भारतात क्रिकेट लोकप्रिय होण्याची ही विविध कारणे सांगितली जातात, त्यात सर्वात महत्त्वाचे म्हणजे हा खेळ कुठेही, कधीही आणि कुणीही सहजपणे खेळू शकतो. क्रीडा प्रबोधिनीत दाखल झाला नसता तर एकेंद्रही इतर मुलांप्रमाणे त्याच्या सातारा जिल्ह्यातील खेडेगांवात समवयस्कांसमवेत मिळेल ती बॅट आणि बॉल घेऊन मनसोक्त क्रिकेट खेळला असता. मात्र चार वर्षांपूर्वी क्रीडा प्रबोधिनीच्या पुणे येथील शिबिरात दाखल झालेल्या २०० मुलांमधून ज्येष्ठ प्रशिक्षक श्रीकांत वाड यांनी बॅडमिंटन प्रशिक्षणासाठी निवडलेल्या दहा मुलांमध्ये एकेंद्रचा समावेश झाला आणि त्याच्या जीवनाला एक योग्य दिशा मिळाली.
योगायोग म्हणजे क्रीडा प्रबोधिनीच्या ठाणे केंद्रात बॅडमिंटनचे प्रशिक्षण घेणारी ही सर्व मुले आदिवासी भागातील असून त्यासर्वानी या खेळात कौशल्य दाखवून देत आपली निवड सार्थ ठरवली आहे. एकेंद्रने तर जिल्हास्तरीय बॅडमिंटन स्पर्धेत १५ वर्षांखालील मुलांच्या गटात अजिंक्यपद पटाकावून आपली या खेळातील चुणूक दाखवून दिली. गंमत म्हणजे क्रीडा प्रबोधिनीत एकेंद्र आधी अॅथलेटिक्ससाठी निवडला गेला होता. आताही तो धावण्याचा सराव करतो. सातारा जिल्ह्यातील दावली तालुक्यातील कुडाळ हे त्याचे गाव. त्याला तीन भाऊ आणि एक बहिण. एकेंद्र सर्वात धाकटा. वडिल वॉचमन म्हणून काम करतात. प्रबोधिनीत निवड झाल्याने त्याला घरापासून दूर रहावे लागणार होते. ‘आयुष्यात काहीतरी करून दाखविण्याची संधी अगदी लहानपणीच तुला मिळतेय तेव्हा खुशाल जा’ अशा शब्दात त्याला कुटुंबियांनी प्रोत्साहन दिले. चौथीत असताना तो अकोला येथे अॅथलेटिक्सच्या शिबिरात होता. बॅडमिंटनसाठी निवड झाल्यानंतर २००७ पासून तो आता ठाण्यात आहे. इतर नऊ जणांसोबत तो दादोजी कोंडदेव स्टेडिअममधील क्रीडा प्रबोधिनीच्या संकुलात राहतो. नियमित व्यायाम, खेळाचा सराव आणि शाळेचा अभ्यास अशी त्रिसूत्री साधना हीच एकेंद्र आणि त्याच्या सहकाऱ्यांची सध्याची दिनचर्या आहे. पहाटे साडेपाच वाजता त्यांचा दिवस सुरू होतो. आधी फिटनेससाठी व्यायाम, मग फ्रेश होऊन नऊ ते साडेअकरा बॅडमिंटनचा सराव. दुपारी शाळा. तो ठाण्यातील मोहनदास हरगोविंददास विद्यालयात शिकतो. आता तो आठवीत आहे. संध्याकाळी शाळेचा अभ्यास. खेळाडू म्हणून क्रीडा प्रबोधिनीत दाखल झाला असला तरी शाळेच्या अभ्यासाकडेही त्याचे तेवढेच लक्ष आहे. सातवीला त्याला ७८ टक्के गुण मिळाले. दिवाळी आणि मे महिन्याच्या सुट्टीत तो आपल्या गावी जातो. जिल्हास्तरीय स्पर्धेत एकेंद्रने अजिंक्यपद पटकाविल्याने आता तो आणि त्याच्या टीमकडे सर्वाचे लक्ष वेधले आहे. मात्र अंतिम ध्येयाच्या दिशेने आपण टाकलेले एक छोटेसे पाऊल आहे, याची एकेंद्रला जाणीव आहे. पुढील हंगामात ही मुले राष्ट्रीय स्पर्धेत खेळणार आहेत. तेव्हा तिथे त्यांचा खरा कस लागणार आहे. अर्थात एकेंद्रचे लक्ष्य त्याही पुढचे आहे. त्याला आशियाई स्पर्धेत पदक पटकावयाचे आहे.