराव कन्नमवार

Category:

 

मुख्यमंत्री पदाच्या अल्प कारकिर्दीतही महाराष्ट्रातल्या जनमानसावर आपल्या कर्तृत्वाची छाप ठेवून जाणारा मुख्यमंत्री म्हणून मारोतराव कन्नमवार यांचे नाव आदराने घ्यावे लागते.

व्यक्ती-परिचय

माधुरी दीक्षित

Category:

 

माधुरी ही ख-या अर्थाने सौंदर्य, अभिनय आणि नृत्य यांचा अभूतपूर्व एकत्रित संगम आहे. तिच्या आधीच्या सर्व सुपरस्टार या कुठे ना कुठे कमी होत्या. अपवाद फक्त रेखाचा. मधुबालाला नृत्यात मास्टरी नव्हती तर हेमा मालिनी सौंदर्यवती असली तरी अभिनयात डावी होती.

व्यक्ती-परिचय

माधवी गोगटे

Category:

 

माधवी गोगटे यांनी मराठीसह अनेक हिंदी मालिकांमध्ये काम केलं होतं. नाटक, मालिका, चित्रपट अशा विविध माध्यमातून त्या प्रेक्षकांच्या भेटीला आल्या होत्या.  ‘भ्रमाचा भोपळा’, ‘गेला माधव कुणीकडे’ ही त्यांची नाटकं तुफान गाजली होती.

व्यक्ती-परिचय

मिलिंद बल्लाळ

Category:

 

ठाण्यातील पत्रकार परंपरेतील आणखी एक महत्त्वाचे नाव म्हणजे तीस वर्षं पत्रकारितेच्या क्षेत्रात कार्यरत असणारे मिलिंद बल्लाळ. १८ वर्षं टाईम्स ऑफ इंडियाचे जिल्हा प्रतिनिधी म्हणून कार्यरत असणारे मिलिंद बल्लाळ सध्या “ठाणे वैभव” या वृत्तपत्राचे संपादक आहेत.

व्यक्ती-परिचय

मिलिंद गुणाजी

Category:

 

महाराष्ट्रातील गडकिल्ले आणि अन्य प्रेक्षणीय स्थळे यांची दूरचित्रवाणीच्या पडद्यावर ओळख करून देणारे मिलिंद गुणाजी यांचे ते कार्यक्रम अतिशय लोकप्रिय आहेत. मिलिंद गुणाजी हे उमदे आणि प्रसन्न व्यक्तिमत्त्व आहे यात शंकाच नाही.